Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by किचेन on Sun, 01/01/2012 - 22:57
बालगीतांची गरज आहे अस कोणाकोणाला वाटत? शेजारचा नुकताच बालवाडीत जायला लागलेला पिंट्या आज शाळेत काय शिकवलं,किवा एखादी कविता म्हणून दाखव अस म्हंटल तर कमेरेचा पट्टा हलवत दाबंग करायला लागला.त्याचा मोठा भाऊ रावण किती डेंजर आहे हे सांगत होता. परवा डोरेमोन मध्ये योगेतो आणि डोरेमोन हे त्या मुलीला शेपटी आली हे बघून लालेलाल झाले होते! कराटे कीड मध्ये १२ वर्षाचा मुलगा किस करतो? लहान मुलांचे कार्यक्रम खरच लहान मुलांचे राहिलेत का? दूरचित्रवाणीच्या जाहिराती ह्या पूर्ण कुटुंबाने बघण्यासारखा असतात का? कितीही प्रयत्न केला तरी जाहिरातींपासून दूर जाऊ शकत नाही.साबण,पावडर मध्ये उगीचच पूर्ण बोडी दाखवायची काय गरज आहे? मेन्स डीयो, दाढीच क्रीम ई मधल्या मुली तर जास्त भयंकर असतात. जाहिराती ह्या प्रकाशित होण्या आधी सेन्सोर व्हाव्यात अस वाटत नाही का? लहानांवर संस्कार करण्याची जबाबदारी हि पूर्णपणे मोठ्यांची आहे.पण मोठे ती जबाबदारी पार पाडतायत का?
  • Log in or register to post comments
  • 14356 views

प्रतिक्रिया

Submitted by दादा कोंडके on Mon, 01/02/2012 - 01:05

Permalink

हम्म..

अहो किचनतै, ह्या* धाग्यासारखं प्रत्येक ओळीमध्ये अंतर ठेवलं असतं तर थोडा मोठ्ठा तरी वाटला असता. :) असो, आता घाग्याविषयी. हे सगळं आता हाताबाहेर गेलं आहे. कुठं कुठं लक्ष देणार. आत्ताच ई-सकाळ उघडला आणि बाजूला एक जाहिरात आली, त्यामध्ये पोर्नसाईटला लाजवेल असे कपडे घातलेली मुलगी होती. :( *वि.सु. : संबंधितांनी ह घेणे. ____________________________
  • Log in or register to post comments

Submitted by Pain on Mon, 01/02/2012 - 06:56

In reply to हम्म.. by दादा कोंडके

Permalink

दादा कोंडके

त्यात चूक ई-सकाळची नसावी . सहसा साईटला भेट देणार्‍या प्रत्येकाला कुठल्या जाहिराती दाखवायच्या हे अल्गोरिदम्स ठरवतात आणि त्यासाठी ती प्रत्येकाचा वेब ट्रॅफिक पाहून निर्णय घेतात.
  • Log in or register to post comments

Submitted by दादा कोंडके on Mon, 01/02/2012 - 14:47

In reply to दादा कोंडके by Pain

Permalink

असहमत

पुर्वी सकाळवर ऑनलईन गेमच्या जाहिराती यायच्या आता अल्प वस्त्रातल्या मुली विडीयो चॅटसाठी ऑनलाईन असल्याच्या जाहिराती येतात. त्याचा माझ्या वेब ट्रॅफीकशी काहिही संबंध नाही. तसच टॉरेंटच्या साईटस वर सगळ्याच घाणेरड्या अ‍ॅड्स येतात त्याचा वेब ट्रॅफीकशी काहिही संबंध नसतो.
  • Log in or register to post comments

Submitted by पुष्कर जोशी on गुरुवार, 01/05/2012 - 15:00

In reply to हम्म.. by दादा कोंडके

Permalink

सोपा उपाय आहे ..

