Skip to main content

संशयकल्लोळ...सल्ला हवा आहे.

लेखक भिकापाटील यांनी गुरुवार, 05/01/2012 10:09 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, मैत्रिणींनो, काकांनो, मावश्यांनो, आजी-आजोबाणो आणि इतर सर्वांनो, वरील सर्वांस हाय हॅल्लो, नमस्कार, दंडवत इ इ.. तर मला सल्ला हवा आहे. माझी बायको फार म्हणजे फारच संशयी वृत्तीची स्त्री आहे. ती नेहमी माझ्यावर उठसुट संशय घेत असते. माझ्या कार्यालयातील कोण्या स्त्री सहकार्याचा फोन आल्यास 'ही' माझ्याजवळ येउन प्राण काणात गोळा करुन सगळे बोळने ऐकते. नंतर त्यातील एखाद्या वाक्यावरुन मला फैलावर घेते. घराशेजारील कुणी स्त्री माझ्याशी बोलली अथवा माझे तिच्याशी बोलणे झाले तर 'ही' लगेच भांडते. इतकेच काय, ती मला माझ्या मेहुणीशीही बोलून देत नाही. रात्रंदिवस तीच्या मस्तकात संशयकल्लोळ झाला आहे. घरात त्यामुळे नेहेम्मी तणावाचे वातावरण रहाते. संशय घेण्यास तीला अगदी शुल्लक कारणही पुरते. तीने मला सळोकीपळो करुन सोडले आहे. :( तशी ती एकदम चांगली आहे. तरी कृपया मला सल्ला द्या. मी काय करु?

वाचने 22882
प्रतिक्रिया 100

प्रतिक्रिया

In reply to by प्यारे१

केव्हांच झाले आहे. आता तिकीटे कुठली विकतोस. :~ :-~ :puzzled: आणि आम्ही पॉपकॉर्नसुद्धा बरोबरच आणले होते. From Drop Box" alt="" />

In reply to by भीमाईचा पिपळ्या.

यानिमित्ताने पराशेठ यांना एकच सांगू इच्छितो, मिपा हा समाजमनाचा आरसा आहे. त्यात समाजाच्या वेगवेगळ्या स्तरीतील प्रतिबिंब बघायला मिळेल. काही व्यक्तिंना आपले प्रोब्लेम शेअर करण्यासाठी जवळचे विश्वासाचे कोणी नसते किंवा प्रोब्लेम विसरण्यासाठी काही लोक डेली सायंकाळी तिर्थप्राशन करतात तशा सवयी त्यांना नसतात. तुम्ही स्वतःला फार मोठे नावाजलेले लेखक समजता काय? एका फुटकळ पुस्तकाच्या जिवावर मिशांना तूप लावून फिरणारे तुम्ही. दुसर्‍यांची लायकी काढण्याचे पातक करु नका. तसेच काही बालिश लोकांनी सं मं ला इथे वारंवार लक्ष देण्याची गळ घातली आहे. त्या बालिश आणि तितक्याच बावळट लोकांना एकच सांगतो. इथले संपादकही सर्व सामान्य सभासदांमधूनच पुढे आलेले सुज्ञ लोक आहेत. मालकाने आपल्यावर कुणी बध्दकोष्ठी विचारजंत लादलेले/नेमलेले तुघलकी लोक नाहीत हे लक्षात ठेवा. परत एकदा म्हणतो मिपा हा समाजमनाचा आरसा आहे. हा कुण्या पेठेतला (शुध्द)देशी तुपातल्या समाजाचे मुखपत्र नाही.
अप्रतिम ! काय तो आवेश... काय ते तळपते शब्दशस्त्र. बसा बसा, दमला असाल नै ? येवढा राग बरा नव्हे. आणि ते समाजमनाचा आरसा, बद्धकोष्ठ, मुखपत्र वैग्रे वैग्रे शब्द वापरु नका हो, आम्हाला का नै आमच्या एका हरवलेला आणि रागावून गेलेल्या मित्राची खूप आठवण येते. मग आम्हाला भरुन येते.. मग आम्ही सदगदित होतो.. मग आम्ही पाणवठ्याकडे निघतो... मग अंमळ एखाद-दोन पेग जास्ती होतात... मग सकाळी आम्हाला ह्यांग चा ओव्हर येतो.. मग दुपारपर्यंत चिडचिड होते... मग संध्याकाळी वेळे आधीच उतार्‍याच्या नावाखाली आम्ही पुन्हा तिर्थप्राशनाला जातो.. मग.. असो.. नका हो... नका असे वागु. तुमच्यामुळे आम्हाला फार मानसिक आणि हो आर्थिक त्रास देखील होतो. देवबाप्पा तुम्हाला कद्दी कद्दी क्षमा करणार नाही. वैट आहात तुम्ही. व्हिस्कीच्या बाटल्या

In reply to by परिकथेतील राजकुमार

यावरुन परा यांना मिशा आहेत व ते त्यावर तूप लावून फिरत असतात हे नव्याने कळले.

