Skip to main content

पुणे वाइन फेस्टीव्हल - 2011आणि दर्दी मिपाकर

लेखक सोत्रि यांनी सोमवार, 26/12/2011 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
Pune Gourmet Club पुण्यात 2007 पासून पुणे वाइन फेस्टीव्हल आयोजीत करते. पुण्याबरोबर मुंबईला बांद्र्यालाही हा वाइन फेस्टीव्हल ते आयोजीत करतात. अस्सल वाइनप्रेमींसाठी वेगवेगळ्या वाइनरीजच्या वाइन्स चाखण्याची आणि विकत घेण्याची, एकाच ठिकाणी, एक मस्त संधी ह्या निमीत्ताने प्राप्त होते. ह्या शनिवारी काही मिपांकरांसोबत पुणे वाइन फस्टीव्हल 2011 ला हजेरी लावण्याचा योग आला (सहकुटुंब). खरचं खूप धमाल आली. जवळजवळ 16 वाइनरीजचे स्टॉल्स ह्या वेळी होते. तसेच खाण्याचेही बरेच स्टॉल्स असल्यामुळे वाइन चाखण्याबरोबरच खादाडीची सोय उपलब्ध होती. ह्या इथे स्वागतकक्षात प्रवेशाचे सोपस्कार पार पाडून आत गेलो. खरेतर उशीरचं झाला होता पोहोचायला,चांगलेच अंधारून आले होते. आत गेल्यावरचा नजारा असा होता. एक फेरी मारून सर्व स्टॉल्सचा अंदाज घेतला. मग धम्याच्या सल्ल्यानुसार 'नाइन हिल्स' ह्या वाइनरीच्या स्टॉलपासून वाइन 'टेस्टींगला' सुरुवात केली. धम्याने ह्याच स्टॉलपासून का सुरवात करायला सांगीतले हे बाकीचे स्टॉल्स बघितल्यावर कळून आले. ;) इथे मी सुरुवात केली 'सोविन्यॉन ब्लॅं' आणि 'शेनिन ब्लॅँ' ह्या व्हाइट वाइनपासून. धम्याने ह्या वाइअनरीची नविन लॉन्च केलेली वाइन 'विऑन्यें' ट्राय केली. इथे मी माझ्या वाइनच्या तुटपुंज्या माहितीच्याआधारे वाइन टेस्टींगच्या 'वाइन बघणे', 'वाइनचा गंध अनुभवणे' आणि 'वाइन चाखणे' ह्या स्टेप्स उपस्थित मिपाकरांना समजावून सांगीतल्या. त्यांना त्या पटल्याने जरा आनंदही झाला. पुढच्या वाइअनरीकडे गेलो तीथे रेड वाइनमधे शिराझ होती. माझे आणि सिराझचे जरा वाकडे असल्याने मी परत व्हाइट वाइनकडेच मोर्चा वळवला. इथे होती 'शॅर्दोने'. मग जरा वाइन चाखत चाखत आजूबाजूची प्रेक्षणीय स्थळे बघण्यात पराने बराच वेळ घालवला. इथे आमचे कुटुंब मुलांचा पोटोबा करण्याकरिता गेले असल्याने मलाही ह्या संधीचा फायदा करून घेता आला. त्यानंतर मोर्चा वळवला 'झंपा' ह्या वायनरीच्या स्टॉलकडे. इथल्या वाइन्स जरा जास्तच अ‍ॅसीडीक होत्या कदाचित त्यांचे तापमान योग्य नसल्यामुळे असेल. पण इथे 'सुला' वाइन्स कश्या चांगल्या असतात ह्यावर आमची चर्चा झाली. ती नेमकी त्या स्टॉलवाल्याने ऐकली. मग सुला सध्या 'वाइनमधे कशी गडबड करते' ह्यावर त्याचे मौलिक विचार ऐकायला मिळाले. ते ऐकून पुढे सरकलो 'किंगफिशर' च्या स्टॉलकडे. इथे 'शॅर्दोने' आणि 'शिनेन ब्लॅं' ह्या द्राक्षांचा ब्लेंड असलेली व्हाइट वाइन होती. हे कॉम्बीनेशनच इतके अपीलिंग होते की लगेच ट्राय केले. अतिशय सुंदर वाइन. वाइअनचे तापमान मस्त असल्याने अतिशय भन्नाट लागली. लागलीच ती विकत घ्यायचे ठरले आणि शेवटी निघताना विकत घेतली. आता शोध घ्यायचा होता 'झिनफॅन्डलचा' कारण ती अजूनही कुठेच दिसली नव्हती. मग फिरून शोध घेतल्यावर झिनफॅन्डल मिळाली 'यॉर्क' नावाच्या वायनरीच्या स्टॉलवर. सगळ्यांना तिकडे मोर्चा वळवायला सांगीतला. इथे झिनफॅन्ड्लची रोज वाइन ट्राय केली. एकदम मस्त होती. विकत घेण्याचे ठरवून शेवटी परत येताना विकत घेतली. इथे असताना वपाडावचे आगमन झाल. त्याला मर्गदर्शनाकरून यॉर्कच्या बाजूलाच 'फोर सीजन्स' वायनरीचा स्टॉल होता. तेथे मोर्चा वळवला. ह्या स्टॉलवर 'ब्लश' ब्रॅन्ड्ची रोज वाइन टेस्ट केली. अतिशय भन्नाट वाइन होती. बाकीच्यांसाठी एक नविन बाटली फोडली जीचे तापमान एकदम परफेक्ट होते. त्यामुळे ब्लॅशचा लुत्फ मनमुराद घेता आला. ब्लश घेत असतानाच 'वाइन स्टॉम्पिंगची' घोषणा झाली आणि लगेच तीथे मोर्चा वळवला. पण एकंदरीत हा असा माहोल बघता 'स्टॉम्पिंग' कमी आणि 'स्टेम्पीड' जास्त असे वाटल्याने फार वेळ न घालवता बाकीच्या वाइनरीजकडे मोर्चा वळवला. पण वपाडाव (नवाबी शौक असणारे) ह्यांनी आणि त्यांच्या मित्रांनी ह्या संधीचा 'लाभ' घेतला. त्यांच्या पदस्पर्शाने द्राक्षे पावन झाली. त्यानंतर बर्‍याच वाइअनरीजच्या स्टॉल्सवर रेड वाईन, रोज वाइन आणि व्हाइट वाइन्स चाखल्या. काही बर्‍या होत्या तर काही ओके होत्या. यानंतर एक कॉकटेल काउंटर दिसला जो बघितल्यावर आम्हा सर्वांनाच आनंद झाला. तिथे काही मित्रांनी रेड वाइनचे आणि मी 'स्प्राईट्झर' नावाचे व्हाईट वाइनचे कॉकटेल ट्राय केले. रेड वाइनचे कॉकटेल एकदम बकवास निघाले त्याचे नावही विसरलो ह्यातच सगळे आले. स्प्राईट्झर बरे होते. रेसिपी व्हाईट वाइन 30 मिली स्प्राइट - ग्लास टॉप अप ग्रॅपा (द्राक्षाचा सिरप) - 15 मिली हजेरी लावलेले मिपाकर डावीकडून: ध.मु., सोत्रि, विवेक मोडक, प्रीत-मोहोर (हीने फक्त वाइनचा ग्लास धरून अ‍ॅक्टींग केली आहे ;) ) , परा डावीकडून: विवेक मोडक, परा आणि वपाडाव मधेच धम्याने सिगार पैदा केला कुठून तरी त्याने आणखीणच मजा आली. धम्याच्या चेहेर्‍यावरून ते दिसते आहेच. डावीकडून: सौ सोत्रि, सौ ध.मु. , जुनियर ध.मु., आणि प्रीत-मोहोर रात्री साधारण दहाच्या सुमाराला परत निघालो. एकंदरीत ४-५ तास अगदी मजेत आणि हवेत तरंगत गेले. वाइन हे तर कारण होतेच पण दर्दी मिपाकरांची संगत चार चाँद लावून गेली.

