Skip to main content

पुण्यातली प्रेक्षणीय-स्थळे ?

लेखक बन्याबापू यांनी सोमवार, 19/12/2011 23:58 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपा करानों ! काय सांगु यार..गेले चार-पाच वर्ष कुठेच फिरलो नाही.घर ते कॉलेज बाकी वेळच नाही मिळाला कुठे फिरायला.आता कॉलेज सुरू झाले तर कुठेतरी एकटेच फिरायला जायची हुक्की आली.म्हणुन लगेच पुण्यात भावाला ला कॉल करुन सांगितले " मी येणार आहे पुण्याला..आपण कुठेतरी मस्त फिरायला जाऊ ! भावाने लगेच 'हो' बोलला.तसे एका मैत्रिणीला ही भेटायचे आहे म्हणुन जात आहे.माझी फक्त एकच मैत्रीण आहे आणि तिला जर मी आता पुण्यात जाऊन नाही भेटलो तर पुन्हा कधी आयुष्यात भेटु नाही शकणार..कारण (आता सांगत नाही..जावू दे )..तर मित्राणो..मला सांगा ना 'पुण्यात प्रेक्षणीय स्थळे कोणती आहेत ? तिथे कसे जायचे ? जवळपास ठिकाणे च सांगा ? किल्ले बघायला..त्यांचा इतिहास जाणून घ्यायला मला खुप आवडते.तर,पुण्यात कोणते किल्ले आहेत जवळपास ? मी आता शनिवारी सकाळी पुण्यात येईन.माझ्या सगळ्यात चांगल्या मैत्रिणीला भेटेन..खुप बोलणार आहे तीचाशी..कारण ती मला पुन्हा कधीच भेटणार नाहीये.मला तुम्ही मदत करा..मला जे २ दिवस मिळाले आहेत खुप मस्ती करायची आहे..खुप फिरायचे आहे..माझ्या गोड मैत्रिणीला पण मनभरून पाहीन ..खुप बोलेन..खुप आनंद देईन तिला.मी गेले ३ वर्षापासून मिपा चा नियमित वाचक आहे.आज जे मनात आले ते लिहिले..काहीच वाटत नाहीये..असे वाटत आहे "घरातल्यानाच विचारत आहे मी " .आणि हो मित्राणो..मी जरी बाहेर फिरत नसलो तरी मिपा वर खुप काही चांगले बघायला..वाचायला..अनुभव..संस्कार मिळत आहे मला..मी खुप मनापासुन आभार मानतो तुम्हासर्वांचे ! तुम्ही सगळे 'मिपा' कर खरेच खुप चांगले आहात..गोड आहात.

वाचने 32986
प्रतिक्रिया 153

प्रतिक्रिया

In reply to by टवाळ कार्टा

कशाला असले नाही ते प्रश्न विचारुन एखाद्या गुणी पोराच्या स्वप्नांचा चक्काचूर करायला निघाला आहेस? पुणे भेटीत काय तो सोक्षमोक्ष लागेलच की. ;)

पुणे भेटीत काय तो सोक्षमोक्ष लागेलच की. >>. म्हणजे आता ' प्रेमभंगाच्या ' कथा एकाव्या लागणार आहेत असे म्हणावयाचे आहे काय ??

अभिनंदन बन्या बापू........................ शतकी धागा.................... बाजार उठवून.............

In reply to by टवाळ कार्टा

सखाराम गटणे.....??? टवाळ कार्टा'बरोबर अधिकांश सहमत व्हावेसे वाट्टे... कारण बन्या'च्या एकन्दरीत 'लक्षणां'वरुन तो सखाराम गटणे असल्याचा आभास होतोये... ;) आज टार्याची खूप आठवण येत आहे....... :)

आणी अशा प्रकारे सर्व मिपाकरान्नी कोण मुम्बैकर आणी कोण पुणेकर हे सिदध केले आहे. समाप्त. (आता चर्चा सम्पेल अशी आशा आहे.)

In reply to by स्वातीविशु

आणी अशा प्रकारे सर्व मिपाकरान्नी कोण मुम्बैकर आणी कोण पुणेकर हे सिदध केले आहे. ... व्हय व्हय,ह्ये समदं खरं हाय..पन जाल्ह काय म्हैतिये का..? त्यांनी हे ना,यक कनीस भाजायला आख्खी गंजी प्येटिवली हो...मंग काय हो बाकिच्यांनी बी घ्येतली आपली कनसं भाजुन... ;-)

कादाचीत मैत्रिण तुमची किंवा तुम्ही मैत्रिणीची 'बिसलरी बॉटल' करण्याची तयारी ठेवलेली असावी.
ह्या वाक्यावर खपल्या गेलो आहे....!!! पुण्याच्या प्रेक्षणीय स्थळांबद्दल माहित नाही... पण ह्या पुढे बिसलरी बॉटल घेताना नक्की हा धागा आठवेल ;) :) :)

@अत्रुप्त आत्मा : त्ये कनसाचे झाले हो..(भाजून), पण हापिसात हसून हसून पुरेवाट लावलिया की सा-यानी, आन त्यामुळे तोन्ड कुठे लपवावे न कुठे नाय आमी, हे बि लिवा म्हन्जे बेस होइल... बाकी आम्चि ह्या धाग्यासाठी ह्या वर्साचा बेस धागा म्हनुन यक बिस्लेरी बाट्ली सन्मान म्हनुन दयायची तयारी हाय बा. (एव्हडे वोट फुक्कट जावु देनार न्हाय...धाग्याला आलेले)

In reply to by स्वातीविशु

त्यामुळे तोन्ड कुठे लपवावे न कुठे नाय आमी, हे बि लिवा म्हन्जे बेस होइल. :bigsmile: हे करुन पहा---(हापिसात उपलब्ध जागेनुसार) डोळे मिटुन घेतले की तोंड लपवल्याची भावना अपोआप तयार होते :-D

In reply to by स्वातीविशु

१. आपल्याच दातांमध्ये हाताची दोन बोटे रुतवुन ठेवावीत म्हंजे काहीच होणार नाही..... २. खुर्चीवर थोडे सांभाळुन बसावे....

तुमचा धागा दिडशतक पुर्ण करून व्दिशतकाकडे वाटचाल करू लागला आहे. उत्तरोत्तर असेच सल्ले तुम्हाला मिळत राहोत आणि तुमची प्रगती होत राहो अश्या शुभेच्छा.