मिपावर कसे टंकावे हे सांगितलात तर मांसाहारी पदार्थांच्या आणि गोड-धोडच्या पाककृती टाकेल अशी लालूच दाखवली होती.तुम्ही सर्वांनी मला खूप मदत केलीत त्याबद्दल धन्यवाद! तसेच नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा.नवीन वर्षात खूप ख,खायला घाला आणि मिपावर भरपूर लेखन करा.
काल घरच्या घरी जी पार्टी होती त्यात मी केलेलं हे चिकन.
साहित्य:
१. गरम मसाला:
४-५ लवंग,दालचिनी,काळी मिरी,मसाल्याची विलायची, १ चमचा खसखस,१ तमालपत्र ,१ चमचा जिरे व धने.
वरील सर्व साहित्य व्यवस्थित भाजून मिक्सरवर बारीक करून घ्यावे.
२.वाटन:
५-६ मिरच्या,७-८ लसणाच्या पाकळ्या,१ कांदा उभा चिरलेला,१ टोमाटो,१/२ इंच आले,१/२ वाटी ओलं खोबर,१०-१२ कडीपत्त्याची पान,कोथिंबीर.
वरील सर्व साहित्य थोड्या तेलात गुलाबी किवा ब्राउन रंग येईपर्यंत परतावा.नंतर मिक्सरवर बारीक करावा.
३.इतर:
हळद, तिखट, मीठ,१ वाटी दही आणि १/२ किलो चिकन
पाककृती:
१.वाटलेल्या मसाल्यात,गरम मसाला, दही,हळद,तिखट, थोडेसे मीठ एकत्र करून घ्यावे.
२. चिकन साफ करून घ्यावे .त्यामध्ये वरचा मसाला नीट चोळून अर्धा तास मुरत ठेवावे.
३. अर्धा तासानंतर त्यातील मोठे व मध्यम आकाराचे तुकडे बाजूला काढावेत आणि बारीक तुकडे बाजूला काढावेत.
४.रस्शासाठी: एका कढाईत तेल गरम करून, त्यात वाटणाचा उरलेला अर्धा मसाला टाकावा.नीट परतून चवीनुसार तिखट टाकावे .चिकनचे मोठे व मध्यम आकाराचे तुकडे त्यात हवे त्या प्रमाणात पाणी टाकावे.नीट शिजवून घ्यावे.
५ : सुक्यासाठी : एक कांदा बारीक चिरून गुलाबी परतून घ्यावा,त्यात उरलेला वाटण टाकावे. थोडे तिखट आणि मीठ टाकून त्यात अगदी थोडे पाणी टाकावे. नंतर त्यात चिकनचे बारीक तुकडे टाकून शिजण्यास ठेवावे.
वाचने
10877
प्रतिक्रिया
30
मिसळपाव
प्रतिक्रिया
आपण येथे दिलेली ही पहिलीच
पुढिल पाक्रु, शुभेच्छा
तुम्हाला पुढच्याचीच घाई, आधी
In reply to पुढिल पाक्रु, शुभेच्छा by पियुशा
छाळ्न ,सुंद्ळ्र ,लय भारीळ
अभिनंदन!
मस्त
आवडले
होय चिकन मुरते. म्हणून वेळ
In reply to आवडले by नीलकांत
चॅलेंज
In reply to होय चिकन मुरते. म्हणून वेळ by विश्वनाथ मेहेंदळे
अन्या भाऊ, मी कौशल्याचे काम
In reply to चॅलेंज by अन्या दातार
मेरीनेशन
In reply to होय चिकन मुरते. म्हणून वेळ by विश्वनाथ मेहेंदळे
शेफ चेतन यांच्या सौजन्याने
In reply to मेरीनेशन by किचेन
मी केलीये.
In reply to शेफ चेतन यांच्या सौजन्याने by विश्वनाथ मेहेंदळे
अच्छा,
In reply to मी केलीये. by किचेन
अवांतरः (मी 'की'र्ति अनि तो
In reply to अच्छा, by प्रास
प्रेषक किचेन गुरुवार,
In reply to अवांतरः (मी 'की'र्ति अनि तो by किचेन
मिपावाले एका ओळीत शुद्ध
In reply to प्रेषक किचेन गुरुवार, by गणपा
हर हर !!!! काय पाळी आली
In reply to मिपावाले एका ओळीत शुद्ध by किचेन
छान छान.
पुधच्या भागात चुका
In reply to छान छान. by चिंतामणी
@या वेळेस चुका आणि चिकन पोटात
In reply to पुधच्या भागात चुका by किचेन
मस्त प्रतिसाद !
In reply to पुधच्या भागात चुका by किचेन
छान फोटो!
छान !
फारच छान..
मस्त पाकॄ आहे.
रस्सा मस्त झणझणीत दिसतोय.
मस्त
आपल्या या पहिल्याच
पहिलीच पाक्रु मस्तच दिसत आहे.