@ दादा ह्याच साठी मी add blocker वापरतो अगदी यशस्वी आहेत. त्यात इझी लिस्ट आणि FanBoy लिस्ट आहेत दोन्ही वापरावेत.... @मोदक त्वरित उपायासाठी Add Blocker ला पर्याय नाही.. Opera, Chrome, Firefox सर्वांसाठी हा उपाय उपलब्ध आहे ... IE माहित नाही .. TV साठी Add Blocker / Video Mute शोधणारा
  • Log in or register to post comments

Submitted by दादा कोंडके on गुरुवार, 01/05/2012 - 15:08

In reply to सोपा उपाय आहे .. by पुष्कर जोशी

Permalink

धप्मन्यवाद!

मी यासाठी आयईचं फ्लॅश डिसेबल करून पाहीलं, पण मग युट्युब वगैरे साईट साठी परत जाउन एनेबल करावं लागतं. आयई साठी असलं ब्लॉकर शोधावं लागेल.
  • Log in or register to post comments

Submitted by पुष्कर जोशी on गुरुवार, 01/05/2012 - 16:11

In reply to धप्मन्यवाद! by दादा कोंडके

Permalink

सोपा उपाय आहे ..

IE वापरणे कित्येक वर्षापासून सोडले आहे ....(४-५) आम्ही तर ओपेरा वापरतो बुवा साधे सोपे गतिमान आणि मेल सोबत (Outlook ची गरज नाही)
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Mon, 01/02/2012 - 01:53

Permalink

थोडे नेटावर शोधा..

थोडे नेटावर शोधा.. कुठे तक्रार करता येईल ते ठिकाण सापडेल. शास्त्रोक्त (Technical) लढा कसा द्यायचा ते मिपावर सुद्धा सापडेल. ;-) चला सुरुवात आपल्यापासून करुया. मोदक.
  • Log in or register to post comments

Submitted by Pain on Mon, 01/02/2012 - 07:05

Permalink

किचेन

(तुमच्या) मुलांनी काय पहावे हे तुम्ही आधी पाहून ठरवू शकता पण ते अतिशय वेळखाउ आणि कंटाळवाणे होईल. जाहिराती जशा सतत असंबद्ध गोष्टी आपल्या मनावर बिंबवण्याचा प्रयत्न करतात तसे तुम्ही वेळोवेळी ते कसे चुकीचे आहे हे समजावून सांगू शकता, प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष उदाहरणाने दाखवून देउ शकता. (म्हणजे हळूहळू जाहिराती सुरु झाल्या की ती चॅनेल बदलायला शिकतील ;) ) शक्य असल्यास डिस्कव्हरी, नॅट जिओ, हिस्टरीशिवाय बाकी कुठलेच चॅनल्स मुलांसोबत पाहू नका.
  • Log in or register to post comments

Submitted by किचेन on Mon, 01/02/2012 - 13:45

In reply to किचेन by Pain

Permalink

फक्त चिन्ता!

माझ्या बाबाबंनी मला न्यानेस्वारी द्याणेशावारी (कस लिहयच?), आणि हरिपाठ,विवेकानंद ऐकवून आणि त्याचा अर्थ समजावून सांगून मोठ केलाय.आईनी श्यामची आई,विक्रम वेताळ ,इसापनीती ए शिकवलंय. मला अजूनतरी मुल नाहीयेत,पण जेव्हा होतील तेव्हा काय?त्यांना कस वाढवायचं?तेव्हा तर कदाचित आणखीन प्रोग्रेस झाली असेल.मी नाशणाल जियोग्राफिक आणि दिस्काव्हारीलाच प्राधान्य देते.पण कार्टूनहि मला आवडतात. पण आता पूर्वीचे मिकी,डोनाल्ड,अलादिन चे एपिसोड्स दिसत नाहीत.शिन चान मधले चेहेरे विचित्र असले तरी ते थोड चांगल वाटत.
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Mon, 01/02/2012 - 13:58

