✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

मसाजसेंटरसंबंधी ,माहिती हवी होती..

प
परिकथेतील राजकुमार यांनी
Tue, 01/17/2012 - 14:05  ·  लेख
लेख
नमस्कार, परिकथीय राज्यघटनेनुसार कलम ४२० (६९) डी - to feel freely allover the body चा आधार घेत नजिकच्या काळात आमचे काही कामानिमित्त मसाजसेंटरला जाणे होणार आहे. तसे पाहता खिशात पुरेसे पैसे असले म्हणजे कोणत्याही मसाजसेंटरला मसाज-रेकीची सोय होऊ शकते, परंतु हीच सोय जर आपल्या माहितीच्या ठिकाणी झाली तर अधिक बरे, या हेतूने आम्ही हा चौकशी-धागा लिहीत आहोत. चौकशी क्र १) सदाशिव पेठ रिक्षा स्थानकाच्या जवळपासच्या एखाद्या चांगल्याश्या परंतु त्यातल्या त्यात स्वस्तातल्या मसाजसेंटरसंबंधी कुणी काही माहिती देऊ शकेल का? सध्या थंडी असल्यामुळे तेथे 'हिटर' मिळाल्यास बरे होईल. आमची ऐपत रु ५०० च्या आसपास. चौकशी क्र २) पुण्याच्या मसाजसेंटरविषयी बरेच ऐकले आहे. मसाज, एस्कॉर्ट, फनफ्रेंड इत्यादी नावे ऐकली आहेत. यापैकी सर्वात उत्तम मसाज कुठे मिळते? त्याचप्रमाणे सदाशिव पेठ रिक्षा स्थानकापासून ही स्थाने किती दूर आहेत? चौकशी क्र ३) आमचे काम आटपून आम्हाला काही वेळ मिळणार आहे, त्या वेळात आम्ही मदिरालयाचे दर्शन घेऊ इच्छितो. तरी कृपया जवळील मदिरालयाच्या वेळा, तिर्थपान येण्यासाठी साधारणपणे लागणारा वेळ (गर्दी वगैरे). अर्थात, आम्ही मसाजसेंटरात जाऊ तो दिवस रविवार नसेल. चौकशी क्र ४) पुण्यातील किमान एक किंवा दोन सोनाबाथची माहिती, जिथे उत्तम प्रकारचे सोनाबाथ, मसाज टबबाथ मिळू शकेल. चांगल्या बाथकरता आम्ही शंभर रुपायापर्यंत खर्च करण्यास तयार आहोत. तरी कृपया अशा सोनाबाथची माहिती द्यावी. येथील काही मिपाकर पुणे किंवा आसपासचे तसेच मुंबईचे, पनवेलचे माहीतगार आहेत असा आमचा समज आहे आणि म्हणूनच त्यांच्याकडून या धाग्याला उत्तर मिळेल आणि आमचा मसाजसेंटर दौरा सोयीचा होईल अशी आमची अपेक्षा आहे. कृपया सहकार्य करावे. उत्तराच्या अपेक्षेत, -परा.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
17156 वाचन

💬 प्रतिसाद (57)

प्रतिक्रिया

ब्यांकाक

नितिन थत्ते
Wed, 01/18/2012 - 10:08 नवीन
तुम्हाला फसस्क्लास मसाज करायचा आहे का? . . . . . . . ब्यांकाक ब्यांकाकसारखा मसाज नाही कुठं
  • Log in or register to post comments

हे ठिकाण सदाशिव पेठ रिक्षा

गवि
Wed, 01/18/2012 - 10:10 नवीन
हे ठिकाण सदाशिव पेठ रिक्षा स्थानकापासून किती दूर आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

कृपया सहकार्य करावे.

मृत्युन्जय
Wed, 01/18/2012 - 11:41 नवीन
कृपया सहकार्य करावे. उत्तराच्या अपेक्षेत, -परा. म्हणजे? तु पुर्वी जायचा त्या मसाजसेंटरचे काय झाले?
  • Log in or register to post comments

फोटो + वृत्तांत

नरेश_
Wed, 01/18/2012 - 12:16 नवीन
टाकायला विसरु नकोस म्हणजे झालं. येथील काही मिपाकर पुणे किंवा आसपासचे तसेच मुंबईचे, पनवेलचे माहीतगार आहेत असा आमचा समज आहे आणि म्हणूनच त्यांच्याकडून या धाग्याला उत्तर मिळेल आणि आमचा मसाजसेंटर दौरा सोयीचा होईल अशी आमची अपेक्षा आहे. मी तर बुवा नाममात्र पनवेलकर आहे. माहितगार तर नाहीच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

धागा

sneharani
Wed, 01/18/2012 - 12:37 नवीन
धागा अन् प्रतिसाद दोन्हीही मजेशीर! पाचशेचं बजेट ठेवलयं, नाहीतर फुक्टातली केंद्रे सांगितली असती ब्वा आम्ही!! ;) ;)
  • Log in or register to post comments

फुक्टातली केंद्रे सांगितली

पक पक पक
Wed, 01/18/2012 - 16:17 नवीन
फुक्टातली केंद्रे सांगितली असती ब्वा आम्ही... अहो सांगा कि मग रु ५०० तुम्हाला देतील ते ,सल्लाकेंद्रा चे शुल्क म्हणुन . हाय काय अन नाय काय!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: sneharani

थोडे बजेट अजून वाढवले तर

पाषाणभेद
Sat, 01/21/2012 - 06:57 नवीन
थोडे बजेट अजून वाढवले तर एखाद्या कृझ शिपवर अशी सुविधा असते काय?
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा