लहानपणीच्या गोष्टी
चित्रकला हा माझ्या आवडीचा विषय कधीच नव्हता. शाळेमधे परसेंटेज व नंबर खाली यायचा तो याच विषयामुळे. त्यातून मोठ्या बहिणी त्याच शाळेत असल्यामुळे तर मला चांगलीच बोलणी बसायची. त्या दोघींची चित्रकला अप्रतिम होती, अगदी बोर्डावर त्यांची चित्रे लावली जात. मला मात्र माणसाची फिगर अजिबातच जमत नसे. तशी इतरांची सुंदर्, सुंदर चित्रे बघायला मला खूपच आवडत. पण मला येत नसलेली कला, अशी मारुन मुटकून कशी येणार हे समजत नसे. वर्गात ३/१० मार्क मिळवणारा मी घरुन काढून आणलेल्या चित्रांना मात्र ९/१० मिळवत असे. पण ते मार्कस देताना चित्रकला शिक्षक, छदमीपणे हंसून, बहिणीने काढलेलं ओळखताय हं गाढवा! असे म्हणून कान पिरगळीत किंवा चिमटा काढीत. पुढे मॅट्रिकला ड्रॉईंग सुटले याचा कोण आनंद झाला होता.
वरील प्रस्तावना लिहिण्याचे कारण , लहानपणीच, चित्रकला अजिबात येत नसताना मला, भिंतीवर पडलेल्या डागांमधे, ढगांमधे, झाडाच्या सावल्यांमधे अनेक चेहेरे, आकृत्या दिसतात याचा शोध लागला. गंमत म्हणजे, चित्रकला येणार्या, माझ्या बहिणींना मी ते चेहेरे दाखवायचा प्रयत्न केला तेंव्हा त्यांनी मला वेड्यात काढले. आपल्याला इतके स्पष्टपणे दिसणारे चेहेरे, प्राण्यांची तोंडे वा आकार इतरांना कसे दिसत नाहीत याचे मला फार आश्चर्य वाटे. वर्गातल्या अनेक मुलांनीही मला वेड्यात काढले आणि चिडवायला सुरवात केली. पण माझी त्या अव्यक्तातून आकार शोधण्याची संवय काही सुटली नाही. जरा मोठा झाल्यावर एकदा, असाच छताकडे पहात उताणा लोळत पडलो होतो. थोडीशी ओल आलेल्या छतामधे मला एकदम गॉगल घातलेला राजेंद्रकुमार दिसला. आणखी थोडावेळ निरीक्षण केल्यावर शेजारच्या 'रे' काकू दिसू लागल्या. आई कामात होती तरी मी तिला घाईघाईने बोलावून आणले. माझा नवीन 'शोध' बघायचा पेशन्स तिच्याकडे होता. आधी तिला काहीच दिसत नव्हते. मग माझ्या हट्टाखातर तिने जमिनीवर झोपून वर बघितले. आणि काय आश्चर्य! तिला ते दोन्ही चेहेरे दिसले अन ती हंसायला लागली. मी तिला परत परत विचारले की मला बरं वाटावं म्हणून तर तू दिसतंय असं म्हणत नाहीस ना ? त्यावर तिने, "नाही रे , खरंच मलाही दिसताहेत ते चेहेरे" असे म्हणून माझी खात्री पटवली.
मला अत्यानंद झाला होता! मला कोणीतरी साक्षीदार मिळाला होता. पुढे मोठा झाल्यावर माझ्या, काही मॉडर्न आर्ट काढणार्या मित्रांकडे मी हे शेअर केले तेंव्हा त्यांनाही सगळीकडे असे आकार दिसतात हे कळले. त्यामुळे या जगांत असे दिसणारा मी एकटाच नाही हे कळल्यामुळे आनंद झाला. पुढे, मला चित्रांची प्रदर्शने पहायची आवड निर्माण झाली. मोठ्या मोठ्या चित्रकारांची प्रदर्शने पहाताना मला याचा फारच उपयोग झाला.
तर अशा या नैसर्गिक आकारांमधे मला जी विविध चित्रकला दिसते तशी तुम्हालाही दिसते का ?
याद्या
4673
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रकटन आवडलं.
अहो
+१
In reply to अहो by मी-सौरभ
तर अशा या नैसर्गिक आकारांमधे
छान
असे विविध आकार नेहमीच दिसतात.
एक छोटेखानी मुक्तक आहे. छान.
>>माणसाची फिगर अजिबातच जमत
मला तर हल्ली मराठी संस्थळावर
हो दिसायचेत ना. अजूनही टक
जरुर दिसतात आकार.. ढगात,
+१
In reply to जरुर दिसतात आकार.. ढगात, by गवि
म्हणून तर एवढं सुंदर लिहितोस
In reply to +१ by नगरीनिरंजन
वाहवा!
In reply to म्हणून तर एवढं सुंदर लिहितोस by गवि
घाबरली तुम्हाला
In reply to वाहवा! by पैसा
छे छे:!
In reply to घाबरली तुम्हाला by अन्या दातार
हो
तुम्ही लिहीलेलं वाचून काल
सुंदर मुक्तक
अरे असे आकार शोधण्यात सगळं बालपण गेलं!