In reply to फक्त चिन्ता! by किचेन

Permalink

शिन चान मधले चेहेरे विचित्र

शिन चान मधले चेहेरे विचित्र असले तरी ते थोड चांगलं वाटतं.
व्याडेश्वर.. व्याडेश्वर...!!!
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Mon, 01/02/2012 - 16:05

In reply to शिन चान मधले चेहेरे विचित्र by गवि

Permalink

मेलो, ओ शिनचान ही अतिशय

मेलो, ओ शिनचान ही अतिशय खालच्या दर्जाची सिरियल आहे, त्यापेक्षा झिग शार्को, ऑगी आणि झुरळं बघा, सगळ्यात बेस्ट किक बटोस्की, आणि त्यावर मजा म्हणजे त्याला डबिंग आहे रजनीकांतच्या सौथ इंडियन स्टाईलचं. ..
  • Log in or register to post comments

Submitted by सर्वसाक्षी on Mon, 01/02/2012 - 18:37

In reply to मेलो, ओ शिनचान ही अतिशय by ५० फक्त

Permalink

'होती' म्हणा

<मेलो, ओ शिनचान ही अतिशय खालच्या दर्जाची सिरियल आहे> आहे नव्हे, होती म्हणा. अलिकडे शिंचानचे अगदीच त्रोटक आणि पचपचित भाग दाखविले जातात. आणि दर्जाविषयी म्हणाल तर तो काही मालिकांपेक्षा खालचा नसावा.
  • Log in or register to post comments

Submitted by सर्वसाक्षी on Mon, 01/02/2012 - 14:31

In reply to फक्त चिन्ता! by किचेन

Permalink

चिंता? अजिबात नको...

मुलं शहाणी असतात हो. कस वाढायचं ते त्यांना बरोबर समजत. ते तुम्हाला अधिक समजत असा समज करुन घेतलात तर मुलं तो दूर करतीलच, चिंता नको.
  • Log in or register to post comments

Submitted by विनायक प्रभू on Mon, 01/02/2012 - 16:48

In reply to फक्त चिन्ता! by किचेन

Permalink

किती छान

ज्ञानेश्वरी, हरीपाठ, विवेकानंद, श्यामची आई,इसापनिती, विक्रम वेताळ हा उपाय आहे का? कित्ती छान.
  • Log in or register to post comments

Submitted by पियुशा on Tue, 01/03/2012 - 09:54

In reply to किचेन by Pain

Permalink

शक्य असल्यास डिस्कव्हरी, नॅट

शक्य असल्यास डिस्कव्हरी, नॅट जिओ, हिस्टरीशिवाय बाकी कुठलेच चॅनल्स मुलांसोबत पाहू नका खी...खी...खी..... ह्या चॅनल्सवर असे काही कार्यक्रम आहेत की मुल तुमच्याकडे शन्का विचारणारायला येनारच नाहीत ;)
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Tue, 01/03/2012 - 10:11

In reply to शक्य असल्यास डिस्कव्हरी, नॅट by पियुशा

Permalink

खी...खी...खी..... ह्या

खी...खी...खी..... ह्या चॅनल्सवर असे काही कार्यक्रम आहेत की मुल तुमच्याकडे शन्का विचारणारायला येनारच नाहीत - अथवा असे काही कार्यक्रम आहेत की, ते पाहुन ज्या शंका मुलं विचारतील त्यांची उत्तरे तुम्हालाही माहित नसतील किंवा यापेक्षा पुर्वीच्या लोकल शंका परवडल्या पण हे ग्लोबल क्वश्चनियर नको अशी अवस्था होईल.
  • Log in or register to post comments

Submitted by किचेन on Wed, 01/04/2012 - 23:17

In reply to खी...खी...खी..... ह्या by ५० फक्त

Permalink

आयला, मला तर त्या शंकांचि

आयला, मला तर त्या शंकांचि कल्पना करुनच हसायला येतय! पियुताई लहान नाहिये.तिनेच मला लिहायला शिकवल.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Wed, 01/04/2012 - 23:23

