पांडूरंग माझा गरीब राहू द्या
पांडूरंग माझा गरीब राहू द्या
गरीब राहू द्या
गरीबांना पाहू द्या
पांडूरंग माझा गरीब राहू द्या ||धृ||
नका अर्पू त्याला सोने अन नाणे
त्याला नसे त्याचे देणे घेणे
आपलीच श्रीमंती
आपलीच श्रीमंती
उगा जगाला का दावता ||१||
नका लावू त्याला सुखाचे डोहाळे
नका करू त्याचे उत्सवी सोहळे
तोच दाता असता
तोच दाता असता
कशाला त्याला देणगी तुम्ही देता? ||२||
भक्तासाठी देव पहा थांबला विटेवरी
भक्तीसाठी कर दोन्ही ठेवीले कटेवरी
नको दुजे काही देणे
नको दुजे काही देणे
काही न घेण्यासाठी बध्द करी हाता ||३||
- पाभे
काव्यरस
वाचने
1677
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान...गाडगे महाराजांच्या
मस्त हो पाभेमहाराज
अप्रतिम कविता
प्रबोधन...
उलट पांडुरंगाला भरघोस दान
उदात्त विचार...
In reply to उलट पांडुरंगाला भरघोस दान by अविनाशकुलकर्णी
काव्य अप्रतिम