Skip to main content

मंदार पांडे (माझा मुलगा)ने काढलेली पेन्सील चित्रे .....

लेखक anirudh यांनी मंगळवार, 27/12/2011 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
मंदार पांडे (माझा मुलगा) ने काढलेली काही पेन्सील स्केचेस . 100_3700 अमरीश पुरी .... amrish puri  pencil sketch वाघ .... tiger face प्रेमी युगुल ..... 100_3659 Jacky Chan...... 100_3651 Baby Doll.... doll Realistic Eye.... 100_3419 अभिनेत्री ........ 100_3557 आमचा भू भू .......... 100_3451 निसर्ग चित्र ..... 100_3679 100_3679 Portrait.... 100_3648
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 23067
प्रतिक्रिया 46

प्रतिक्रिया

सारीच चित्रे मस्त आहेत.

अमिताभ जरा फसलाय पण ओळखु येतोय. अमरिश पुरीही ओळखु येतोय म्हणजे छानचं :) बाकी सुरेख आहेत. ढाण्या वाघांच जास्त आवडलं. तुमच्या मुला पर्यंत आमचं कौतुक पोहोचवा. :)

सुंदरच आहेत चित्रे. वय काय तुमच्य मुलाचे? अमिताभ थोडा गंडला आहे आणि अमरीश पुरी पण. पण सरावाने तुमचा मुलगा अजुन सुंदर चित्रे काढेल यात काही शंका नाही.

खुपच अप्रतिम चित्रे.... कुठलिहि कला हि दैवी देणगीच असते, नशीबवान आहे तुमचा मुलगा :) आणि मलाहि 'तोच' प्रश्न विचारावा वाटतो : "किती वर्षाचा आहे तुमचा मुलगा ?"

अप्रतिम चित्रे आहेत.

फटू नंबर १ (गंडलेला) माझ्या सारखा का दिसत आहे? असो. मस्त रेखा चित्रे.

In reply to by विनायक प्रभू

फटू नंबर १ (गंडलेला) माझ्या सारखा का दिसत आहे?>> ही ही ही .... वरील वाक्य प्रभु मास्तरांचा ते बिग बी सारखे दिसतात हे सांगण्याचा क्षीण प्रयत्न तर नसावा अशी शंका आली.... :) :) सर्व चित्रे आवडली... मंदारला अनेक शुभेच्छा आणि असेच प्रोत्साहन मिळत राहो अशी मनोकामना.

छान...छान...रेखाचित्रे..छान :-) अवांतर-अमरिश पुरी आणी वाघ-दोघांचे डोळे तेच असुन फक्त मुखवटा बदलल्यासारखा वाटतोय ;-)

वयाच्या मानाने फार सुरेख चित्र काढली आहेत. योग्य मार्गदर्शनाखाली तयारी करुन घेतल्यास खरंच प्रगती आहे. फक्त एक सजेशन, बघून एखादं चित्रं काढत असेल तर त्यावर थोडे निर्बंध आणलेत तर बरं. नंतर मग समोर चित्र ठेवल्याशिवाय पुढे काही सुचतच नाही. न बघता चित्रं काढत असेल तर मग हॅट्स ऑफ !!

अनिरुद्ध, तुमच्या मुलाचा हात, एका कलाकाराचा हात आहे. रेखाचित्रे आवडली. मंदार पांडेला माझ्या हार्दिक शुभेच्छा!

त्याचे हात पाळण्यात दिसतात ! मंदारला अनंत शुभेच्छा!

छान.. पुण्यात असाल तर आम्च्या पेठे काकांची गाठ घालुन देतो.. खुप छान चित्रकार आहेत... मार्ग दर्श्नन नक्किच करतिल..त्यांचा छंदच आहे तो..

खूप छान आली आहेत! त्याला पालकांकडून आणि शिक्षकांकडून प्रोत्साहन मिळत राहूंदेत ही शुभेच्छा!

वयाच्या मानाने फार सुरेख चित्र काढली आहेत.

सोनाली कुलकर्णी(#२) काय वो?

सर्वच रेखाचित्रे आवडली. त्यातल्यात्यात, प्रेमी युगुल, बेबी डॉल, रिअ‍ॅलिस्टीक आय, भू-भू, निसर्गचित्र वगैरे अप्रतिम. चि. मंदारच्या वयात, मी 'देखावा' ह्या शीर्षकाखाली जे काही काढायचो ते 'जतन' करून ठेवले नाही ह्याचा आज अत्यानंद झाला.

मानाचा सलाम तुमच्या मुलाला... अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम ...................... त्याचि आवड नेहमिच जोपासा.

मानाचा सलाम तुमच्या मुलाला... अप्रतिम अप्रतिम अप्रतिम अप्रतिम ...................... त्याचि आवड नेहमिच जोपासा.

छानच काढली आहेत सगळी पेन्सील चित्रे. एकदम आवडेश :) अवांतर :- येवढ्यातच प्रेमी युगल वैग्रे रेखाटायला सुरुवात ? ;)

१२ वर्षांच्या मुलाने छान काढलीयत! त्याच्यापर्यंत आमचं कौतुक पोचवा प्लीज! आणि त्याला अशीच चित्रं काढत राहूदे.

ही चित्रं रेखाटणारे हात फक्त १२ वर्षे वयाच्या मुलाचे आहेत? वयाच्या मानानं फारच छान आहेत चित्रे. जर कोणाकडं ट्रेनिंग घेत नसेल तर आवर्जुन एखाद्या चांगल्या चित्रकार/आर्टिस्ट्/ट्रेनर कडे जरुर पाठवा. अंगचीच असलेली कला छान फुलेल. मंदारला विचारालंय असं सांगा, चित्रं छान काढली आहेत, धम्याकडून काय बक्षिस हवंय. :)

प्रयत्न चांगला आहे पण अजुन खुपच सुधारणा हवी आहे. मुळ चित्रांना स्केल टाकुन नंतर ती चित्रे काढायला सांगा म्हणजे छान येतील

खूप सुंदर रेखाटने. सगळी चित्रं आवडली.