In reply to आयला, मला तर त्या शंकांचि by किचेन

Permalink

पियुताई लहान नाहिये.तिनेच मला

पियुताई लहान नाहिये.तिनेच मला लिहायला शिकवल.
शुद्धलेखनाचे वाभाडे काढणार्‍या पियुताईंनी तुम्हाला लिहायला शिकवलं हे वाचून डोळे पाणावले. (चला पळतो आता रूमाल आणून डोळे टिपायला.);)
  • Log in or register to post comments

Submitted by पियुशा on गुरुवार, 01/05/2012 - 10:42

In reply to पियुताई लहान नाहिये.तिनेच मला by प्रचेतस

Permalink

@ वल्ली एव्ह्डाही काय बाजार

@ वल्ली एव्ह्डाही काय बाजार उठ्वायला नक्को आहे ;) तुमचे ड्वाले पानावतील अशीच दिव्य प्रगती करु आम्ही एक दिवस ;) आमचही एखाद पुस्तक्-बिस्तक निघेल (?) " मि . पा. वर मराठी कसे लिहाल ;) "
  • Log in or register to post comments

Submitted by मृत्युन्जय on गुरुवार, 01/05/2012 - 10:45

In reply to @ वल्ली एव्ह्डाही काय बाजार by पियुशा

Permalink

एव्हाना शुद्धलेखन जमायला

एव्हाना शुद्धलेखन जमायला पाहिजे होते पियुषातै. की अशुद्धलेखनातच मजा वाटते आहे?
  • Log in or register to post comments

Submitted by पियुशा on गुरुवार, 01/05/2012 - 10:58

In reply to एव्हाना शुद्धलेखन जमायला by मृत्युन्जय

Permalink

@ मृत्युन्जय एव्हाना

@ मृत्युन्जय एव्हाना शुद्धलेखन जमायला पाहिजे होते पियुषातै. की अशुद्धलेखनातच मजा वाटते आहे? अहो बॉसचा डॉला चुकवुन लिहायला कित्ती कष्ट पडतात तुम्हाला काय माहीती ? ;) (शुद्ध लिहायला बर्यापैकी जमत्,पण घाइ-गड्बडीत होतात चुका ) :)
  • Log in or register to post comments

Submitted by अन्या दातार on गुरुवार, 01/05/2012 - 11:11

In reply to @ मृत्युन्जय एव्हाना by पियुशा

Permalink

>>शुद्ध लिहायला बर्यापैकी

>>शुद्ध लिहायला बर्यापैकी जमत्,पण घाइ-गड्बडीत होतात चुका घाई-गडबड तुझी की बॉसची? आणि एवीतेवी बॉस तुला विचारतोच ना, झालं का मिपा-मिपा खेळून* वगैरे (भावार्थ लक्षात घ्यावा) मग कसली डोंबलाची गडबड??? * संदर्भः खवउपा
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on गुरुवार, 01/05/2012 - 13:28

In reply to >>शुद्ध लिहायला बर्यापैकी by अन्या दातार

Permalink

आमचही एखाद पुस्तक्-बिस्तक

आमचही एखाद पुस्तक्-बिस्तक निघेल (?) " मि . पा. वर मराठी कसे लिहाल " म्हणजे मिपावर मराठी लिहिलं जाणार नाही तर हिंदी उर्दु इंग्रजी लिहिलं जाईल एवढे वाईट दिवस येतील असा संशय आहे का तुम्हाला ?
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on Wed, 01/04/2012 - 10:54

In reply to शक्य असल्यास डिस्कव्हरी, नॅट by पियुशा

Permalink

पिवशे,

ह्या चॅनल्सवर असे काही कार्यक्रम आहेत की मुल तुमच्याकडे शन्का विचारणारायला येनारच नाहीत
पिवशे, तुला उगाच लहान समजतात नै इथली मंडळी....
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Wed, 01/04/2012 - 11:11

