Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by किचेन on Sun, 01/01/2012 - 22:57
बालगीतांची गरज आहे अस कोणाकोणाला वाटत? शेजारचा नुकताच बालवाडीत जायला लागलेला पिंट्या आज शाळेत काय शिकवलं,किवा एखादी कविता म्हणून दाखव अस म्हंटल तर कमेरेचा पट्टा हलवत दाबंग करायला लागला.त्याचा मोठा भाऊ रावण किती डेंजर आहे हे सांगत होता. परवा डोरेमोन मध्ये योगेतो आणि डोरेमोन हे त्या मुलीला शेपटी आली हे बघून लालेलाल झाले होते! कराटे कीड मध्ये १२ वर्षाचा मुलगा किस करतो? लहान मुलांचे कार्यक्रम खरच लहान मुलांचे राहिलेत का? दूरचित्रवाणीच्या जाहिराती ह्या पूर्ण कुटुंबाने बघण्यासारखा असतात का? कितीही प्रयत्न केला तरी जाहिरातींपासून दूर जाऊ शकत नाही.साबण,पावडर मध्ये उगीचच पूर्ण बोडी दाखवायची काय गरज आहे? मेन्स डीयो, दाढीच क्रीम ई मधल्या मुली तर जास्त भयंकर असतात. जाहिराती ह्या प्रकाशित होण्या आधी सेन्सोर व्हाव्यात अस वाटत नाही का? लहानांवर संस्कार करण्याची जबाबदारी हि पूर्णपणे मोठ्यांची आहे.पण मोठे ती जबाबदारी पार पाडतायत का?
  • Log in or register to post comments
  • 14356 views

प्रतिक्रिया

Submitted by ५० फक्त on Mon, 01/02/2012 - 22:22

In reply to नाही नव्हतो तेव्हा मि , पण by पक पक पक

Permalink

अरे अरे, आपल्या आंतरजालीय

अरे अरे, आपल्या आंतरजालीय मराठी वाङमयाला नाविन्यपुर्ण झळाळी देण्या-या कालखंडात मराठी आंतरजालापासुन काही अंतरावर होता हे वाचुन माझ्या दम्रव्यक्षचम्रवातासारख्या कोमला मनावर किती ओरखडे उठले हे तुम्हाला कसे समजणार, असो.
  • Log in or register to post comments

Submitted by पक पक पक on Mon, 01/02/2012 - 22:33

In reply to अरे अरे, आपल्या आंतरजालीय by ५० फक्त

Permalink

आंतरजालीय मराठी वाङमयाला

आंतरजालीय मराठी वाङमयाला नाविन्यपुर्ण झळाळी देण्या-या ........................ 'दम्रव्यक्षचम्रवातासारख्या ' आय्ला ह्ये कसल मराठी कोड हाये भाउ ?
  • Log in or register to post comments

Submitted by किचेन on Mon, 01/02/2012 - 22:41

In reply to आंतरजालीय मराठी वाङमयाला by पक पक पक

Permalink

'दम्रव्यक्षचम्रवातासारख्या

'दम्रव्यक्षचम्रवातासारख्या '.....वाचताहि येत नाहिये.तिथे समजणार काय? डोंबल.
  • Log in or register to post comments

Submitted by पक पक पक on Mon, 01/02/2012 - 23:18

In reply to 'दम्रव्यक्षचम्रवातासारख्या by किचेन

Permalink

वाचता वाचता वात आला

वाचता वाचता वात आला आहे.......
  • Log in or register to post comments

Submitted by मी-सौरभ on Wed, 01/04/2012 - 11:17

In reply to वाचता वाचता वात आला by पक पक पक

Permalink

मग

जागेवरुन उठा अन् मोकळे होऊन या!!
  • Log in or register to post comments

Submitted by अप्पा जोगळेकर on Sat, 01/28/2012 - 16:06

In reply to डॉ.दिवटेंच्या 'ब्रेक by पक पक पक

Permalink

एखाद्याच्या ब्रेक-अपची अशी

एखाद्याच्या ब्रेक-अपची अशी जाहीर चर्चा करणे अयोग्य वाटते. धाग्याचे नाव वाचले ना. 'जपा निरागसता'
  • Log in or register to post comments
Profile picture for user आत्मशून्य

Submitted by आत्मशून्य on Mon, 01/02/2012 - 17:42

Permalink

.

