✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

एकी १

ल — लीलाधर, Wed, 12/28/2011 - 09:06
एकी १ आईने केला केक, दुरकी २ बाबांना केला फोन ! तीरकी ३ ताईने दीला पेन, चौकी ४ आमचा बाळू हुशार ! पाची ५ मिळून करू नाच, साही ६ आमचा नाच पहा ! साती ७ आमची न्यारी बात, आठी ८ घडेल का आई बाबांची भेट? नौवे ९ मिळून सारे गाऊ, दाही १० बाळूला आवडते माऊ !

प्रतिक्रिया द्या
4833 वाचन

💬 प्रतिसाद (34)

वा वा चान चान. सुंदर कविता

प्रचेतस
Wed, 12/28/2011 - 09:50 नवीन
वा वा चान चान. सुंदर कविता
  • Log in or register to post comments

आधी सांग ... करुण रस का

गवि
Wed, 12/28/2011 - 09:53 नवीन
आधी सांग ... करुण रस का बरे???
  • Log in or register to post comments

शिवाय

गवि
Wed, 12/28/2011 - 09:57 नवीन
बाकी ठीकठाक रे पणः आठी आठ घडेल का आई बाबांची भेट? .......... काय हे..? पुलंच्या "असामी"तल्या समोरच्या कोनाड्यात उभी व्हिंदमाता. XXरावांचं नाव घेते माझा नंबर पहिला.. याची आठवण झाली.
  • Log in or register to post comments

त्याचे काय आहे

लीलाधर
Wed, 12/28/2011 - 09:59 नवीन
अ‍ॅक्च्युली मला असे दाखवायचे आहे की आजच्या धकाधकीच्या जीवनात फारच कमी वेळ आई बाबांना आपल्या मुलांना द्यायला मिळतो. त्यामुळे मला त्या मुलाच्या मनात काय चालले आहे हे सांगायचे आहे.
  • Log in or register to post comments

नौवे ९ मिळून सारे गाऊ, दाही

मदनबाण
Wed, 12/28/2011 - 10:13 नवीन
नौवे ९ मिळून सारे गाऊ, दाही १० बाळूला आवडते माऊ ! मस्त कविता... :)
  • Log in or register to post comments

आजीचे गाणे!!

फिझा
Wed, 12/28/2011 - 10:32 नवीन
अमच्य लहान्पणि आजि एक गाणे म्हणायचि .....ते असेच अहे ,,,पण याहुन वेगळे आहे ,,,पोस्ट करु आम्हि कहि वेळाने !!!!
  • Log in or register to post comments

प्रतिक्षेत

लीलाधर
Wed, 12/28/2011 - 10:40 नवीन
तुमच्या आजीच्या गाण्याच्या (प्रतिक्षेत) असलेला चचा :) आम्हालाही आवडेल आजीचे गाणे वाचायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: फिझा

छान!

michmadhura
Wed, 12/28/2011 - 10:45 नवीन
वन टू थ्री फोर च्या इंग्रजाळलेल्या जमान्यात हे एकी१ दुरकी २ आवडले.
  • Log in or register to post comments

आभारी आहे

लीलाधर
Wed, 12/28/2011 - 10:47 नवीन
धन्यवाद
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: michmadhura

छान बालगीत.

प्रभाकर पेठकर
Wed, 12/28/2011 - 11:03 नवीन
बाकी बालगीत छान आहे. पण... १ - केक २ -फोन ३ - पेन ४ - हुशार ५ - नाच ६- पहा ७ - बात ८ - भेट ९ - गाऊ १० - माऊ शेवटचे १० बरोबर 'माऊ' जुळत नाही.
  • Log in or register to post comments

शेवटचे १० बरोबर 'माऊ' जुळत नाही

लीलाधर
Wed, 12/28/2011 - 11:07 नवीन
मग त्याठीकाणी काय जुळले असते असे तुम्हाला वाटते?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

आपण कवी..

प्रभाकर पेठकर
Wed, 12/28/2011 - 11:16 नवीन
आपण 'चतुर' आहात, आपण 'चाणक्य' आहात, आपणच 'कवी' आहात. मी काय सुचविणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: लीलाधर

त्ये दहाला एक चहा बसतंय का

५० फक्त
Wed, 12/28/2011 - 11:38 नवीन
त्ये दहाला एक चहा बसतंय का बघा ओ जरा, काय हल्ली ल्हान ल्हान पोरं बी च्या पितात, (काही इतर्ही बरंच काही पितात )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

(एक गच्ची

दिपक
Wed, 12/28/2011 - 12:58 नवीन
"ते एक गच्ची बसतय का बघा हो." भाईंच्या रावसाहेबांची आठवण झाली. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

चच्चा..औषध कोणतं ते कळलं का..?