In reply to by परिकथेतील राजकुमार

मा. पराशेठ तुम्हाला दुखावण्याचा हेतू नव्हता. तुमच्या वरच्या पोष्टीत लायकी वगैरे शब्द आल्यामुळे मी वैयक्तिक प्रतिसाद लिहीला. संचालकमंडळाला विनंती आहे की क्रुपया माझा वरील प्र. उडवुन टाकावा.

In reply to by मी-सौरभ

आयला, हे मॅच फिक्षिंग आहे राव... सौर्‍या, माझे सगळेच बुडालेत आणि तुला तुझ्या पैशाची फिकीर का रे? आधी चिंतोबांनी सांगितलं आता खुद्द पिपळ्यानंच माघार घेतली की रे... :( पार देशोधडीला लागणार रे आपण च्यायला! या पर्‍या 'वाघा'च्या 'राज'कारणामुळं बोंब होणार आमच्या विक्रीची. खरंतर त्या 'फुटकळ पुस्तक प्रकाशना'च्या वेळीच लक्षात आलेलं. कसा विसरलो काही कळेना. ;)

In reply to by प्यारे१

आता म्होरच्या टायमाला डिस्काउंट दे मंजे झालं.. बाकी अंतू म्हंतो तसं 'धंदा म्हट्ल की त्यात चालणं-बुडणं पण आलचं' अन त्यात म्हराटी मानुस म्हटल्यावर.......... ;)

संशय घेण्यास तीला अगदी शुल्लक कारणही पुरते. तीने मला सळोकीपळो करुन सोडले आहे. Sad तशी ती एकदम चांगली आहे.
हत्तिच्या एव्हंडच ना ? मग तिचा संशय दुर का करत नाहि तुम्ही .... बिधांस्त अफेअर्स सुरु करा... संशयाला जागाच ठेउ नका. सगळेच खुष. (तुम्हाला हेच उत्तर अपेक्षित आहे हे माहित असल्यानं...)

प्रतिक्रियांमुळे करमणूक झाली. असो, खरेच सल्ला हवा असेल तर असे वागून बघा. बर्‍याचदा आपण समोरच्या व्यक्तीच्या वागण्याबद्दल किंवा रिअ‍ॅक्शनबद्दल आधीच काही तरी समज करून घेतलेला असतो, आणि त्या समजाला अनुसरून आपण त्या व्यक्तीचे प्रत्येक वागणे-बोलणे बघत असतो (आणि जजमेंट करत असतो) म्हणजे तुमची पत्नी संशयी नसेलच असे नाही पण एकदा नीट विचार करून बघा की तुम्ही 'ती संशयी आहे' हे स्वतःच स्वतःच्या मनावर बिंबवले आहे काय? तसे असेल तर हे विचार तुम्हाला बदलता येतील. विचार बदला, तुमच्याही नकळत तुमची कृती बदलेल. आणि परिणामी तुमच्या पत्नीचीही. दुसरे म्हणजे, व्हॉट अदर्स थिंक ऑफ यू, इज नन ऑफ युअर बिझनेस- हे वाक्य पत्नीच्या बाबतही लागू पडेलसे वाटते. तुमच्या मनात तुमच्या मेव्हणीशी बोलताना, ऑफिसमधल्या स्त्री सहकार्‍यांशी बोलताना काही वेगळे (ज्यावर संशय घेतला जाऊ शकतो) असे विचार नसतील, तर तुमची पत्नी काय म्हणते आणि काय विचार करते याचा तुम्ही विचार करून स्वतःच्या डोक्याचा भुगा करून घेऊ नका. तिसरे- याविषयी तुम्ही प्रत्यक्ष तुमच्या पत्नीशी शांतपणे बोलून बघा. त्यांना नक्की काय वाटते? काय प्रॉब्लेम आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न करा. कदाचित तुम्ही हवा तितका वेळ त्यांना देत नसाल (एक शक्यता) प्रत्यक्ष बोलून जितके प्रॉब्लेम्स लगेच सुटतात तितकेच किंवा त्याहूनही अधिक ते न बोलता काहीतरी समज करून घेतल्याने चिघळतात. -चैतन्य.

In reply to by चैतन्य दीक्षित

पहिले दोन मुद्दे नुसतेच अति थिऑरिटिकल आहेत. मॅनेजमेंट किंवा अध्यात्मिक ट्रेनिंगमधल्यासारखे. धागाकर्त्याला स्वतःच विचार करुन भुगा करुन घेण्याची सवय नसावी असं स्पष्ट दिसतंय. त्रास हा समोरुन होतोय.. मनातल्या मनात नव्हे. बाकी, "त्रास हा इतर कोणी देत नाही, आपणच आपल्याला देतो",किंवा "त्रास करुन न घेणं आपल्यावर आहे" वगैरे हे क्वोटेबल क्वोट म्हणून ठीक असलं तरी त्रास बर्‍याचदा बाह्य घटकांमुळे होतो हेच खरं. तिसरा मुद्दा मात्र चपखल आहे.. त्याबद्दल दाद देत आहे.