कराटे किड मधिल पोराचं लव्ह इंटरेस्ट व व्हायलन्सची पातळी नक्किच आपल्यासाठी खटकाउ गोश्टी होत्या पण ..... पण लहान मुलं निरागस वगैरे नसतात तर केवळ दुर्लक्षण्याजोगीच असतात ह्यावर ठाम विश्वास आहे... कारण जेव्हां मि लहान होतो तेव्हां वडीलांच्या खिशातुन पैसेही ढापायचो व क्लास टिचरचा मुडदाच पडावा अशी मनापासुन इछ्चाही बाळगायचो... :)
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Tue, 01/03/2012 - 10:21

Permalink

मोठे जबाबदारी पार पाडायला कमी

मोठे जबाबदारी पार पाडायला कमी पडतात असं जाणवतंय.
  • Log in or register to post comments

Submitted by इरसाल on Tue, 01/03/2012 - 14:13

Permalink

धाग्याचीच निरागसता हरवली आहे.

आणि अश्या प्रकारे हा धागा हायज्याक झालेला आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Tue, 01/03/2012 - 20:37

Permalink

"जपा निरागसता" की "लहान मुल म्हण्जे वैताग नुसता..??"

"जपा निरागसता" की "लहान मुल म्हण्जे वैताग नुसता..??" किचेन तै ए चालबे नॉ. तुम्ही एक कोणती ती साईड फिक्स धरा हो. आधीच पेट्रोल ने चक्कीत जाळ केला असताना तुमचा धागा वाचताना डोळ्यातून धूर येवू लागला आहे. (ह.घ्या.) :-) मोदक
  • Log in or register to post comments

Submitted by मराठी_माणूस on Wed, 01/04/2012 - 10:19

In reply to "जपा निरागसता" की "लहान मुल म्हण्जे वैताग नुसता..??" by मोदक

Permalink

"चक्कीत जाळ" हा वाक्प्रचार

"चक्कीत जाळ" हा वाक्प्रचार फारा वर्षानी वापरलेला दिसला . जुन्या आठवणीबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on Wed, 01/04/2012 - 11:42

Permalink

/-/

किचेन्तैंच्या घरी बहुतेक दुपट्याचे वास दरवळणार आहेत.... नाहीतर मुलांच्या संगोपनाची काळजी इतक्या आतुरतेने अन एवढ्या लौकर त्यांनी केली नसती.... पुढील वाटचालीस शुभेच्छा.... तब्येतीची काळजी घेणे....
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वनाथ मेहेंदळे on गुरुवार, 01/05/2012 - 15:48

In reply to /-/ by वपाडाव

Permalink

प्र का टा आ.

चुकीच्या ठिकाणी प्रतिसाद दिल्याने काढून टाकला आहे. विमे
  • Log in or register to post comments

Submitted by किचेन on Sat, 01/28/2012 - 14:25

In reply to /-/ by वपाडाव

Permalink

ओय , अस काही नाहीये.शेजारच्या

ओय , अस काही नाहीये.शेजारच्या मुलांच्या अधोगतीकडे बघून लिहायची गरज वाटली.जेव्हा आपली मुल होतील तेव्हा त्यांची निरागसता जपण्यासाठी काय करायाल हव हा किडा डोक पोखरत होता म्हणून धागा काढला.
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on Sat, 01/07/2012 - 00:32

Permalink

ह्म्म.. मग काय ठरले शेवटी..? कशी जपायची निरागसता..?

ह्म्म.. मग काय ठरले शेवटी..? कशी जपायची निरागसता..?
  • Log in or register to post comments

Submitted by सस्नेह on Fri, 01/27/2012 - 11:37

Permalink

कशी जपायची निरागसता..?

