(माझ्या मित्राची) अशीही एक परिक्रमा
(माझ्या मित्राची) अशीही एक परिक्रमा.
फारा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्य वेळी पुण्यात रजनीशांच्या आश्रमात अनेक पाश्चिमात्य भक्त येत असत व बरेच जण उन्हाळ्यात नदीच्या पात्रातच तंबू ठोकून रहात असत. कोरेगाव पार्क, ब्ल्यु डायमंड हॉटेल या परिसरात त्यांचा वावर बराच असे.
त्या काळातील ही कथा. आमचा एक कोकणस्थ मित्र त्याच्या एका दोस्ताबरोबर संध्याकाळी , उशिरा जेवणासाठी ब्ल्यु डायमंड हॉटेलात गेला. गोरापान, गुटगुटित, निळ्या डोळ्य़ांचा हा एखादा युरोपिअन म्हणून खपण्याजोगा होता. वृत्तीने दिलदार, कलंदर, व सर्वांत मिळून मिसळून जाणारा. तेथे पिणे-जेवण वगैरे आटोपले. पिणे जरा जास्तच झाले . निघाल्यावर मित्राला म्हणाला, "तू जा, मी जरा पाय मोकळे करून, आरामात जाईन म्हणतो." मग एकटाच फिरतफिरत संगम ब्रीजवर पोचला. खाली नदीच्या पात्राकडे पहातांना त्याला एकदम एक सणक आली. " अरे, सगळे नर्मदेची परिक्रमा करतात. मग आपण आपल्या पुण्याची जीवनदात्री असलेल्या मुठेची परिक्रमा का करू नये ?" बस. पूलाच्या कडेने असलेल्या पायवाटेने पात्रात उतरले. सर्व परित्याग करून परिक्रमा करावयाची म्हणून खिशातले पाकीट फेकून दिले. मग घड्याळ फेकले. कपडे कशाकरिता म्हणून शर्ट, गंजिफ्रॉक, पॅन्ट हेही टाकतटाकत फक्त क्वार्टरपॅन्ट ठेवली. पुढे जातांना अमेरिकन लोकांचे तंबू लागले. त्यांना हे असे ध्यान पाहून वाटले हा आपल्यापैकी कोणीतरी असावा. त्यांचे "हाय" स्विकारीत स्वारी पुढे निघाली व जरा वेळाने एक मोठा खडक पाहून त्यावर ताणून दिली.
सकाळी चार-साडेचारच्या सुमारास जाग आली. नदीवरचा शीतल वारा मनालाही जागृत करू लागला. आता परिक्रमा पुरे हे पटले. नदीच्या पात्रातून वर आले. तिथे एका बंगल्याचा रखवालदार शेकोटी पेटवून हातपाय शेकवत होता. त्याच्या शेजारी जाऊन बसले. गप्पा मारतामारता रखवालदाराच्या लक्षात आले की "साहेबांना" गावात घरी जावयाचे आहे पण "या" स्थितीत सकाळी जाणार कसे ? कपडे नसल्याने पैसे असण्याचा प्रश्नच नव्हता. त्या सज्जन माणसाने सांगितले, " साहेब, काळजी करू नका. शेजारीच माझ्या ओळखीचा एक रिक्षावाला रहातो. मी त्याला सांगतो. तो तुम्हाला घरी सोडील." पाचचा सुमार असावा. त्याने त्या रिक्षावाल्याला उठविले.त्याला सांगितले " साहेब माझ्या ओळखीचे आहेत. शिकलेले, श्रीमंत, आहेत. त्यांना घरी सोड, पैशाची काळजी करू नकोस." रिक्षावाल्याने साहेबांना रिक्षात घातले. येतांना स्टेशनवर २४ तास उघडे असणार्या एका दुकानातून, आपले पैसे खर्च करून एक लुंगी घेऊन दिली. मग ही वरात गावात आली. साहेबांचे घर एका लहानश्या बोळाच्या आत होते. तेथे रिक्षा उभी करून बोळात शिरले. पण लगेच मागे
येऊन रिक्षावाल्याला म्हणाले " अरे, हा बोळ दुसर्या रस्त्याला जाऊन मिळतो. कोणीही तेथून पळून जाऊ शकेल. सज्जन आहेस म्हणून सांगून ठेवतो ". घरी गेल्यावर बेल वाजवली. रात्री गेलेला नवरा सकाळी पावणेसहाला फक्त लुंगी नेसून आलेला पाहून बायकोला थोडे आश्चर्य, पण थोडेच, वाटले असावे. मग मुलाला उठवले. रिक्षाचे भाडे, लुंगीचे पैसे व वर पन्नास रुपये इतकी रक्कम त्यच्याकडे देऊन त्याला खाली धाडले.
तर सकल जनहो, परिक्रमा फक्त नर्मदेचीच करतात असे समजू नका !
शरद
वर्गीकरण
हा हा...
ह्यॅ ह्यॅ ह्यॅ!
परिक्रमा?
माझ्याही मनात आलं होतं की
In reply to माझ्याही मनात आलं होतं की by पिंगू
>>>>पार पाडलेली असल्याने
In reply to >>>>पार पाडलेली असल्याने by प्यारे१
मिपावाल्यांची साथ
वस्तुतः तुमच्या या मित्राचे
In reply to वस्तुतः तुमच्या या मित्राचे by अत्रुप्त आत्मा
भावचिन्ह
क्लास!!
हाहाहा!
हा हा हा!
In reply to हा हा हा! by चतुरंग
+१
हा किस्सा खरा आहे मानुन धन्य
जबराट... १ नंबर परीक्रमा.. पण
हाहाहा