(माझ्या मित्राची) अशीही एक परिक्रमा
लेखनप्रकार
(माझ्या मित्राची) अशीही एक परिक्रमा.
फारा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्य वेळी पुण्यात रजनीशांच्या आश्रमात अनेक पाश्चिमात्य भक्त येत असत व बरेच जण उन्हाळ्यात नदीच्या पात्रातच तंबू ठोकून रहात असत. कोरेगाव पार्क, ब्ल्यु डायमंड हॉटेल या परिसरात त्यांचा वावर बराच असे.
त्या काळातील ही कथा. आमचा एक कोकणस्थ मित्र त्याच्या एका दोस्ताबरोबर संध्याकाळी , उशिरा जेवणासाठी ब्ल्यु डायमंड हॉटेलात गेला. गोरापान, गुटगुटित, निळ्या डोळ्य़ांचा हा एखादा युरोपिअन म्हणून खपण्याजोगा होता. वृत्तीने दिलदार, कलंदर, व सर्वांत मिळून मिसळून जाणारा. तेथे पिणे-जेवण वगैरे आटोपले. पिणे जरा जास्तच झाले . निघाल्यावर मित्राला म्हणाला, "तू जा, मी जरा पाय मोकळे करून, आरामात जाईन म्हणतो." मग एकटाच फिरतफिरत संगम ब्रीजवर पोचला. खाली नदीच्या पात्राकडे पहातांना त्याला एकदम एक सणक आली. " अरे, सगळे नर्मदेची परिक्रमा करतात. मग आपण आपल्या पुण्याची जीवनदात्री असलेल्या मुठेची परिक्रमा का करू नये ?" बस. पूलाच्या कडेने असलेल्या पायवाटेने पात्रात उतरले. सर्व परित्याग करून परिक्रमा करावयाची म्हणून खिशातले पाकीट फेकून दिले. मग घड्याळ फेकले. कपडे कशाकरिता म्हणून शर्ट, गंजिफ्रॉक, पॅन्ट हेही टाकतटाकत फक्त क्वार्टरपॅन्ट ठेवली. पुढे जातांना अमेरिकन लोकांचे तंबू लागले. त्यांना हे असे ध्यान पाहून वाटले हा आपल्यापैकी कोणीतरी असावा. त्यांचे "हाय" स्विकारीत स्वारी पुढे निघाली व जरा वेळाने एक मोठा खडक पाहून त्यावर ताणून दिली.
सकाळी चार-साडेचारच्या सुमारास जाग आली. नदीवरचा शीतल वारा मनालाही जागृत करू लागला. आता परिक्रमा पुरे हे पटले. नदीच्या पात्रातून वर आले. तिथे एका बंगल्याचा रखवालदार शेकोटी पेटवून हातपाय शेकवत होता. त्याच्या शेजारी जाऊन बसले. गप्पा मारतामारता रखवालदाराच्या लक्षात आले की "साहेबांना" गावात घरी जावयाचे आहे पण "या" स्थितीत सकाळी जाणार कसे ? कपडे नसल्याने पैसे असण्याचा प्रश्नच नव्हता. त्या सज्जन माणसाने सांगितले, " साहेब, काळजी करू नका. शेजारीच माझ्या ओळखीचा एक रिक्षावाला रहातो. मी त्याला सांगतो. तो तुम्हाला घरी सोडील." पाचचा सुमार असावा. त्याने त्या रिक्षावाल्याला उठविले.त्याला सांगितले " साहेब माझ्या ओळखीचे आहेत. शिकलेले, श्रीमंत, आहेत. त्यांना घरी सोड, पैशाची काळजी करू नकोस." रिक्षावाल्याने साहेबांना रिक्षात घातले. येतांना स्टेशनवर २४ तास उघडे असणार्या एका दुकानातून, आपले पैसे खर्च करून एक लुंगी घेऊन दिली. मग ही वरात गावात आली. साहेबांचे घर एका लहानश्या बोळाच्या आत होते. तेथे रिक्षा उभी करून बोळात शिरले. पण लगेच मागे
येऊन रिक्षावाल्याला म्हणाले " अरे, हा बोळ दुसर्या रस्त्याला जाऊन मिळतो. कोणीही तेथून पळून जाऊ शकेल. सज्जन आहेस म्हणून सांगून ठेवतो ". घरी गेल्यावर बेल वाजवली. रात्री गेलेला नवरा सकाळी पावणेसहाला फक्त लुंगी नेसून आलेला पाहून बायकोला थोडे आश्चर्य, पण थोडेच, वाटले असावे. मग मुलाला उठवले. रिक्षाचे भाडे, लुंगीचे पैसे व वर पन्नास रुपये इतकी रक्कम त्यच्याकडे देऊन त्याला खाली धाडले.