कुणासाठी जपायची ती ? या मुलाना त्याची गरजच नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by शेफ चेतन on Sat, 01/28/2012 - 14:18

In reply to कशी जपायची निरागसता..? by सस्नेह

Permalink

गरज नाहीये अस तुम्हाला खरच

गरज नाहीये अस तुम्हाला खरच वाटत? जर वाटत नसेल तर आपल्या भावना बोथट झाल्यात याचा हा पुरावा आहे अस समजायला हरकत नाही.ज्या वयात आपण शुम्कारोती म्हणत असू त्या वयात नवीन पिढी सिनेमातल्या खलनायकाचे सवांद म्हणत आहे.खर तर त्यात त्याचं काहीच चुकत नाही, चुकी होते ती मोठ्यांकडून.काही गोष्टी योग्य वयात कळलेल्याच चांगल्या असतात. जस आपण निदान मी तरी भावनाहीन झालोय...खून,बॉम्बस्फोट,खंडणी वगैरे शब्द ऐकून.दोन दिवस थोडासा त्रास होतो.पण नंतर नाही....तसाच या मुलाचं आहे.हि मुलही कदाचित अशीच भावनाहीन होऊन जातील.मोठी होईपर्यंत त्यांच्याही भावना बोथट झालेल्या सतील.मालिकांमध्ये दाखवले जाणारे घटस्फोट, भांडण, कट-कारस्थान रचण हेच प्रत्यक्षात येईल .तेव्हा आपण काहीच करू शकणार नाही.आपण त्या पिढीला दोषहि देऊ शकणार नाही करांन त्यांना हे सगळ शिकवणारे आपणच असू. ------------------------------------------------------------------------------------------- ( लेखनासाठी सौ. किचेन यांची मदत घेतली आहे.मी दु आयडी आहे अस समजू नये अशी विनंती.) -------------------------------------------------------------------------------------------
  • Log in or register to post comments

Submitted by वपाडाव on Sun, 01/29/2012 - 04:11

In reply to गरज नाहीये अस तुम्हाला खरच by शेफ चेतन

Permalink

ब्वॉर्र !!

ज्या वयात आपण शुम्कारोती म्हणत असू त्या वयात नवीन पिढी
संस्कार लेखणातुन पाझळत आहेत....
(लेखनासाठी सौ. किचेन यांची मदत घेतली आहे.)
मग बरोब्बर लिहिलंय, तुम्ही लहान असताना शुम्कारोतीच म्हणत असणार. ह्यावरुन एक म्हण आठवत आहे, "उघड्याजवळ नागडं गेलं अन थंडीनं कडकडुन मेलं"
मी दु आयडी आहे अस समजू नये अशी विनंती.
अहो, आम्ही तुम्हाला काही म्हटलंय का, पण खरी शंका तर त्यांच्या (किचेनतै) आय्डीवरच आहे.... वि.सु./ तळटीप सगळं काही हलक्यातच घ्या...
  • Log in or register to post comments

Submitted by किचेन on Sat, 01/28/2012 - 14:24

In reply to कशी जपायची निरागसता..? by सस्नेह

Permalink

प्र.का.टा.आ.

प्र.का.टा.आ.
  • Log in or register to post comments

Submitted by निनाद मुक्काम … on Mon, 03/26/2012 - 01:05

Permalink

जपा निरागसता हे शीर्षक आवडले

जपा निरागसता हे शीर्षक आवडले माझ्या मते निरागस हा शब्द आपण जपला पाहिजे. तो लवकरच ह्या भूतलावरून अंतर्धान पावणार आहे. बाकी लेखात कीस ह्या शब्दला मुका हा मराठीत अतिषय गोड शब्द आहे. असे आवर्जून सांगतो.
  • Log in or register to post comments

Submitted by खेडूत on Fri, 01/02/2015 - 19:36

Permalink

बरोब्बर तीन वर्षांपूर्वीचा हा

बरोब्बर तीन वर्षांपूर्वीचा हा धागा ! >>> मोठे ती जबाबदारी पार पाडतायत का? हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे!
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Fri, 01/02/2015 - 19:45

Permalink

पूर्वीचं मिपा राहिलं नाही.

पूर्वीचं मिपा राहिलं नाही.
  • Log in or register to post comments

Submitted by अत्रुप्त आत्मा on Fri, 01/02/2015 - 23:25

In reply to पूर्वीचं मिपा राहिलं नाही. by बॅटमॅन

Permalink

आणि किच्चु तै पण नै (येत नाही

आणि किच्चु तै पण नै (येत नाही) राहिली ( मिपावर) :-/ ... :-/ .. :-/ ================================ केंव्हा येणार बरं किच्चू तै...??? Image removed. अं.... कै कळत्त नै ब्वॉ! :-/
  • Log in or register to post comments

Pagination

  • First page « First
  • Previous page ‹ Previous
  • पान 1
  • पान 2

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com