Skip to main content

ती .....

लेखक फिझा यांनी मंगळवार, 03/01/2012 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
ती ..... जमलेच होते तिला मस्त जगायला आखून दिलेल्या चौकटीत मुक्त फिरायला खंत नव्हती कसली आभाळ तिचेच होते दोरी असली तरीही, पतंगाचे रंग तिचेच होते ..... होईलच पहाट वाट बघुनी होईलच सकाळ मग रंग भरुनी आकाश कधी झोपते का असे विचारायची उगीचच हसून हसून मग रडायची ...... जमलेच होते तिला हसायला आणि खोटे खोटे रुसायला संगतीला बरेच होते पण .. साथ कुणाचीच नव्हती जगायला........ पतंग असूनही पक्षासारखी उडायची दुरूनच मग क्षितीज पहायची जगण्यासाठी धडपड नसायची तिची हसण्यासाठी मात्र ......कारणे शोधायची ती....... हातात येईपर्यंत प्रत्येक गोष्ट निसटायची हट्ट नव्हता कसलाच, पण तगमग मात्र व्हायची स्वप्नातील राजकुमार येणार होता कुठून तरी त्याच्यासवे जायचे होते स्वप्ननगरी ..... पडेल का भुरळ राजकुमाराला त्या रानफुलाची कळतील का त्याला बंधने त्या प्रेमाची कळतील का भावना आणि लय ती सुरांची ..... एका नजरेतून सांगेल ती गोष्ट गतजन्माची उमगेल मग त्यालाही ती ओढ श्वासांची !!
लेखनविषय:

वाचने 1244
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

पतंग असूनही पक्षासारखी उडायची दुरूनच मग क्षितीज पहायची जगण्यासाठी धडपड नसायची तिची हसण्यासाठी मात्र ......कारणे शोधायची ती.......
सुरेख! सुंदर!!

एवढंच म्हणेन फारच सुंदर :)