Skip to main content

गोल्डन फ्राइड प्रॉन्स

लेखक सुजित फाळके यांनी सोमवार, 02/01/2012 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
माझी मिसळ-पाव वरील पहिली पाककृती माझी प्रिय बायको दीप्ती हिच्यासाठी... साहित्य: १. टाइगर प्रॉन्स २. बेसन ३. मैदा ४. तिखट व मीठ (चवीनुसार) ५. कोथिंबीर ६. लिंबू पाकृ: १. एका भांड्यात ३/४ बेसन व १/४ मैदाचे मिश्रण एकत्र करून घ्यावे. २. ह्या मिश्रण मध्ये पाणी, मीठ व तिखट टाकून थोडे घट्ट मिश्रण तयार करावे. ३. ह्या मिश्रण मध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर व लिंबू पिळून एकत्र करून घ्यावे. ४. त्यात प्रॉन्स टाकून थोड्या वेळ फ्रिड्ज मध्ये ठेवावे. ५. नंतर एका कढईत तेल घेऊन गरम करायला ठेवावे. ६. प्रॉन्स गरम तेलात गोल्डन रंग येई पर्यंत तळून घ्यावे. ७. गरम गरम गोल्डन फ्राइड प्रॉन्स सेझवान सॉस बरोबर सर्व करावेत.

वाचने 6770
प्रतिक्रिया 24

प्रतिक्रिया

मिपावर स्वागत! बेसन असल्यामुळे याना कोलंबीची भजी म्हणावे काय? (तुम्ही किंवा तुमची दीप्ती आयतीमधे आहात का?)

In reply to by पैसा

होय कोलांबीची भजी म्हणायास हरकत नाही. मी प्रथम ही डिश गोवा मध्ये खाल्ली होती. त्यांनी ठेवलेले नाव मी कंटिन्यू केले आहे. (आणि होय मी आय.ती. मध्ये आहे.)

In reply to by कपिलमुनी

आयटी वाले किंवा आयटी वाल्या बायकांचे नवरे एवढ्या नीटनेटक्या पाकृ देतात!

पहिली पाककृती माझी प्रिय बायको दीप्ती हिच्यासाठी... मग, आम्ही काय करावे अशी इच्छा आहे. पाककृती बायकोसाठी असल्या कारणाने वाचलीही नाही. दुसर्‍यांची प्रेमपत्रे वाचू नयेत, असे म्हणतात.

In reply to by गवि

बेसन भरपूर तेल शोषून घेते. कढई मधून काढल्यावर मी नेहेमी पेपर टॉवेल काढून तेल टॉवेल वर शोषून घेतो. फोटो काढन्याआधी मी हे केले नव्हते.

कुठायत??

In reply to by तुषार काळभोर

पहिली पोस्ट असल्यामुळे फोटू चा काहीतरी प्रॉब्लेम झला आहे. काही लोकांना दिसत आहे आणि काही लोकांना दिसत नाहीए. मी ठीक करण्याचा प्रयत्न करत आहे.

मस्त आहे ..पण बेसन आणि मैदा घालून तळले तर आतमधील कोळंबी शिजते का ? किती वेळ तळावी ??

शेझवान सॉस घरी केला आहे का? लसणाचे तुकडे 'दिसत' नाहियेत त्यात, म्हणून विचारलं.