In reply to पिवशे, by वपाडाव

Permalink

पिवशे, तुला उगाच लहान समजतात

पिवशे, तुला उगाच लहान समजतात नै इथली मंडळी.... मा. दाचिपं परदेशागमनुत्सुक श्री. वपाडावजी, हा वरचा साक्षात्कार तुम्हाला कधी आणि कसा झाला याबद्दल काही समजेल काय ?
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Mon, 01/02/2012 - 10:04

Permalink

शक्य असल्यास डिस्कव्हरी, नॅट जिओ, हिस्टरीशिवाय बाकी कुठलेच चॅनल्

>>>>शक्य असल्यास डिस्कव्हरी, नॅट जिओ, हिस्टरीशिवाय बाकी कुठलेच चॅनल्स मुलांसोबत पाहू नका. +१ एक शंका - मुलांना वाचनाची आवड लावणे हा उपाय होवू शकतो काय..? म्हणजे हे डायरेक्ट सोल्यूशन नसेल तरी इनडायरेक्ट सोल्यूशन नक्की होईल. (अजून अविवाहीत असलेला ;-)) मोदक
  • Log in or register to post comments

Submitted by नीलकांत on Mon, 01/02/2012 - 12:49

Permalink

बालचित्रवाणी

आमच्या काळात बालचित्रवाणी आणि किलबिल सारखे कार्यक्रम येत असत. आता दुरदर्शन जिवंत आहे की नाही हेच माहिती नाही तेथे त्यावरील कार्यक्रमांची दखल कोण घेतंय असं झालंय. चॅनलसुरू करायला फार काही लागत नसावे असा अंदाज आहे. कारण कुठल्याही फडतुस कारणाला वाहीलेलं चॅनेल आता दिसायला लागली आहेत. मुलांना वाचनाची आवड नक्की लावा. आजही चंपक चांदोबा अगदी ठकठक सुध्दा उत्तम निघतं. मराठीत जास्त चित्रकथा नाहीत हिंदीत कॉमीक्स आहेत मात्र ते सुध्दा डायमंड कॉमिक्सचे अपवाद वगळता बाकी लहान मुलांसाठी आहेत की नाही अशी शंका यावी अश्या स्वरूपाचे असतात. मराठीसोबत हिंदीसुध्दा वाचायचो. अश्याच एका मुलांसाठी प्रकाशित होणार्‍या बालहंस (जयपुर, राजस्थान) या पाक्षिकाची एक प्रत माझ्या हाती आली. त्यात संपादकांनी पालकांशी संवाद साधला होता, त्यात त्यांनी मुलांचं विश्व आणि त्यांच्या संकल्पना याबाबत पालकांनी कसं वागलं पाहिजे याबाबत अनेक दाखले दिले होते. असे नियतकालीकं मुलांना देऊ शकता. इंग्रजीत बहूदा डिमडिमा नावाचं मासिक आहे. - नीलकांत
  • Log in or register to post comments

Submitted by चित्रगुप्त on Wed, 01/04/2012 - 23:41

In reply to बालचित्रवाणी by नीलकांत

Permalink

चंपक मासिकातिल डिंकू

थोडेसे विषयांतर करून लिहितो आहे... चंपक चा उल्लेख वाचून आठवले की त्यात मी बरीच वर्षे ' डिंकू ' ही चित्रकथा करत असे. त्याकाळी माझी मुले लहान होती, ती ' डिंकू ' आवडीने वाचायची, त्यामुळे मला नवनवीन गोष्टी रचून चित्रित करायचा हुरुप असायचा. मुले मोठी झाल्यावर माझे डिंकू पण थंडावले. कुणा मिपाकरांना ' डिंकू ' आठवतो का? मला माझ्या लहानपणी 'चांदोबा' तर केवळ अद्भुत वाटायचा. १९५२ पासूनचे मराठी चांदोबाचे अंक इथे वाचता येतीलः http://www.chandamama.com/archive/MAR/storyArchive.htm
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on गुरुवार, 01/05/2012 - 00:43

In reply to चंपक मासिकातिल डिंकू by चित्रगुप्त

Permalink

लिंक बद्दल धन्स..