अत्रुप्त आत्मा
Wed, 12/28/2011 - 14:54 नवीन
आपण 'चतुर' आहात, >>> हे कौतुक झालं ;-) आपण 'चाणक्य' आहात, >>> हा टोमणा आहे :-D आपणच 'कवी' आहात. >>> आणी हि शिवि,किंवा शिवाशिवी :-p मी काय सुचविणार?..... (तुझं तुच बघ काय ते..!) असं ध्वनित होतय यातनं...कळलं काय रे चच्चा ;-) अता तरी.... सुधर लवकर
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

अ आ, तुम्हाला असं म्हणायचं

५० फक्त
Wed, 12/28/2011 - 15:20 नवीन
अ आ, तुम्हाला असं म्हणायचं आहे का की एकच आयडी एकाच वेळी चतुर चाणक्य आणि कवि असु शकत नाही... स्पष्ट सांगा की , हे बघा ओ चचा, एकतर तुम्ही चतुर चाणक्य असाल, किंवा चाणक्य कवि असाल किंवा चतुर कवि असाल, पण तिन्ही एकत्र छे शक्यच नाही,
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

मस्त

निश
Wed, 12/28/2011 - 11:45 नवीन
मस्त मस्त
  • Log in or register to post comments

=)) =))

परिकथेतील राजकुमार
Wed, 12/28/2011 - 11:57 नवीन
लेका कसली मुक्तक कविता रे ही ? आपल्याला कवितेतले काय कळत नाय, पण ही कविता / बडबडगीत म्हणजे कै च्या कै वाटते आहे. शब्दाला शब्द जोडून रेल्वेचे डबे बांधल्यासारखे. एकी १ मास्तरला मारली फेक, दुरकी २ मास्तरने हाणले दोन ! तीरकी ३ शेजारची बाळी खूपच हसिन, चौकी ४ बाळीचा भाउ दांडगट फार ! पाची ५ रोज हैदोस वाच, साही ६ शेजारच्या मुलीकडे चोरुन पहा ! साती ७ पानात आमच्या कोल्हापुरी कात, आठी ८ अभ्यासाची लागली वाट नौवे ९ रोज रोज शिणेमाला जाउ, दाही १० परिक्षेत येतो मग बागूलबुवा ! हे एका महाविद्यालयीन युवकाचे मुक्तक कसे वाटते ? ;) परायक
  • Log in or register to post comments

काय ती कविता काय ती प्रेरणा

५० फक्त
Wed, 12/28/2011 - 12:44 नवीन
श्री. पराशेट, प्रेरणेबद्दल धन्यवाद ( सदर प्रेरणा ही वांगम यीन आहे, कोण म्हणुन विचारु नये क्रुप या हीवि नंती) एकी १ बंड्याला मारली फेक, दुरकी २ बाळ्याने दिले मेंदिचे कोन ! तीरकी ३ उद्यापासुन द्यावी बाळ्याला लाईन, चौकी ४ बाळ्याची आई चौकस फार ! पाची ५ दाखवायचा होतोय रोजचा जाच, साही ६ बाळ्याला सांगेन लग्नाचं पहा ! साती ७ काल बाळ्यानं गल्लीत धरला हात , आठी ८ मी बंड्याला दिला कात्रजचा घाट, नौवे ९ या वर्षी हनिमुनला जाउ दाही १० चार वर्षानी पोराचं नाव शाळेत लिहा! हे एका लग्नाळु म्हंजे सभ्य भाशेत चि१००कां युवतीचे (का घोडनवरीचे) मुक्तक कसे वाटते ?
  • Log in or register to post comments

माझा ही एक प्रयत्न

मी-सौरभ
Wed, 12/28/2011 - 15:34 नवीन
एकी १, सासर्‍याची लेक, दुरकी २, तिचा आला फोन ! तीरकी ३, मागे माझा ATM पिन चौकी ४, खरेदी करे फार ! पाची ५ , डोक्यावर माझ्या नाच साही ६, म्हणे स्वतःच स्वतः पहा! साती ७, लावतो कुकर मध्ये भात आठी ८, घासून ठेवतो ताट ! नौवे ९, पाठ झाली मऊ दाही १०, हाल माझे पहा ! एका कनिष्ठ भगिनी योग असलेल्या नवर्‍याचे मनोगत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ५० फक्त

ऑ?

