Skip to main content

स्टफ्ड चेरी टोमॅटो

स्टफ्ड चेरी टोमॅटो

लेखक Mrunalini
Published on शुक्रवार, 06/01/2012
साहित्यः चेरी टोमॅटो - १ पाकीट सॉफ्ट चीज - १ पाकीट लसुण - २ पाकळ्या कांद्याची पात - १/४ कप बारीक चिरुन. (फक्त पात कांदा नाही) काळी मिरी पावडर - १/२ चमचा लिंबाचा रस - १/२ चमचा ऑलिव्ह ऑइल - १ चमचा मिठ चवीनुसार कृती: १. चेरी टोमॅटो धुवुन, पुसुन घ्यावेत. त्याचा देठाचा भाग कापावा. तसाच एकदम थोडा खालचा भाग ही कापावा, ज्यामुळे टोमॅटो निट उभे राहतील. २. देठाच्या भागाकडुन टोमॅटोच्या आतला सगळा गर काढुन घ्यावा व टोमॅटो फ्रिज मधे ठेवुन द्यावे. ३. चीज एका बाउल मधे काढुन घ्यावे. त्यात २ क्रश केलेल्या लसुण पाकळ्या, कांद्याची पात, काळी मिरी पावडर, लिंबाचा रस, ऑलिव्ह ऑइल व चवीप्रमाणे मिठ टाकुन मिक्स करुन घ्यावे. ४. एका piping bag मधे हे चीज भरावे. आता ह्या piping bag च्या मदतीने सगळ्या टोमॅटोज मधे हे चीज भरावे व फ्रिज मधे ५-१० मिनिटे ठेवुन द्यावे. ५. बारीक चिरलेल्या कांद्याच्या पातीने सजवुन टोमॅटो serve करावेत. ६. हे टोमॅटोज रेड वाइन सोबत मस्त लागतात. t1 t2

याद्या 8833
प्रतिक्रिया 25

प्रतिक्रिया

हाय हाय..काय क्लास प्रेझेंट केलेत हो,हे भरीव टोमॅटो... दुसर्‍या फोटोतल्या डिशकडे नुसतं पाहिलं तरी एक निवांत संध्याकाळ मनःचक्षूंसमोर लगेच प्रकट होते... :-)

आहाहा!!! काय सुदंर प्रेझेंटेशन आहे हो... व्वा.. झकासच.....:) एक साधी सोपी पाकृ पण दिसायला एकदम 'रीच' अशी 'साईड-डिश'.... :) (फोटो पाहुन एखादं 'डिझर्ट' आहे असंच वाटतं)

मला वाटते यात पुदिन्याची पाने पण छान लागतील.

अगदी हुच्चभ्रू प्रकार वाटतो आहे! सुंदर फोटो!

सगळ्यांचे धन्यवाद.. :) मी फक्त पाकृ बनवते आणि सजवते. फोटो काढायचे काम मात्र माझा नवरा करतो. :) @ लीमाउजेट..--- हो ह्यात पुदिन्याचे पान पण छान लागेल. तसेच parsley पण चांगली लागते.

अरे मस्तचं पाकृ :) ह्यात Chives पण छान लागेल

कसले मोहक फोटो आहेत. हात पुढे करून पटकन उचलून घ्यावेसे वाटतायेत! पाकृ पण सोपीच आहे. कोणत्या प्रकारचं चीज यात जास्त चांगलं लागतं?

In reply to by स्मिता.

ह्यात कुठलेही सॉफ्ट चीज किंवा स्प्रेड चीज चालेल..... मग ते प्लेन किंवा कुठल्याही फ्लेवरचे पण चांगले लागते.

फोटो पाहूनच समाधान झालं. चीजच्या वाटेला कोलेस्टेरॉलच्या भीतीने जात नाही. :(

छ्या ह्या असल्या धाग्यावर कार प्रतिसाद देणार, हल्ली शब्दच सुचत नाहीत, असो. पाकृ वाचावीशी वाटलीच नाही, यावेळी जबरा आणि खुप छान हे रिप्लाय मा. श्री. स्वप्निल यांचेसाठी, सानिकातै तुम्हाला नेक्स्ट टाईम.

In reply to by सानिकास्वप्निल

हा हा हा... बरोबर... बहुतेक ५० फक्त गल्ली चुकले... २ मिनिटे मला पण कळले नाही, माझ्या नवर्‍याच नाव स्वपनील कधी पासुन झाल ते...पण काय हरकत नाही... ५० फक्त तुमच्या भावना पोचल्या... ;) धन्यवाद. :)