लिंक बद्दल धन्स..
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on गुरुवार, 01/05/2012 - 01:25

In reply to चंपक मासिकातिल डिंकू by चित्रगुप्त

Permalink

तुम्ही डिंकू करायचात ?? मला

तुम्ही डिंकू करायचात ?? मला आता नक्की आठवत नाही आहे, कारण बरीच वर्षे झाली, पण हे नाव खूप ओळखीचे वाटत आहे. दोन पानी कॉमिक होते का हो? सेंटर फोल्ड ला एक होते, तेच का? अशीच एक चिकू कि चीकलू नावाच्या हुशार सशाची गोष्ट होती. ती पण खूप आवडायची. राजू आणि छोटी खार पण आठवते. चंपक ची आठवण येऊन nostalgic झालो आहे. त्याकाळी मी महिन्याचे २८ दिवस चंपक ची वाट पाहत असे. कारण ते एका दिवसात संपायचे, मग पुढील अंकासाठी १४ दिवस वाट पाहणे. चंपकच्या लेखक / चित्रकारांपैकी तुम्ही एक होतात हे ऐकून खूप आनंद झाला. माझ्या बालपणाचा एक हिस्सा झाल्याबद्दल धन्यवाद !!!
  • Log in or register to post comments

Submitted by दादा कोंडके on गुरुवार, 01/05/2012 - 01:47

In reply to चंपक मासिकातिल डिंकू by चित्रगुप्त

Permalink

जब्रा...

जुन्या चंपक मधला डिंकू माझा आवडता होता. खूपश्या चित्रकथा अजुनही आठवतायतात. त्यापैकी एक म्हणजे सडक्या बटाट्याची पोती बाहेर ठेउन देतात ती. त्या तुमच्या चित्रकथा होत्या हे कळल्यावर खूप जुनं कोणीतरी ओळखीचं भेटल्यासारखं झालं. :) नंतरचं चंपक मात्र खरच "चंपक" झालं. त्यामानानं ठकठक, छावा छान वाटायचं.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Sat, 01/07/2012 - 00:43

In reply to चंपक मासिकातिल डिंकू by चित्रगुप्त

Permalink

मला डिंकू आठवतोय. तुम्ही

मला डिंकू आठवतोय. तुम्ही डिंकू करायचात हे वाचून भारी वाटलं. चांदोबा, चंपक म्हणजे मेजवानी वाटायची. तसेच रेडिओवरचे रविवारी लागणारे कार्यक्रम ऐकण्यासाठी जिवाचे कान होत असत. सगळ्या मुलांची जवळच्या लायब्ररीच्या बालविभागातील सगळी पुस्तके दोनदा तरी वाचून झालेली असायची. माझ्या मुलाला वाचनाची गोडी फारशी नव्हती म्हणून वाईट वाटायचे पण सुदैवाने त्याच्या पूर्वीच्या एक शिक्षिका चांगल्या होत्या. त्यांनी त्याला चांगल्या वाचनाची गोडी लावली. त्यानंतर आता 'वाचन बास' म्हणायची वेळ आलिये.
  • Log in or register to post comments

Submitted by परिकथेतील राजकुमार on Mon, 01/02/2012 - 12:58

Permalink

हम्म्म

अशा पालकांनी मुलांना मिपावरती सदस्यत्व घेऊन द्यावे. आजकाल लहान मुलांसाठी अनेक कथा, कविता इथे निघत आहेत. काही लेखक तर असे लिहितात की, पटकन हे त्यांनी लिहिले आहे, का कोणा गोग्गोड बाळाने असे वाटून जाते अगदी. ह्या प्रश्नावरती ठाम उपाय म्हणजे मिपाच आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by अन्या दातार on Mon, 01/02/2012 - 13:22

