Skip to main content

आकाशलक्षी

लेखक अज्ञातकुल यांनी सोमवार, 02/01/2012 09:49 या दिवशी प्रकाशित केले.
चंद्रिका आकाशलक्षी; कूस छाया पावली त्या प्रभाती, नांदणार्‍या; जागल्या अन चाहुली मंद वारा गंधमंडित छंदला गात्रांतुनी धुंदल्या हृदयी; स्वरांच्या; आर्द्र ओल्या मैफिली तेच गाणे ते उखाणे पापण्यांची सावली सुप्तशा वर्मास छेडे, गोत, हलक्या पाउली डोहजळकुंभात फुलल्या; तलम कोमल कमलिनी आर्त रात्रीचे विखुरले, स्वप्न भरले लोचनी .......................अज्ञात
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1410
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

फारच अप्रतिम शब्दरचना. आणि आर्त रात्रीचे विखुरले, स्वप्न भरले लोचनी. ह्या स्वप्न भरल्या लोचनांनी नवीन वर्षात पदार्पण करूयात आणि ही सगळी स्वप्ने पूर्ण होवोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

तेच गाणे ते उखाणे पापण्यांची सावली सुप्तशा वर्मास छेडे, गोत, हलक्या पाउली डोहजळकुंभात फुलल्या; तलम कोमल कमलिनी आर्त रात्रीचे विखुरले, स्वप्न भरले लोचनी
अफाट!!!

व्वा..व्वा...व्वा...अज्ञातकुल..वा! आज तुंम्ही मन तृप्त करुन टाकले आहे... अत्रुप्त आत्मा तृप्त जाहला,काव्य वाचूनी तुझे। काय बोलू अन्य आता,शब्दही झाले खुजे॥.... या झकास गहिर्‍या काव्यामुळे आज निवांत झोप मिळणार बघा...!