कोळंबी भात (प्राँस राईस)
नमस्कार मंडळी.
समुद्री जेवण मनापासून आवडते, त्यात कोळंबी भात म्हणजे...... तोंडाला पाणीच सुटते. :)
असो,
ही घ्या पाकृ.
साहित्य
१०० ग्रॅ कोळंबी (सोलून आणि शिजवून)
२ लोकांना पुरेल इतका भात थोडं तूप घालून लावून घ्या (कुणाला बासमती आवडतो तर कुणाला ईतर जातीचा) तूप हे मसालेदार पदार्थांचे साईड इफेक्ट टाळण्यासाठी.
१ ईंच आले
४ पाकळ्या लसूण
कोथिंबीर
आमचूर पावडर १ टेस्पून
२ चमचे लाल तिखट
१/२ चमचा हळद
१ चमचा घरचा मसाला/गरम मसाला
४ लवंगा
३ वेलची
१ छोटा तुकडा दालचिनी
१ छोटा चमचा शहाजिरे
१ छोटा चमचा मोहोरी
१ दगडफूल
४ काळे मिरे
२ तेजपत्ता
१/४ छोटा चमचा हिंग
१ मोठा कांदा
१ मध्यम टमाटा
चवीपुरते मीठ
कृती
१. कांदा उभा चिरून घ्या आणि टमाटा बारीक.
२. आले किसून घ्या, लसूण बारीक चिरून घ्या.
३. वेलची, काळे मिरे, लवंग, दालचिनी, दगडफूल मसाला थोडासा भरडून घ्या.
४. कढईत तेल तापवा.
५. तेल तापले की हिंग घालून मोहोरी आणि शहाजिरे घाला.
६. लसूण टाकून थोडा तळला गेला की मग भरडलेला गरम मसाला घाला.
५. उभा चिरलेला कांदा घालून चांगला सोनेरी होईपर्यंत परता.
६. कांदा परतला की त्यात टमाटा, अर्धा चमचा हळद, लाल तिखट, मसाला, आमचूर पावडर हे सर्व एकत्र करून मग आणखी मंद आचेवर ५-१० मिनिटे परता. आता यात कोळंबी टाकून पुन्हा एकदा थोडा वेळ परता.
७. आता कढईत भात टाका, मीठ घाला आणि चांगलं एकत्र करून ५ मिनिटे वाफवा.
८. कोथिंबीर पेरा आणि हाणा. ;)
आपला,
मराठमोळा
वाचने
10211
वाचनखूण
प्रतिक्रिया
25
फोटू पाहून खपल्या गेलो आहे
काय कातील फटु आहे ! जबर्या
माताय!!
In reply to माताय!! by मी-सौरभ
कधी जाणार आहेस..?
मस्तच एकदम .. आवडेश
मस्त !!!
आई ग... मेले.... कोळंबी
सुंदर
जबरा.... तोंडाला पाणी सुटले
लै भारी.
व्वा! सोप्पी पा. कृ. आणि जीभ
लै भारी
तेज्यायला !
In reply to तेज्यायला ! by परिकथेतील राजकुमार
बाटलीवाले वाक्य सोडून बाकी
जजजजजबराट !!
भन्नाट...
शेवटच्या फोटुला बादलीभर लाळ
मस्त
तोंपासू
झकास
खतरनाक
In reply to खतरनाक by रमताराम
नाय ब्वॉ ररा, बायको
झभरदस्त पाक्रुक्रुती. एक्दम
मकीचा एक तीर इथे बसला वाटतं.
In reply to मकीचा एक तीर इथे बसला वाटतं. by गणपा
नाय बा गणा, तीर बसायला आपण