तर सकल जनहो, परिक्रमा फक्त नर्मदेचीच करतात असे समजू नका !
शरद
वाचने
3184
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
भारिच.
ह्यॅ ह्यॅ ह्यॅ! :-D
शरदराव,
तुमच्या झक्कड मित्राच्या मुठानदी परिक्रमेची फक्कड गोष्ट वाचून मजा आली.
नर्मदा काय किंवा मुठा काय, परिक्रमेपाठचा 'भाव' महत्त्वाचा, नाही का? :-)
मला तर ही परिचक्रमा वाटली. :)
माझ्याही मनात आलं होतं की मुठेची परिक्रमा करावी म्हणून.. पण दुसर्या कुणीतरी ती अगोदरच पार पाडलेली असल्याने मी कॅन्सल... :D
- पिंगू
In reply to माझ्याही मनात आलं होतं की by पिंगू
>>>>पार पाडलेली असल्याने
कुणी, कुठं? अर्धवट वाचून प्रतिक्रिया देऊ नका आणि हातची संधी दवडू नका. परिक्रमा लवकरात लवकर सुरु करा. ;)
In reply to >>>>पार पाडलेली असल्याने by प्यारे१
जर तुम्ही हा विचार अंमलात आण्याचे ठरविलेच तर मिपावर जाहीर करा. अनेक जण तुमच्या बरोबर साथ द्यावयास येतील व घड्याळ-पाकिट हाती लागल्यावार माघारी फिरतील. पाकिट जड असेल तर शेजारच्या होटेलात जमतीलच.
शरद
वस्तुतः तुमच्या या मित्राचे ब्लू डायमंड आश्रमात एवढे साग्र-संगित अनुष्ठान झालेले असताना,त्याने पुढे त्याच मार्गातील परि-क्रमा करणे गरजेचे व फलदायी झाले असते...आणी जवळपासचा परि-सर पहाता,ते अशक्य(ही) नव्हते... ;-) पण नेम चुकला बिचार्याचा..
आणी नाहक फटके खाल्लन थंडिचे...असो
आणी नाहक फटके खाल्लन थंडिचे...असो In reply to वस्तुतः तुमच्या या मित्राचे by अत्रुप्त आत्मा
भटजीबुवा, हे वेगवेगळे मजेशीर भावचिन्ह कुठून आणताय तुम्ही?
अशीही परिक्रमा!!
या प्राण्याला सर्वसंगपरित्याग केल्याबद्दल घरी बोलणी खावी लागली असतील ती वेगळीच!
जबर्या आठवण.
परिक्रमा म्हणण्यापेक्षा धुंदिक्रमा म्हणणं जास्त योग्य नाही का? ;)
खुद के साथ बातां - रंगा, वरती शरदरावांनी त्यांच्या कोकणस्थ मित्राला "वृत्तीने दिलदार, कलंदर, व सर्वांत मिळून मिसळून जाणारा" असं कसं काय म्हंटलय रे? काही नजरचूक तर नव्हे? ;)
(दिलदार कोकणस्थ) रंगा
In reply to हा हा हा! by चतुरंग
प्रतिसाद अन् खुद के साथ बातां दोन्हीला...
हा किस्सा खरा आहे मानुन धन्य झालो... अस काही करण्याचा विचार आधी कधीच केला नव्हता आणि कुणाकडुन ऐकल हि नव्हत.
पुढच्या वेळी पार्टी झाल्यावर हा किस्सा आठवु नये म्हणजे झाल :-)
-- टुकुल
जबराट...
१ नंबर परीक्रमा.. पण अर्धीच राहिली.. पुन्हा कधी पुर्ण केली तुमच्या मित्राने तर वृत्तांत इथे नक्की लिहा. ;)
किस्सा मस्त आहे. :)
-दिलीप बिरुटे
हा हा...