Skip to main content

मी हा गेम पूर्ण खेळणार..

लेखक ajay wankhede यांनी गुरुवार, 29/12/2011 01:11 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच तारुण्याच्या उंबरठयावर प्रवेश केलेला मी. सळसळतं रक्त,ओहटी न येणारं अविरत उधाण. सतत खळखळणारं मन स्वप्नांचे ढिगभर मनोरे, तरी पण का बरं वाटतं एवढं बोअर कुठून येत असेल ही अस्वस्थता जग भन्नाट वेगानं बदलतय मीच मागे पडतोय काय? का छळतेय ही बेचैनी ? का गुदमरतो जीव? का मोकळा श्वास घेताच येत नाही ? असेल प्रेम भंगाचा विरह? प्रेम तरी का म्हणावं त्याला? की असेल उतुंग भरारी घेतांनाच झालेला संधीपात? नि मग वाटते मरून जावसं... का बरं वाटत असावं असं..का? का हाच माझ्या जन्माचा हेतू? नाही नाही नाही .... आई बाबांना सांग, अर्धवट सोडून जाणार नाही हा गेम. नवं वर्षाच्या पूर्व संध्येला.... भंन्नाटां सोबत भन्नाट होणार नाही मी आज मी सारे मुखवटे, बुरखे टरा टरा फाडून टाकणार, मन मोकळं करणार, स्वतःशीच रमणार. सैर भैर मनाला वठणीवर आणणार आणि हळुवार एकच पाउल पुढे टाकणार शांत निःशब्द ...आज चित्ताला चीत्तातच गाठणार श्वासाला श्वासातच घेरणार स्पंदनांना कुंपणातच ठेवणार नि मी जसा जगणार, तसाच सार्या दोस्तांना जगविणार आई, मी हा गेम पूर्ण खेळणार.. बाबांना सांग.
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1435
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया