Skip to main content

वोडार

लेखक ajay wankhede यांनी रविवार, 25/12/2011 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
मी ओडार, नाही हो नागरिक या देसाचा जागा दिसली खुली का ताण डेरा न.. मंग सकाळ पासून दे दनादन घाल घाव काळ्या ठीक्कार दगडावर... घामाच्या धारा,छेनि, हातोडी टक.. टक.. टाक न मंग साकारते मूर्ती देवाची लय भारी .... झाली संध्याकाळ, चुली पेटल्या, डेर्यामंदी शेंबड्या, नगडया पोराय्चा किलबिलाट बयकाय्चि काव काव.. थकलो दमलो कि रीचवतो मंग या देसाची देसी तरी लेकाचा नाय हो नागरिक या देसाचा लयी ताप ,, या देसाची देसी लयी चढते भारी न मंग लागतो परत कामाले, रात भर घुसळतो बायकोले.... चेनी हातोडी परीस मोठा ले घाव ...दनादन दनादन दिवस येतत न जातत दर वरीस वाणी माही बायको जलमते एका पोराले, मी बनवतो देवाले पण तो बी लय भारी दर वरीस घडवते नव्या नव्या मूर्त्यां, चालत्या बोलत्या...... मंग वाटाले लागते माह्या परीस भारी मोठठा वोडार हाये तो.. लईच वाढवते भुईचा भार मंग तो असन काय या हो या देसाचा नागरिक कोणी सांगण काय हो मले?
लेखनविषय:

वाचने 2049
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

न मंग लागतो परत कामाले, रात भर घुसळतो बायकोले.... चेनी हातोडी परीस मोठा ले घाव ...दनादन दनादन दिवस येतत न जातत दर वरीस वाणी शिव्..शिव...शिव , अरे हे काय काव्य म्हणायचे कि अश्लिलता प्रसार....

In reply to by पक पक पक

ज्या मंडळींना स्वःनामानं जालावर यायची लाज वाट्ते त्यान्नि शालिनते च्या गप्पा मारु नयेत. पक पक पक साहेब अशी रेसिपी पच्वायला सशक्त पाचन शक्ति ची गरज आहे तुम्हाला. असो प्रतिसादा बद्दल धन्यवाद.

In reply to by ajay wankhede

व्हय व्हय आज पाटणकर काढा घ्यावा म्हण्तो.. ते देसि वगैरे काय जमत नाय्,उगाच एखादी कविता सुचायची नाय का ?

@मंग वाटाले लागते माह्या परीस भारी मोठठा वोडार हाये तो.. लईच वाढवते भुईचा भार मंग तो असन काय या हो या देसाचा नागरिक कोणी सांगण काय हो मले?... एंडिंग लै अवडल बगा अपल्याला....छान कोडं घातलय

प्रिय मित्र अजय, निशब्द झालो. खूप दिवसानी येणे झाले आणिक तुझे नाव दिसताच काव्य वाचले. जब्बरदस्तच उंची आहे काव्यास. लिहित रहा.. हेच 'ओरिजिनल' काव्य. वेगळाच विषय. सुंदर लिहिले आहेस. पुलेशु. आ. - निनाव.