प्रिय मित्रा
प्रिय मित्रा,
आज बरेच दिवसांनी "सुहृदगाथा" बाहेर काढले. बराच वेळ मुखपृष्टावरील अवचटांचे अजिंठाचे रेखाटन पहात बसलो. आतल्या कवितांना साजेसे गूढ. रंग सुद्धा आतील कवीतांसारखेच. पुस्तक उघडून पहिले पान पाहिले आणि एक मोठा धक्का बसला. त्यावर तू लिहले आहेस
शब्द संपतात तिथून सुरू होणार्या दोस्तीला मला
एवढेच कळवायच
संध्याकाळची प्रत्येक कविता
मी बकुळफुलात जपून ठेवलीय
२६-१-१९७९
बस. एवढेच. सहीसुद्धा नाही. तुला त्याची गरज वाटली नाही. व त्यावेळी मलाही. पु.शि. रेग्यांचा कविता संग्रह व ग्रेसची आठवण करून देणारा, दोस्तीला बकुळफुलांचा सुगंध देणारा ... उभ्या आयुष्यात किती जण भेटतात अशा कवीमनाची ? वाढदिवसाला अशी भेट मिळाल्याने आपल्या सर्व मित्रांच्या आनंदात त्या दिवशी मोठी भर पडली असणारच. पण आज धक्का बसला म्हणतो तो या करिता की आज मला तुझे नावच आठवत नाहीये.
मित्रा, रागावू नकोस. नव्हे, तू रागवणार नाहिस याची मला खात्री आहे. आज "लागले नेत्र रे पैलतीरी " अशी आपल्या सर्वांचीच वेळ आली आहे. पैलतीराकडे बघत बघत आपण कालनदीत उतरलो आहोतच. पोटरीपर्यंत पाणी पोचले आहेच. तेव्हा विस्मरण हा शाप नसून एक देणगीच आहे असे म्हणावयाचे हे दिवस. का म्हणून वाईट वाटून घ्यावयाचे ? आता शांती मिळवावयाचा प्रयत्न करावयाचा. अशा वेळी या डोहात एखादा पूर्वस्मृतीचा दगड पडला तर जे तरंग उठतात ते बर्याच वेळी क्लेशकारकच ठरतात. पूर्वी ऊठसूट प्रत्येक गोष्टीवर वाद घालावयाची, पत्ते खेळतांना तर हमखास भांडणे काढावयाची सवयच होती. सौ. म्हणावयाची " कशाला किरकोळ गोष्टीत भांडणे काढता ? " तर मी म्हणावयाचो " मित्रांशी भांडावयाचे नाही तर काय ८-१२ आणे जास्त काढणार्या अनोळखी रिक्षावाल्याशी हुज्जत घालावयाची ?" तुम्ही तर हसून नेत होता. त्या वेळीं " आपणच खरे " असा खोटा आनंद होता. तो तुमचा मोठेपणा होता हे आज कळते . इतक्या उशिरा; वेळ निघून गेल्यावर !
सागरांत भेटणार्या दोन ओंडक्यांसारखी आपली भेट. आयुष्यभर थोडीच संगत मिळणार होती ? केव्हा विलग झालो ,कळलेही नाही. पण एक नक्की. तुम्ही मित्र माझ्या जीवनांत आनंदाचे वेल लावून गेलात. माळी विस्मृतीत गेला असला तरी त्या वेलांच्या फुलांनी माझे जगणे समृद्ध झाले इतके आजही जाणवते.
प्रिय मित्रा, आयुष्याच्या या वळणावर क्षमा मागणे हे निरर्थक आहे हे मला कळते. त्यामुळे एवढेच म्हणतो कीं पुढच्या जन्मी तुझ्या सारखेच मित्र परत मिळोत व त्या वेळी त्यांची किंमत योग्य वेळी कळो.
शरद
वर्गीकरण
प्रतिक्रिया
थोडंसं ऑफ द टॉपिक
भावनाशिल लेख..... मित्र कोण
शरदराव,
सुरेख!
कित्येक वर्षं पहात आलेल्या
अतिअवांतर शंका.. आधीच्या
मला वाटते, प्रतिकिया ह्याखाली
जमलं...आभार..
या प्रतिसादाबद्दल अनेक
छान !
सगळ्यांने मिळून येडं बनवलं
नाही हो.. खरोखर माहीत नव्हतं.
वांदो नथी.
वांदो नथी. मलाही जमल्या गेलं
छ्या...
मला कधी जमकोणते बघू मला जमते
अरे वा..
मुक्तक
+१
मुक्तक तर प्रचंड आवडलं. आणि
+१
वाह वाह! अप्रतिम!! सुंदर
+१
खुपच छान!
अप्रतिम लेख. खूप दिवसांनी अस
मुक्तक अतिशय आवडले.
मुक्तक आवडले.
सुंदर...!!
अतिशय, तरल ,सुंदर वा मस्तच
सुरेख मुक्तक !
भावले...
छान मुक्तक. आवडले.
क्षण सरता तो जलद गतीने, पाऊले
वा.. जियो..
शरदजी, तुमच्या भावना यापेक्षा