मी ओडार,
नाही हो नागरिक या देसाचा
जागा दिसली खुली का ताण डेरा न..
मंग सकाळ पासून दे दनादन घाल घाव
काळ्या ठीक्कार दगडावर...
घामाच्या धारा,छेनि, हातोडी टक.. टक.. टाक
न मंग साकारते मूर्ती देवाची लय भारी ....
झाली संध्याकाळ, चुली पेटल्या,
डेर्यामंदी शेंबड्या, नगडया पोराय्चा किलबिलाट
बयकाय्चि काव काव..
थकलो दमलो कि रीचवतो मंग या देसाची देसी
तरी लेकाचा नाय हो नागरिक या देसाचा
लयी ताप ,,
या देसाची देसी लयी चढते भारी
न मंग लागतो परत कामाले,
रात भर घुसळतो बायकोले....
चेनी हातोडी परीस मोठा ले घाव ...दनादन दनादन
दिवस येतत न जातत दर वरीस वाणी
माही बायको जलमते एका पोराले,
मी बनवतो देवाले पण तो बी लय भारी
दर वरीस घडवते नव्या नव्या मूर्त्यां,
चालत्या बोलत्या......
मंग वाटाले लागते माह्या परीस भारी मोठठा
वोडार हाये तो..
लईच वाढवते भुईचा भार
मंग तो असन काय या हो या देसाचा नागरिक
कोणी सांगण काय हो मले?
वाचने
2028
प्रतिक्रिया
8
मिसळपाव
प्रतिक्रिया
न मंग लागतो परत कामाले, रात
या देसाची देसी लयी चढते
आपली महत्वाची कामच उरकायचीत
In reply to या देसाची देसी लयी चढते by पक पक पक
व्ह्यय सद्ध्या तसच समजा...
पक पक पक
In reply to व्ह्यय सद्ध्या तसच समजा... by पक पक पक
व्हय व्हय आज पाटणकर काढा
In reply to पक पक पक by ajay wankhede
@मंग वाटाले लागते माह्या परीस
प्रिय मित्र अजय, निशब्द झालो.