Skip to main content

तिळाच्या वड्या ---

लेखक निवेदिता-ताई यांनी शनिवार, 14/01/2012 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य - तिळ दोन वाट्या व शेंगदाणे एक वाटी , गूळ बारीक चिरलेला अडीच वाट्या, साजुक तुप दोन चमचे. पुर्वतयारी -- - तिळ व शेंगदाणे खमंग भाजुन घ्या व त्याचे कूट करुन ठेवा. किचन ओटा स्वच्छ पूसून ठेवा. कॄती --- कढईत गूळ व तूप एकत्र करुन पाक करायला ठेवा. गुळ विरघळ ला की थोडे थोडे बुडबुडे येउ लागतील, लगेच त्यात तिळ व शेंगदाणे कुट घालायला सुरुवात करा, एका हाताने मिश्रण हलवत रहा, त्याचा गोळा होऊ लागेल, तो गोळा किचन ओट्यावर घ्या, भराभरा थापत रहा, हात भाजत असेल तर प्लॆस्टीक कागद घ्या व थापत रहा, नंतर लाटण्याने एकसारख्या लाटा, व लगेचच वड्या पाडा, कारण गार झाल्यावर वड्या पडत नाहीत. झाल्या वड्या तय्यार.... ह्या घ्या वड्या आणी तिळगूळ घ्या गोड गोड बोला.

वाचने 7614
प्रतिक्रिया 21

प्रतिक्रिया

In reply to by निवेदिता-ताई

तुम्ही फोटोच्या लिंक्स नीट दिल्या नव्हत्या. आणि इनपुट फॉर्मॅटही फुल असा द्यावा. ते सगळे नीट केले आहे. :)

मस्त... !! मकरसंक्रांतीच्या सर्व मिपाकरांना हार्दिक शुभेच्छा ....तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला... !!!!

मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा!!

वड्या खमंग दिसतायत. (पाककृती वाचायच्या आधी आम्ही केवळ फोटो पहातो.) पहिलाच फोटो पाहुन आधी वाटलं की चहाच भांड कलंडल की काय ओट्यावर . :) आमाच्या घरी तिळगुळाचे लाडू फसले की त्याच्या वड्या करतात. ;)

आवडलं .. समस्त मिपाकरांना संक्रांतीच्या ग्गोड शुभेच्छा.. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला... !! जिवन हे कोडे आहे जमेल तेवढेच सोडवा...||| ---------------------------------------------------------------------------------------"उन्ही से हमे जबरन मुस्करा के मिलना पडता है हमारी कत्ल की साजिश मे जिनके दिन गुजरते है" ----------------------------------------------------------------------------------------