वाचने 42997
प्रतिक्रिया 94

प्रतिक्रिया

In reply to by परिकथेतील राजकुमार

५०% सवलत होती ना कुपन दिल्यावर? :P तुम्ही तिच्यायला त्या निर्मलसिंगाच्या गोग्गोड बोलण्याला फसलात त्याला कोणी काय कराव? तो म्हणाआहे""मी मराठी आहे" की भुलले तिच्यायला! आम्ही आधीच बोलुन घेतलं होतं त्यामुळं 'मँ पंजाबी हां बाश्शाओ, बिज्ज्यनेस मेरे खूनविच हां।' हे ऐकुन आम्ही मापातच खेळलो. :P रॅपिड फायर बरं होतं. (आणी मी आग्रहानं त्यात आणखी ग्रॅप्पा ओतायला लावल्यामुळं तर अंमळ जास्तच भिर्रर्र छान वाटत होतं. ;) )

In reply to by धमाल मुलगा

शेवटी घेऊ घेऊ म्हणत ग्लु वाईनच्या काऊंटरला भेट द्यायचं राहिलंच गडबडीत. त्याची एक रुखरुख लागून राहिली आहे.
पुण्यात ग्लु वाईन घेतली नाहीत हेच बरं केलंत. मी कालच इथे ग्लु वाईन पहिल्यांदा घेवून पाहिली. पण तिचा लुफ्त घ्यायला लागणारा महत्त्वाचा घटक म्हणजे कडाक्याची थंडीच नव्हती! त्यामुळे सुरुवातीचे २-३ घोट झाल्यावर (आणि वाईन गरम वरून कोमट झाल्यावर) अगदी औषधाहूनही बेकार लागत होती. त्यामुळे एवढाच सल्ला देईन की हाडं गोठवणारी कडाक्याची थंडी असल्याशिवाय ग्लु वाईनच्या वाटेला जावू नये.

In reply to by स्मिता.

