मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पुन्हा एकदा लोहगड

प्रचेतस · · भटकंती
नुकत्याच सरलेल्या पावसाळ्यात लोहगडला मुसळधार पावसात चिंब चिंब झालो होतो. धुव्वाधार पावसामुळे किल्ल्याचे फारसे फोटो काढता आले नाहीत. या रविवारी अनपेक्षितपणे लोहगडवारी पदरात पडली व किल्ला टिपण्याची हौस पुरेपूर भागवून घेतली. १. पवना धरणाच्या बाजूने दिसणारा लोहगड २. गडाची बळकट तटबंदी ३.गोमुखी बांधणीचा गणेश दरवाजा ४. बुरुजाच्या जंघ्यांमधून दिसत असलेली लोहगडवाडी ५. गडाचा दुसरा दरवाजा-नारायण दरवाजा ६.नारायण दरवाजा ७.नारायण दरवाजातून ८.गडाचा सर्वात प्राचीन हनुमान दरवाजा ९. सर्वात शेवटचा महादरवाजा १०. गडावरून दिसणारी दरवाजांची संरचना ११. गडावरील दर्गा १२. समोरच असलेला विसापूर किल्ला १३. विसापूर-थोडा अधिक जवळून १४. त्र्यंबक टाके १५. नाना फडणीसांनी बांधलेला प्रशस्त हत्ती तलाव १६. आभाळात घुसलेला विंचूकाटा-लोहगडाची एक माची १७. विंचूकाटा १८. विंचूकाट्याच्या शेवटी असलेला चिलखती बुरुज १९. विंचूकाट्यावर उतरायचा मार्ग २०. लोहगडावरचे प्रशस्त पठार २१. किल्ला उतरताना २२. बुरुजावर बसलेले मर्कट

वाचने 19169 वाचनखूण प्रतिक्रिया 29

नंदन Tue, 12/20/2011 - 09:24
मस्त आलेत फोटो. नारायण दरवाजातून टिपलेला आणि दरवाज्यांची रचना दाखवणारा फोटो विशेष आवडले.

In reply to by स्पा

मी-सौरभ Fri, 12/23/2011 - 18:28
अवांतर : वल्ली राव आता एकटे एकटे भटकू नका
आपल्या सल्ल्याचा विचार युद्धपातळीवर चालू आहे असे आमचा चिंचवड्च्या खबरी ने कॉलवले आहे....

५० फक्त Tue, 12/20/2011 - 10:18
मस्त झाली आहे रे ट्रिप, आणि फोटो पण मस्त. अवांतर - अवांतर : वल्ली राव आता एकटे एकटे भटकू नका - बघा बरं स्पा कसा सुधारला, गणपती पुळ्याला कुणाला तरी घेउन गेला होता, गावाला गेला होता, आणि तुमच्या सारखंच ज्याच्या बरोबर गेला होता त्या व्यक्तीचा एक सुद्धा फोटो काढलेला नाही.

झकासराव Tue, 12/20/2011 - 12:18
वाह! मस्त आहेत फोटो. :) आतापर्यंत लोहगडाला ३-४ वेळा भेट दिली आहे पण आभाळात घुसलेला विंचुकाटा ह्या फोटोत जो अँगल आहे तो कधी लक्षात आलाच नाही. मी अशा जबरी अँगलमध्ये पाहिलेला विंचुकाट्याचा हा पहिलाच फोटो. :) बाय द वे, एकाच दिवसात लोहगड आणि विसापुर करता येतात. तिकडेही चक्कर मारायची ना राव. बरच पब्लिक लोहगडावर जात पण विसापुरला नाही जात. तो हि सोपा प्रकारातलाच आहे. :)

In reply to by झकासराव

प्रचेतस Tue, 12/20/2011 - 12:25
विसापूरला एक दोन वेळा जाऊन आलेलो आहे. पाटणच्या बाजूने काट्याकुट्यातून वाट काढत मुख्य दरवाजातून चढून पलीकडच्या खोदीव गुहेनजीकच्या घळीच्या मार्गाने उतरलेलो आहे.

नरेंद्र गोळे Tue, 12/20/2011 - 15:38
काय टिपून घ्यायला हवे, हे तुम्हाला चांगलेच कळतय! उत्तम तटबंदीचे सुरेख प्रकाशचित्र आवडले. मात्र इतक्या मातब्बर तटबंदीत, अपेक्षा करावी असा राज-महाल कुठेही, कोणत्याही किल्ल्यावर दिसत नाही. हे मराठी राज्यकर्त्यांचे समाजवादी धोरण समजायचे की आक्रमकांनी काहीही भव्य-दिव्य-देखणे-नामचीन बांधकाम शाबूत ठेवले नाही ह्याचे द्योतक?

In reply to by नरेंद्र गोळे

प्रचेतस Tue, 12/20/2011 - 15:52
मराठी राज्यकर्त्यांच्या किल्ल्यांवर दिसणारे भग्नावशेष हे त्यांच्या लढाऊ, झुंझार वृत्तीचे द्योतक आहेत. हे किल्ले म्हणजे परकीय आक्रमकांना शरण गेल्यामुळे शाबूत राहिलेले बांधकाम नव्हे, ती तर रणमैदानातील धगधगती अग्निकुंडच जणू.

In reply to by मी-सौरभ

या सुंदर धाग्याच्या कळसावर फडकणारा भगवा झेंडाच आहे.... येस..येस..येस..सौरभभाऊंशी एकदम सहमत+++++++++++++१११११११११११११११

In reply to by रघुनाथ.केरकर

प्रचेतस Tue, 12/20/2011 - 21:54
ते तुम्ही कुठं राहता यावर अवलंबून आहे. पुणे-मुंबईत असाल तर एका दिवसात सहज जमण्यासारखा आहे. लोकलने मळवलीला उतरून भाजेमार्गे साधारण २ तासात पायपीट करून गडावर पोहोचता येते किंवा लोणावळ्यावरून दुधिवरे खिंडीच्या अलिकडच्या फाट्यावरून खडबडीत गाडीमार्गाने थेट लोहगडवाडीपर्यंत गाडी नेऊन अर्ध्या तासात माथा गाठता येतो.

पैसा Tue, 12/20/2011 - 23:37
काय किल्ला आहे! बुलंद आणि बेलाग. लोहगड नावाला शोभणारा खणखणीत पोलादी गड! वल्ली, मस्त टिपलाय एकेक फोटो!

चिगो Fri, 12/23/2011 - 16:28
लोहगडाला भेट दिलीय, पण एवढे सुंदर फोटोज काढता आले नाही. तिथल्या एका कड्यावरचे (मला वाटतं, तानाजी कडा असावा) भणाणते वारे अजूनही आठवतात आणि जाणवतात.. सुर्ब पिक्स, वल्ली..