तुम्हाला तर आनंद व्हायला पाहिजे.हे दाखवत कि तुमची बायको तुमच्यावर किती प्रेम करते, ती तुमच्याशिवाय राहू शकत नाही आणि म्हणूनच ती तुम्हाला दुसर्या कोणाबरोबर शेअर झालेलं बघू शकत नाही.तिला अस वाटत कि आपल्या नवर्याने आपल्याला वेळ द्यावा, प्रत्येक गोष्ट आपल्याला सांगावी, तिच्या गोष्टी,तिचे विचार तुम्ही ऐकावेत अस तिला वाटत असावं.तुम्ही दुसर्या कोनाबोबर बोललात कदाचित तुम्ही तिच्यापासून लांब जाल अशी तिला भीती वाटत असेल.जिथे प्रेम असत तिथे भीतीहि असतेच.तिला समजून घ्या, तिची भीती समजून घ्या. तला विश्वास होऊ द्यात कि तुम्ही तिच्यावर खूप प्रेम करता आणि तुम्ही तिच्याशिवाय राहू शकत नाही.कामातून वेळ काढून तिला एखादा फोने करा.तुमच्यावर विश्वास बसला कि आपोआपच संशय नाहीसा होईल.मुळात संशय म्हणजेच विश्वासाची कमी.तुम्ही प्रयत्न करा तिच्या मनात हि भीती का आहे कि तुम्ही तिच्यापासून लांब जाल? तिची भीती नाहीशी करण्याचा प्रयत्न करा.आशा करते कि तुमच्या प्रत्नांना यश येईल!

In reply to by किचेन

बाकी सोडा, हा वरचा प्रतिसाद तुमच्या बायकोल दररोज सकाळी १२ वेळा वाचायला अन १२ वेळा चुका न करता लिहायला लावा, सगळं लफडं मिटेल.

In reply to by ५० फक्त

बाकी सोडा, हा वरचा प्रतिसाद तुमच्या बायकोल दररोज सकाळी १२ वेळा वाचायला अन १२ वेळा चुका न करता लिहायला लावा, सगळं लफडं मिटेल. >>>उशिरा या धाग्यावर आलो...पण आल्या आल्याच........मेलोsss :-D

कुत्रा कारमागे पळाला म्हणून कोणी त्याला कारमधे बसवत नाही

संशयी स्वभावावर औषध अस जगतातच नाही ते मिपावर कस सापडेल ? आत्महत्या मुळीच करून नका. एखाद सेशन समूपदेशाका कडे / मनोवीकर तज्ञ याच्या कडे होऊद्या , काही तरी फरक पडेलच बाकी प्रतिष्ठित (?) मिपा-कारांनी नवीन सदस्याच्या नावावर आणि टोपण नावावर असे बाष्कळ विनोद करावेत ह्याची शरम वाटली !

In reply to by माझीही शॅम्पेन

ते निळ्या अक्षरातले कशाबद्दल लिहिले आहेस रे ? दुसऱ्या धाग्यावरील घडामोडीबद्दल की इथल्या ??

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

इथल्याच , वरती पाहा .. आडनाववर आणि नावावर अश्लाग्य विनोद केले गेले आहेत आणि त्याला चक्क दाद पण तितक्याच उस्फुर्तपणे दिली गेली आहे..

अजून योग्य सल्ला मिळालेला दिसत नाही. तसाही १०० झाल्याशिवाय तो मिळणार नाहीच! ;) मी काय म्हणते, एखादे १६ सोमवार सारखे व्रत का करत नाही?

नमस्कार मित्रांनो. माझ्या पहिल्या वहिल्या धाग्याला आपण सर्वांनी भरभरुन प्रेम दिले. अनेक खरेखुरे सल्ले दिले. काही मित्रांनी कोपरखळ्या मारल्या. काहींनी चक्क लायकी काढली तर काही सह्रुदयांनी माझ्या सुज्ञपणावर संशय घेतला. विषेश म्हणजे मला किचेनतैचा सल्ला फार मोलाचा वाटला व त्यावर मि नक्कीच कार्यवाही करत आहे. मी सर्वांचा ऋणीआहे.

In reply to by भिकापाटील

किचेनतैचा सल्ला फार मोलाचा वाटला व त्यावर मि नक्कीच कार्यवाही करत आहे. चला. शेवटी कोणाचा तरी सल्ला पटला हेही नसे थोडके. त्या सल्ल्यानुसार वागून बायकोच्या वागण्यात काय आणि कसा कसा फरक पडला (फरक पडला तर) ह्यावरही एक सविस्तर धागा काढून उपकृत करावे म्हणजे सर्व सल्लागारांचे ज्ञान विश्व विस्तारेल. धन्यवाद.

In reply to by प्रभाकर पेठकर

मा. किचेनतैंचा विजय असो, झिंदाबाद झिंदाबाद किचनतै झिंदाबाद. चला आता मिपाला मा. गवि आणि मा. किचेनतै, असे दोन संसारी सल्लागार मिळाले असं म्हणावं लागेल.

In reply to by ५० फक्त

तै आणी काकांचा सल्ला असा धागा सुरु करावा अशी संबंधितांना नम्र विनंती...