Skip to main content

कोळंबी भात (प्राँस राईस)

लेखक मराठमोळा यांनी मंगळवार, 24/01/2012 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी. समुद्री जेवण मनापासून आवडते, त्यात कोळंबी भात म्हणजे...... तोंडाला पाणीच सुटते. :) असो, ही घ्या पाकृ. साहित्य १०० ग्रॅ कोळंबी (सोलून आणि शिजवून) २ लोकांना पुरेल इतका भात थोडं तूप घालून लावून घ्या (कुणाला बासमती आवडतो तर कुणाला ईतर जातीचा) तूप हे मसालेदार पदार्थांचे साईड इफेक्ट टाळण्यासाठी. १ ईंच आले ४ पाकळ्या लसूण कोथिंबीर आमचूर पावडर १ टेस्पून २ चमचे लाल तिखट १/२ चमचा हळद १ चमचा घरचा मसाला/गरम मसाला ४ लवंगा ३ वेलची १ छोटा तुकडा दालचिनी १ छोटा चमचा शहाजिरे १ छोटा चमचा मोहोरी १ दगडफूल ४ काळे मिरे २ तेजपत्ता १/४ छोटा चमचा हिंग १ मोठा कांदा १ मध्यम टमाटा चवीपुरते मीठ कृती १. कांदा उभा चिरून घ्या आणि टमाटा बारीक. २. आले किसून घ्या, लसूण बारीक चिरून घ्या. ३. वेलची, काळे मिरे, लवंग, दालचिनी, दगडफूल मसाला थोडासा भरडून घ्या. ४. कढईत तेल तापवा. ५. तेल तापले की हिंग घालून मोहोरी आणि शहाजिरे घाला. ६. लसूण टाकून थोडा तळला गेला की मग भरडलेला गरम मसाला घाला. ५. उभा चिरलेला कांदा घालून चांगला सोनेरी होईपर्यंत परता. ६. कांदा परतला की त्यात टमाटा, अर्धा चमचा हळद, लाल तिखट, मसाला, आमचूर पावडर हे सर्व एकत्र करून मग आणखी मंद आचेवर ५-१० मिनिटे परता. आता यात कोळंबी टाकून पुन्हा एकदा थोडा वेळ परता. ७. आता कढईत भात टाका, मीठ घाला आणि चांगलं एकत्र करून ५ मिनिटे वाफवा. ८. कोथिंबीर पेरा आणि हाणा. ;) आपला, मराठमोळा

वाचने 10222
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

आता कोकण ट्रिप करावी लागणार पोटभर कोळंबी खायला :)

In reply to by मी-सौरभ

कधी जाणार आहेस..? एकटा गेल्यास तिथे मासेमारीच्या गलबतांचा संप होवो, वाटेत ट्रॅफीक जॅम होवो अशा (धमकीयुक्त) सदिच्छा. :-) मोदक

शेवटच्या फोटोत चमचा घालुन खावासा वाटला :)

फोटो + जबराट पा.क्रु.+ सुट्सुटीत सादरीकरण = आय$$$$टी वाल्याचा ऐट्दार धागा. लगे रहो...ममो भाय vry good

येती सुट्टी सार्थकी लावण्याचे काम झाले .. एक नंबर पाकृ .. अवांतर : अलिबाग मध्ये एस टी स्टँड्च्या बाजुला 'फुलोरा' हॉटेल आहे ..तिथल्या कोळंबी भाताला तोड नाही ..

पुन्हा मांसाहारी ? असो... बाटली आणण्याचे कबूल केल्याने स्वतःवरती कंट्रोल ठेवल्या गेल्या आहे.

भेंडी !! आयटी नवरा कुणीकडचा ;) राक्या , आता तु आल्यावर कोण कोणासाठी पाकृ आणायची रे , लावतो का बेट ;) (बाकी कोळंबीप्रेमी कोण ते समजल्या गेले आहे ;) )

एक अतिशय आवडती रेसिपी. आवडली.

बुधवार सत्कारणी लागला....

लगेच खावेसे वाटत आहे Smiley

ममो बायकू आयटीवाली हाय काय रे? नाय म्हजी आपलं सजंच इचारलं बर्का. (खरं सांग, कांदा बायकूने चिरून दिला की नाही?)

In reply to by रमताराम

नाय ब्वॉ ररा, बायको आयटीवालीबी नाय आन कांदा बी म्याच चिरलाय. बायको कट्टर शाकाहारी हाय त्यामुळं असलं कायबी वशाट खायचं असलं की सम्दं मलाच करायला लागतया. ;)

In reply to by गणपा

नाय बा गणा, तीर बसायला आपण टारगेट असायला हवं ना.. ;) बाकी मिस मकींच्या तीरांबद्द्ल आमचे परममित्र निदे यांना संपर्क साधायला हवा. :)