मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

एक उनाड दिवस-महाबळेश्वरात

प्रचेतस · · भटकंती
परवाच महाबळेश्वरास जाउन आलो. तिथले काही फोटू येथे डकवत आहे. १. वाईचे काशीविश्वेश्वर मंदिर २. मंदिराचे कळस ३ शेजारीच असलेला गणपती मंदिरातील ढोल्या गणपती ४. पाचगणीतील पारशी पॉईंटवरून दिसणारा कमळगड ५. महाबळेश्वरात जाताना मध्ये एका ठिकाणी गो-कार्टींग केले ६. महाबळेश्वरावरून दिसणारे सह्याद्रीचे कडे ७. मढीमहाल उर्फ आर्थर सीट पॉईंट ८. सह्याद्रीच्या कड्यांची पायर्‍या पायर्‍यांची प्रस्तर रचना ९. डेक्कन ट्रॅप १०. मंकी पॉईंट ११.रायरेश्वर १२. सह्याद्रीच्या कडेकपारी १३. सावित्रीचे खोरे १४. चंद्रगड १५. वेण्णा तलावाच्या काठावर १६. सुरम्य संध्याकाळ १७. स्ट्रॉबेरीच्या शेतात १८. लालचुटूक स्ट्रॉबेरी १९. शेवटी जाताना स्ट्रॉबेरी विथ क्रीम २०. स्ट्रॉबेरी विथ क्रीम

वाचने 23831 वाचनखूण प्रतिक्रिया 50

स्पा Tue, 12/27/2011 - 14:40
अप्रतिम रे वल्ली... कातील फोटो आलेत सह्याद्रीचे सगळेच फोटो देखणे आलेत. संध्याकाळचे फोटू पण मस्तच चला सगळे जाऊ , महाबळेश्वरात

In reply to by स्पा

मितभाषी Tue, 12/27/2011 - 20:51
अप्रतिम रे वल्ली... कातील फोटो आलेत सह्याद्रीचे सगळेच फोटो देखणे आलेत. संध्याकाळचे फोटू पण मस्तच चला सगळे जाऊ , महाबळेश्वरात ________________________________________
असेच म्हणतो. लै भारीईईईई

लीलाधर Tue, 12/27/2011 - 14:41
आता जाणे होणारच आहे फेब्रुवारीत मस्तच रे वल्ल्या फारच छान आणि :) अतिशय सुंदर मनमोहक, मनाला भुरळ पाडणारी अप्रतिम फोटोग्राफी.

अन्या दातार Tue, 12/27/2011 - 14:46
फोटो अप्रतिम. विशेषतः शेवटचे दोन ;) अवांतरः स्ट्रॉबेरी विथ क्रीम नक्की कुणाबरोबर खाल्ले रे?? स्पा काकांचा सल्ला लक्षात होता ना लोहगड धाग्यावरचा की विसरलास?? ;)

विजय_आंग्रे Tue, 12/27/2011 - 14:49
मुंबई कींव्हा एलिफीस्टन टोकावरुन घेतलेला प्रतापगडाचा ही एकादा फोटो हवा होता. सुंदर प्रकाशचित्रे !

सर्वसाक्षी Tue, 12/27/2011 - 14:49
मजा आली. वर घरबसल्या ढोल्या गणपतीचे दर्शन आणि तेही मंगळवारी. धन्यवाद

अमृत Tue, 12/27/2011 - 15:08
सह्याद्रीचे फोटो खूप आवडलेत इतरही फोटो छानचं..... महाबळेश्वरची सफर घडविल्याबद्दल धन्यवाद.... अमृत

पक पक पक Tue, 12/27/2011 - 15:36
फोटो खुप मस्त आले आहेत ,भरपुर मजा केलेली दिसते आहे, ते कार्टिंग कुठे केले...? ): मुड बनला महाब्ळेश्वरला जाण्याचा.धन्यवाद वल्लि महाशय....

