आयुष्य म्हंजे...
एका चांगल्या महागड्या हॉटेलातील जेवण,
बील दुसरा कोणी भरणारा असेल तर आनंद देणार
व आपल्याला भराव लागणार असेल तर घाम फोडणार...
आयुष्य म्हंजे...
पहिल्या पगारातुन मुलाने आईवडिलाना प्रेमाने आणलेलि भेटवस्तु
व ति भेटवस्तु घेताना मुलाच्या कौतुकाने आलेले आइवडिलांच्या
डोळ्यातले आनंदाचे अश्रु...
आयुष्य म्हंजे...
त्याच मुलाकडुन लग्न झाल्यानंतर बायकोला आइवडिल घरात नको
म्हणुन म्हातार्या आईवडिलाना वॄधाश्रमात पाठवणारा तोच मुलगा
व वॄधाश्रमात जाव लागत म्हणुन मनापासुन घाबरलेले तेच त्याचे आईवडिल
व त्यामुळि आलेले त्यांच्या डोळ्यातील दुखाने आलेले अश्रु...
आयुष्य म्हंजे...
ऑफीसातील कामाच्या ओझ्याने खंगत चाललेला नवरा
व वाढणार्या महागाईत घर सांभाळताना नवर्याला पगार कमी
म्हणुन सतत चिडचिड करणारि पण त्याचा संसार मन लावुन करणारि त्याचि बायको...
आयुष्य म्हंजे...
लोक उगाच नाव ठेवतिल म्हणुन नविन जन्माला आलेलि मुलगी,
अनाथ आश्रमात सोडुन जाणारे क्रुर आईवडिल
व तिच मुलगी , मुल होउ शकत नाहि म्हणुन
त्याच अनाथ आश्रमातुन दत्तक घेणारे व तिच्यावर जिवापाड प्रेम करणारे एक प्रेमळ जोडप...
आणि आयुष्य म्हंजे...
मित्रांबरोबर खिश्यात पैसे नसताना सगळ्यांनि मिळुन प्यायलेला
एक कटिंग चहा खरा तर थोडाच पण मनापासुन आनंद देणारा.....
वाचन संख्या
2012
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
लोक उगाच नाव ठेवतिल म्हणुन
पियुशाजि..
In reply to लोक उगाच नाव ठेवतिल म्हणुन by पियुशा
पियुशाजि धन्यवाद
In reply to पियुशाजि.. by निश
छान मुक्तक
ज्योति़जि मि आपला आभारि आहे.
In reply to छान मुक्तक by पैसा
मांडणी आणी आशय,दोन्ही उत्तम
अत्रुप्त आत्मा साहेब धन्यवाद
In reply to मांडणी आणी आशय,दोन्ही उत्तम by अत्रुप्त आत्मा
छान आशय
पाषाणभेद साहेब धन्यवाद कधि
In reply to छान आशय by पाषाणभेद