समजावल आहे मनाला आता
मागे वळुन बघायच नाही.
जरी आला विचार अंतरी
आठवणीत अडकायच नाही.
झाली जखम मनाला तरी
जखमी होऊन रडायच नाही.
आपल सुख मिळाव आपल्याला तरी
हे जरी असल खर तरी
जगात कोणी कुणाच नसत
हे खोट समजायच नाही.
असेल ताकद लढायची तर
हरलेला डाव नव्या उमेदीने उभा करुन
परत कधी खचायच नाही.
मागे वळुन बघायच नाही....
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1549
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
छान ..
मस्त जमलिये कविता ...!! आवडली !!!!
फारच छान सुंदर रचना
एकदम कवी कुसुमाग्रजांची कविता आठवली.
कणा
मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून नुसते लढ म्हणा !
झक्कास........
In reply to फारच छान सुंदर रचना by लीलाधर
झक्कास........
वा! छान आहे कविता. लिहीत रहा
वा! छान आहे कविता.
लिहीत रहा !
(अगदी कृष्णाने धनंजयाला (अर्जुनाला) गीता अशीच सांगीतली असेल.)
आभार व धन्यवाद
तुम्हा सगळ्यानचे आभार व धन्यवाद