बबडू ची कविता !!
माझ्या ट्विन्स वर केलेली कविता !!
" माऊच्या कुशीत झोपलाय कोण
इटुकली पिटुकली पिल्ले दोन
मीच मीच डोळे तिरके कान
माऊ ची पिल्ले गोरी गोरी पान "
कुणी म्हणे माऊ कुणी म्हणे काऊ
आता आम्हाला सांगा इतके प्राणी कसे लक्षात ठेऊ
'बैलोबांची' गोष्ट आणि मग 'सिंहाचा ' किस्सा
इतके कसे 'कोल्हे' लबाड आणि तरीही त्यांचे लाड
भोलानाथ म्हणत म्हणत पाहतो आम्ही 'नंदीबैल'
आई बाबा आणतात नेहमीच बूट सैल
तबडक तबडक म्हणत बसतो जरा कुठे 'घोड्यावर '
मला 'गाढव' म्हणत दादू बसतो साइकलवर
इकडे तिकडे बघत बाबा म्हणतात " बोके कुठे गेले?"
आई म्हणते माझे दोन्ही 'वाघोबा' जरा फिरून आले
पोरे आमची 'गरीब गाय 'आज्या म्हणतात
'आमचे हे दोन शेर ' म्हणत आजोबाच गुरगुरतात
आमचे पुढचे डाव सगळ्यांना कसे काय ठाऊक असतात
बबडू बबडू म्हणत मग सगळे आमचेच लाड करतात !!
झक्कास. तुम्हाला जुळे आहे?
छान छान कविता
कविता
वाह
बडबळ गीत आवडलं.पहिल्या चार
अरेच्चा -
इट इज चो चो चो च्विट श्वीट !
वा...! मजा आली वाचुन...मस्त
हाहाहा! मस्तंय कविता! आई बाबा
वा वा जुळी मुले! क्युट कविता.
प्लीज
झकास जमलीय कविता
आवडली
लहान बाळांशी संबंधित आणि