In reply to हम्म्म by परिकथेतील राजकुमार

Permalink

सहमत

आणि याच मिपावर चांदीचे पेले, तुळशीच्या मंजुळा, दारवा यांचे ज्ञान मिळून सर्वांगीण प्रगती होते. लैंगिक शिक्षणाचा तासही होतो, इतिहाससुद्धा खरपूस चवीने चघळला जातो. मुलांना गणित वगैरे विषय शिकवायलाच काय त्या शाळेचा उपयोग. बाकी सर्व ज्ञान इथे अगदी फुकटात भेटते. ©º°¨¨°º© मरा ©º°¨¨°º©
  • Log in or register to post comments

Submitted by हंस on Mon, 01/02/2012 - 13:54

In reply to सहमत by अन्या दातार

Permalink

+१

अन्या एक नंबर रे! अगदी माझ्या मनातलं बोललास!!!!!!!!!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Mon, 01/02/2012 - 15:25

In reply to सहमत by अन्या दातार

Permalink

©º°¨¨°º© मरा ©º°¨¨°º© >>>

©º°¨¨°º© मरा ©º°¨¨°º© >>> :-D सही रे सही... या मुळे मेल्या गोलो आहे
  • Log in or register to post comments

Submitted by मन१ on Mon, 01/02/2012 - 16:35

In reply to ©º°¨¨°º© मरा ©º°¨¨°º© >>> by अत्रुप्त आत्मा

Permalink

+१

बाडिस. पराच्या सहिचं टराटरा रुपांतर "मरा" असं केल्यानं आता अन्याचे पाय धरा असे म्हणू इच्छितो. खरा
  • Log in or register to post comments

Submitted by सूड on Mon, 01/02/2012 - 23:41

In reply to +१ by मन१

Permalink

©º°¨¨°º© मरा ©º°¨¨°º© >>> हा

©º°¨¨°º© मरा ©º°¨¨°º© >>> हा हा हा.....मानलं ब्वॉ. अन्याभौ, नमस्कार....अगदी कोपरापासून. :D
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on Tue, 01/03/2012 - 00:57

In reply to ©º°¨¨°º© मरा ©º°¨¨°º© >>> हा by सूड

Permalink

हा हा हा हा !!!!! लय

हा हा हा हा !!!!! लय भारी... सदर आयडीचे सेकंड बेष्ट विडंबन.... दि बेस्ट कुठले ते आठवत असेलच सूड ला ;-)
  • Log in or register to post comments

Submitted by किचेन on Tue, 01/03/2012 - 15:20

In reply to सहमत by अन्या दातार

Permalink

ते सगळ मोठ्यांसाठी होत.आता

ते सगळ मोठ्यांसाठी होत.आता त्या पिंट्याला मी तुळस घशासाठी चांगली असते एवढाच सांगणार! माजुला काय असते विचारलं तर मुळीच नाव आहे अस सांगेल. लहान मुल म्हण्जे वैताग नुसता!
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Tue, 01/03/2012 - 15:25

In reply to ते सगळ मोठ्यांसाठी होत.आता by किचेन

Permalink

माजुला काय असते विचारलं तर

माजुला काय असते विचारलं तर मुळीच नाव आहे अस सांगेल.
हे काय म्हणायचं आहे?? अर्थ जाऊदे, शब्द काय आहेत?
  • Log in or register to post comments

Submitted by अन्या दातार on Tue, 01/03/2012 - 15:56

In reply to माजुला काय असते विचारलं तर by गवि

Permalink

+१

>>अर्थ जाऊदे, शब्द काय आहेत? =)) बस पता लगतेही आपको खबर कर देंगे ;)
  • Log in or register to post comments

