Skip to main content

(अ‍ॅन इव्हिनिंग ऑन दिवेआगर बीच)

लेखक प्रचेतस यांनी गुरुवार, 05/01/2012 22:44 या दिवशी प्रकाशित केले.
हे माझ्या कॅननच्या कॅमेर्‍यातून आलेले काही फोटो. दिवेआगरच्या किनार्‍यावर सूर्यास्त पहात असतानाचे फोटो आहेत. कॅमेरा चे सेटिंग मॅन्युअल होते. त्यामुळे फोटो सोनेरी रंगात रंगवल्या प्रमाणे दिसताहेत. फोटो डेस्कटॉपवर डाऊनलोड करायच्या आधीच ही जादू मला उमजली होती. अ‍ॅन इव्हिनिंग ऑन दिवेआगर बीच १ अ‍ॅन इव्हिनिंग ऑन दिवेआगर बीच २
लेखनविषय:

वाचने 5695
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

'हे माझ्या कॅननच्या कॅमेर्‍यातून आलेले काही फोटो. दिवेआगरच्या किनार्‍यावर सूर्यास्त पहात असतानाचे फोटो आहेत.' याचा अर्थ तुम्ही सुर्यास्त पाहात होता, अन तुमच्या कॅननच्या कॅमेरात हे फोटो आपोआप आले असं म्हणायचं आहे का तुम्हाला ? कारण तुमच्या कॅमेरात असे आपोआप आलेले फोटो पाहिले आहेत नाणेघाटात, टाकु काय इथे ?

In reply to by ५० फक्त

याचा अर्थ तुम्ही सुर्यास्त पाहात होता, अन तुमच्या कॅननच्या कॅमेरात हे फोटो आपोआप आले असं म्हणायचं आहे का तुम्हाला ?
काय हे पन्नासराव, तुम्हाला अजूनही शंका आहे? एव्हाना वल्लीच्या कॅमेर्‍यात आपोआप फोटो येतात याची तुम्हाला खात्री पटायला हवी होती.
कारण तुमच्या कॅमेरात असे आपोआप आलेले फोटो पाहिले आहेत नाणेघाटात, टाकु काय इथे ?
नाणेघाटाची सहल (आणि त्या सहलीचे फोटोसुद्धा ;) ) झक्कासच होते. पण आता कोकणात जाऊन फोटो काढण्याचे मनावर घ्या ब्वॉ !!! वल्लीशेठ, दोन्ही फोटो एकदम झक्कास !!!

मस्त फोटो. सूर्य डोंगरामागे किंवा समुद्रात मावळत नसल्याने बरे वाटले. विडंबन झकास!;) भारतीय घटनेने दिलेल्या अधिकारामुळे हसले.

संपादक मंडळ आणि सरपंचाना विनंती मेनुबारमधे "विडंबन" हा पर्याय द्यावा. (मेनुबार म्हणल्यावर होणारा गोंधळ टाळण्यासाठी तो काय हे खाली देत आहे.) :~ :-~ :puzzled: स्वगृह साहित्य चर्चा काव्य पाककृती कलादालन भटकंती घोषणा नवे लेखन मदत पान विडंबन

दोन्ही फोटो सुरेखच .. दिवेआगर... अप्रतिम ठिकाण आहे... एक ट्रेक करायला हरकत नाही :)

In reply to by स्पा

स्पाडू: तुला ट्रिप म्हणायचं होतं का??? -------- मद्यं मोक्षमुक्ती साधनं!! रम व्हिस्की व्हिस्की व्हिस्की: !! ;)

In reply to by मी-सौरभ

मद्यं मोक्षमुक्ती साधनं!! रम व्हिस्की व्हिस्की व्हिस्की: !!
ह्यॅ ह्यॅ ह्यॅ.... जेवढा साधा वाटतो तेवढा साधा नाहियेस म्हणजे तु!

In reply to by मी-सौरभ

स्पाडू: तुला ट्रिप म्हणायचं होतं का??? तो जिथे जातो तो ट्रेकच असतो. एक नंबरच्या प्लॅटफोर्म वरून ट्रेक करून ४ नंबरच्या प्लॅतफॉर्म वर जातो

In reply to by मी-सौरभ

अरे तो फक्त असं म्हणेल, ठरलं की म्हणेल. दुसरा किंवा चौथा ठरवा/ पहिल्या, तिसर्‍या किंवा पाचव्यालाच जमेल. इत्यादि,इत्यादि .

दोन्हीही एकदम मस्त आहेत.