तो शब्द 'लुत्फ' आहे ह्याची नोंद घेतल्या जावी. अन्यथा मिपावरील उर्दू अभ्यासकांच्या मनाची तडफड व्हायची.

In reply to by परिकथेतील राजकुमार

>>> 'ग्रॅप्पा' हे ५३% अल्कोहोल कंटेट्स असलेलं ... बापरे! एवढे अल्कोहोलचे प्रमाण वाईनमध्ये असते का हो सोकाजी? हे म्हणजे टांगा पल्टी करायला फारच उत्तम दिसते आहे.

In reply to by पाषाणभेद

हो ग्रॅप्पा मधे ४०-८०% अल्कोहोल असू शकते. ग्रॅप्पा ही एक 'Pomace brandy' आहे. वाइनसाठी द्राक्षांचा रस काढून झाल्यावर शिल्लक राहिलेला द्राक्षांच्या सालीचा लगदा / गाळ ह्यापासून ग्रॅप्पा तयार करतात. - (साकिया) सोकाजी

ग्लु वाईनच्या काऊंटरला भेट द्यायचं राहिलंच गडबडीत.
आयचा घोsss खरंच की :( हे सगळं त्या वप्यामुळे आणि त्याच्या त्या द्राक्ष तुडवलेल्या केसाळ पायांचे फोटो काढण्याच्या गडबडीमुळे घडंल! वप्या गुन्हेगार आहे. धम्या, काय शिक्षा करावी ह्याला? - (दोष दुसर्‍यांवर ढकलण्यात पटाईत असलेला) सोकाजी

In reply to by सोत्रि

पहिलीच चूक है, जाव माफ कर दिया. (वप्या, एक शिराझ रिझर्व्हचा क्रेट माझ्याकडं धाडून दे बे.)

छान.....!!! चालू द्या....! बाकी, वृत्तांत आणि प्रतिसाद माहितीपूर्ण आहेत. :) -दिलीप बिरुटे

वृत्तां-त वाचुनच ढगात गेलो... बेफाम कल्ला केला बाकि सोकाजी आणी कंपनीने...लगे रहो..लगे रहो..मजा है भाइ... सगळे फोटु बी लै ब्येस आल्याती,हां....पण ज्युनिअर ध.मु. अगदी गोंदुश..गोंदुश आहे हो दिसायला. (पुण्यात असुन पिण्यात नसलेला)...अत्रुप्त आत्मा

शेतकरी आत्महत्या करत असताना, स्वयंपाक करता येणारी बायको न मिळाल्याने आयटीची पोरं भुकेनी तडफडत असताना, मद्यार्कासाठी धान्य मिळत नसताना काही सदस्य अशा प्रकारचे धागे काढुन त्यावर चवीचवीने चर्चा करताना पाहुन एक मिपाकर म्हणुन शरम वाटली. [प्रेरणा - :)]

In reply to by नंदन

नंदोबाशी सहमत आहे... शरमेवर उतारा म्हणून म्यानेजर नी नाताळची गिफ्ट म्हणून दिलेली फाँटॅना दी पापा, लाझियो (ईटालीयन - रेड वाईन) घेण्यात यील...

वाह वाह... मस्त... असे कट्टे होताना कळवत जा रे..... ईनो किती महाग झालंय, सारखं सारखं परवडत नाय ;)

हा हा. धाग्याप्रमाणेच प्रतिसादसुद्धा भन्नाट येणार याची खात्री असल्यामुळे आत्ता सवडीने धागा वाचला. आणि निराशा झाली नाही! :)

अप्रतीम लेख झालाय. भारतीय वाईन ह्या आता जागतिक बाजारपेठेत हळू हळू बस्तान बसवू लागल्या आहेत. तेव्हा भारतात त्या विषयी जागरुकता वाढणे हा स्तुत्य उपक्रम आहे. त्यामुळे देशी बाजारपेठ त्यांना उपलब्ध होईन. ग्लू वाईन साठी थंड वातावरण हवे नाहीतर ती औषधी काढ्या सारखी वाटते. मात्र भारत थंडीत ती घेतांना जी काही मौज येते व थोड्या वेळानंतर तिची किक बसते त्याला तोड नाही. म्हणजे एखादा नवशिका २ ते ३ पेले सहज रिते करायचा व अर्ध्या तासानंतर त्याचे विमान ..........

In reply to by प्यारे१

प्रत्येकाचा दर्द वेगळा असणार ना? काहींना असण्याचे काहींना नसण्याचे. फक्त बायको हा कॉमन फॅक्टर असणार त्यात...

मस्त लेख, छान फोटो, नव हुच्चभ्रूंचे फोटो सगळं पाहून बरंऽऽ वाटलं. प्रतिक्रिया पण लेखासारख्याच चुरचुरीत आहेत!

ह्या क्लबचा पत्ता कोणी देइल का. ही सगळी चित्र बघुन मला सुद्धा फेरफटका मारावासा वाट्तोय.

In reply to by हरकाम्या

हा फेस्टिव्हल फक्त २ दिवसच (२४,२५ डिसेंबर) होता :( - (दारु जत्रेतील जत्रेकरू) सोकाजी