Skip to main content

आली फिरून उत्कंठा जगण्याची

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 20/07/2008 20:17 या दिवशी प्रकाशित केले.
(अनुवादीत. कवी-शैलेंद्रसिंग) पदर ओढिला काट्यानी चाळ तोडिला पायानी उडत्या माझ्या मनाला कुणि आता नका आवरूं चालले होऊन माझे मन जणू वाऱ्या वरचे पाखरूं आली फिरून उत्कंठा जगण्याची आला फिरून ईरादा मरण्याचा गत रात्रीच्या कभिन्न अंधारातून देखिले चोहिकडे नयन मिचकावून बहरले जीवन फुला फुलातून निश्चय झाला मग हे देखून आली फिरून उत्कंठा जगण्याची आला फिरून ईरादा मरण्याचा का भारावलेले असे माझे जीवन का मोकाट सुट्लेले मी असे तुफान मन होई साशंक करीता जीवन प्रवास वाटे जाईन हरवून मी तुझा सहवास आली फिरून उत्कंठा जगण्याची आला फिरून ईरादा मरण्याचा श्रीकृष्ण सामंत
लेखनविषय:

वाचने 1961
प्रतिक्रिया 2

प्रतिक्रिया

आज फिर जीनेकी तमन्ना है ! क्या सामंत काका, ओळखलं की नाय ? आज पुन्हा जीवनाची इच्छा झाली रे आज पुन्हा करण्याची इच्छा झाली रे असे देखील चालले असते. नाही का ? - (शाण ओझे मधला) सर्किट

सर्कीटजी, बरोबर ओळखलंत आणि आमचं (शॉर्ट)सर्कीट केलंत.मानलं हा! बरं वाटतं असं वाचून. www.shrikrishnasamant.wordpress.com श्रीकृष्ण सामंत "कृष्ण उवाच" shrikrishnas@gmail.com