५० फक्त Tue, 12/27/2011 - 17:52
अच्छा म्हणजे तुम्ही उनाड, भाकड, उत्तम असे पंचांगात दिवस पाहुन फिरायला जाता काय ? असो, एका उनाड दिवसातल्या उनाड्क्या बद्दल लिहिलं पाहिजे ना, नुसतेच छान छान फोटो काय टाकताय ?

सुधांशुनूलकर Tue, 12/27/2011 - 20:16
छान फोटो. स्ट्रॉबेरीबरोबरच मलबेरी (तुती) चा सीझन असला तर दुधात साखरच ! आम्ही मे महिन्यात गेलो होतो तेव्हा उत्कृष्ट मलबेरी भरपूर खायला मिळाली. malberry आणखी एक : महाबळेश्वरपेक्षा पाचगणीला मुक्काम करावा असं सुचवावसं वाटतं......महाबळेश्वरमधे फार गर्दी असल्यास.

In reply to by सुधांशुनूलकर

अन्या दातार Tue, 12/27/2011 - 20:51
आम्ही मे महिन्यात गेलो होतो तेव्हा उत्कृष्ट मलबेरी भरपूर खायला मिळाली. महाबळेश्वरपेक्षा पाचगणीला मुक्काम करावा असं सुचवावसं वाटतं......महाबळेश्वरमधे फार गर्दी असल्यास.
ऐकतोयस ना रे वल्ली?? ;)

In reply to by अन्या दातार

५० फक्त Wed, 12/28/2011 - 06:56
अरे तो कशाला ऐकतोय आता, त्याचं झालंय ना बुकिंग, हां प्रश्न उरला गर्दीचा तर गर्दी काय रस्त्यावर, बाजारपेठेत असणार आहे....

फोटोंबद्दल काय बोलणार ... वल्लिदा...एक सो एक आहेत... अख्खं प्रदर्शन अवडलचं,पण त्या शेवटच्या स्ट्रॉबेरीच्या दोन स्टॉलनी घात केला राव. अगदी अमचं क्रीम काढलं कि वो...! अत्ताच्या अता जावंसं वाटतय. अजेबात र्‍हाव्वत न्हाय बगा...ग्येलो ग्येलो आमी आता म्हाबळेव्शरात...!

धमाल मुलगा Wed, 12/28/2011 - 16:47
एव्हढे डोंगरदर्‍यांचे वगैरे फोटो काढलेयत म्हणजे एकटाच गेला होतास वाटतं. काय, सध्या हिलस्टेशन्स इव्हॅल्युएशन' करतोयस असं दिसतंय. ;) फोटूबद्दल नो कमेंट्स! वल्लीचा क्यामेरा भारीए आणि त्यानं क्लिकपण नाही केलं तरी लै भारी फोटू निघतात हे मला ठौक है :D

In reply to by धमाल मुलगा

स्पा Wed, 12/28/2011 - 16:49
फोटूबद्दल नो कमेंट्स! वल्लीचा क्यामेरा भारीए आणि त्यानं क्लिकपण नाही केलं तरी लै भारी फोटू निघतात हे मला ठौक है असेच म्हणटॉ :)

निश Wed, 12/28/2011 - 16:49
लय भारी खरच मस्त आहेत फोटों एकदम सुन्दर आहेत फोटों १० वीत असताना गेलेल्या शाळेच्या सहलिची आठवण झाली.

पैसा Wed, 12/28/2011 - 18:34
सह्याद्रिचं सगळं रौद्र सौंदर्य मस्त टिपलंय. बाकी फोटो पण फार छान! मी गेल्या वर्षी गणपतीत महाबळेश्वरला गेले होते तेव्हा इतका पाऊस होता, की ढगातून गाडी चालवावी लागत होती, त्यामुळे अक्षरशः काही दिसलं नाही. पण या फोटोंमुळे महाबळेश्वर पाहिल्यासारखं वाटलं.

सविता००१ Fri, 12/30/2011 - 14:14
ग्रँड फोटो आहेत. जीवघेणे ' स्ट्रॉबेरी विथ क्रीम'. वल्लीबाबा खरच क्लासिक आहेत सगळे फोटो