Submitted by प्रचेतस on Tue, 01/03/2012 - 19:53

In reply to +१ by अन्या दातार

Permalink

माजुला म्हणजे द. आफ्रिकेचे

माजुला म्हणजे द. आफ्रिकेचे अध्यक्ष गेराल्ड माजोला तर नव्हेत, तसं असेल तर किचेनतैंच्या ओळखी लै मोठ्या ठिकाणी आहेत असे म्हणता येईल.
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Tue, 01/03/2012 - 20:23

In reply to माजुला काय असते विचारलं तर by गवि

Permalink

मंजुळा..

मंजुळा.. सदरच्या प्रतिसादाबरोबरच मी मोडी लिपी, तसेच मोहेंजोदडो आणि हडप्पा येथील सांकेतीक शीलालेख यशस्वीपणे वाचून अर्थाचे निरूपण करण्याचे पेटंट घेत असल्याचे जाहीर करत आहे... ;-) मोदक
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Tue, 01/03/2012 - 20:49

In reply to माजुला काय असते विचारलं तर by गवि

Permalink

मंजुळा काय असते (हे) विचारलं तर मुलीचं नाव आहे असं सांगेन

>>>>माजुला काय असते विचारलं तर मुळीच नाव आहे अस सांगेल. मंजुळा काय असते (हे) विचारलं तर मुलीचं नांव आहे असं सांगेन वरील शॉट साठी (http://www.misalpav.com/node/6332 - मोकलाया दाहि दिश्या) येथे नेट प्रॅक्टिस केलेली आहे. :-) मोदक.
  • Log in or register to post comments

Submitted by पक पक पक on Mon, 01/02/2012 - 17:11

In reply to हम्म्म by परिकथेतील राजकुमार

Permalink

डॉ.दिवटेंच्या 'ब्रेक

डॉ.दिवटेंच्या 'ब्रेक अप्'बद्दल बोलत आहात का ..?
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Mon, 01/02/2012 - 17:35

In reply to डॉ.दिवटेंच्या 'ब्रेक by पक पक पक

Permalink

डॉ.दिवटेंच्या ब्रेकअप मध्ये

डॉ.दिवटेंच्या ब्रेकअप मध्ये कोणता विषय आहे ? गणित का भुमिती का इतिहास का भुगोल ?
  • Log in or register to post comments

Submitted by पक पक पक on Mon, 01/02/2012 - 18:07

In reply to डॉ.दिवटेंच्या ब्रेकअप मध्ये by ५० फक्त

Permalink

डॉ.दिवटेंच्या ब्रेकअप मध्ये

डॉ.दिवटेंच्या ब्रेकअप मध्ये कोणता विषय आहे ? गणित का भुमिती का इतिहास का भुगोल ? ह्या ह्या ह्या ह्या मि पा वर जे विषय असतात त्या बद्दल वर चर्चा चालु होती ,त्या संदर्भात विचारल हो. बाकी गणित्,भुमिती वर काही वाच्ल्याच आठ्वत नाही मिपा वर.
  • Log in or register to post comments

Submitted by ५० फक्त on Mon, 01/02/2012 - 21:28

In reply to डॉ.दिवटेंच्या ब्रेकअप मध्ये by पक पक पक

Permalink

मध्यंतरी कोडी सोडवा कोडी

मध्यंतरी कोडी सोडवा कोडी सोडवा असले धागे निघत होते की बरेच तेंव्हा तुम्ही नव्हता वाट्टं.
  • Log in or register to post comments

Submitted by पक पक पक on Mon, 01/02/2012 - 21:57

In reply to मध्यंतरी कोडी सोडवा कोडी by ५० फक्त

Permalink

नाही नव्हतो तेव्हा मि , पण

नाही नव्हतो तेव्हा मि , पण कसली कोडी होती ,गणितातली का भुगोलातली .....नाय आपली एक शंका म्हणून विचारल.
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com