स्पा
Wed, 12/28/2011 - 12:47 नवीन
आठी ८ मी बंड्याला दिला कात्रजचा घाट, म्हन्जि काय?
  • Log in or register to post comments

स्पावड्या.. मला वाटते आपल्या

गवि
Wed, 12/28/2011 - 12:50 नवीन
स्पावड्या.. मला वाटते आपल्या एरियात साधारण शीळफाट्यावर मारणे असतं ना त्यासारखाच अर्थ आहे. चूभूदेघे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

/-/

वपाडाव
Wed, 12/28/2011 - 12:59 नवीन
स्पावडु, मला असं वाटते की तिने एकाच दिवशी बर्‍याच जणांच्या मिटिंगा फिक्स केल्या असाव्यात.... अन त्यात तिने बंड्यासाठी कात्रजचा घाट निवडला असावा..... बाकी, सारसबाग, संभाजीबागही इतरांना दिलेली असेल पण ती इथे यमकात घुसवता येत नसल्या कारणाने उल्लेखिलेली नाही..... - (कधीच बाळ्या/बंड्या/पिंट्या न झालेला) वप्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्पा

ओक्के

स्पा
Wed, 12/28/2011 - 14:03 नवीन
आच्छा अस हाय काय.. मला उगाच घाटदार वळणांची आठवण झाली आणि मी बंड्याला उगाच लकी वेग्रे समजत होतो :D
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वपाडाव

क्या बात है !

परिकथेतील राजकुमार
Wed, 12/28/2011 - 12:52 नवीन
छानच आहे, आणि काही शब्द करुण रस देखील निर्माण करत आहेत. एकी १ प्रतिसादाला मारली फेक, दुरकी २ मालकाचा आला फोन! तीरकी ३ चावडीवरती मारली पीन, चौकी ४ अवांतराचा गोंधळ फार ! पाची ५ डूआयडींचा होतोय जाच, साही ६ जे होतय ते गुमान पहा ! साती ७ म्हातारीच्या हातचा दूध-भात , आठी ८ एकोळींनी लावलीये वाट, नौवे ९ स्वाक्षरीपेक्षा प्रतिसाद मऊ दाही १० शक्यतो लॉगईन न करताच मिपा पहा! हे एका थकलेल्या संपादकाचे मुक्तक / 'थकलेल्या संपादकाची कहाणी' कसे वाटते आहे ?
  • Log in or register to post comments

मस्त ओ पराशेट, धन्यवाद

५० फक्त
Wed, 12/28/2011 - 13:11 नवीन
मस्त ओ पराशेट, धन्यवाद धन्यवाद. मध्ये कुणीतरी मिपाच्या विडंबनांच्या परिस्थीतीबद्दल काळजी करणारा धागा काढला होता ना, त्यांची काळजी मिटली असावी.
  • Log in or register to post comments

____/\____ काय ती

प्यारे१
Wed, 12/28/2011 - 13:50 नवीन
____/\____ काय ती प्रतिभा! आहाहा. अगदी बहरच आलाय की. बालगीताच्या निमित्ताने का होईना प्रवाह वाहता झाला हे पाहून बरे वाटले.
  • Log in or register to post comments

/-/

वपाडाव
Wed, 12/28/2011 - 14:12 नवीन
बालगीताच्या निमित्ताने का होईना प्रवाह वाहता झाला हे पाहून बरे वाटले.
तुंबलेले बोळे असं म्हणायचंय का तुम्हाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

...

मी-सौरभ
Wed, 12/28/2011 - 15:33 नवीन
प्रकाटाआ
  • Log in or register to post comments

आता

मी-सौरभ
Wed, 12/28/2011 - 14:13 नवीन
२ च्या पाढ्यावर कविता करुन टाका कुणीतरी
  • Log in or register to post comments

२ एके २ सौरभने टाकले प्रतिसाद

प्रचेतस
Wed, 12/28/2011 - 14:43 नवीन
२ एके २ सौरभने टाकले प्रतिसाद २.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मी-सौरभ

=))

पैसा
Wed, 12/28/2011 - 19:02 नवीन
या बालगीताने बर्‍याच कवीना प्रेरणा पुरवली, त्यामुळे ही कविता अत्यंत यशस्वी म्हणायला हवी!
  • Log in or register to post comments

हौ ना =)) =))

प्रीत-मोहर
Wed, 12/28/2011 - 19:12 नवीन
हौ ना.. परासारखे कविता न वाचणारे लोक्स ही कविता लिवु लागलेत ... हाहाहा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पैसा

अरेरे

मी-सौरभ
Wed, 12/28/2011 - 20:02 नवीन
या बालगीताने बर्‍याच कवीना प्रेरणा पुरवली
हे गीताने बर्‍याच जणांना प्रेरणा पुरवली असे वाचले ;) शिव!! शिव!! शिव!!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रीत-मोहर

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा