Skip to main content

अद्दल

लेखक केशवसुमार यांनी शनिवार, 19/07/2008 02:43 या दिवशी प्रकाशित केले.

(मिपा वर हल्ली विडंबनकारांची मुख्य तक्रार म्हणजे सुमार कच्च्या मालाचा होणारा भडीमार. प्रतिसाद थोडे कविता फार, अशी गत आहे. ज्याला त्याला वाटत असतं आपल्या कवितेचे विडंबन व्हावे. आता तर अष्टप्रधान मंडळात दोन प्रधान विडंबनकार आहेत. मग त्यांना तुम्हा सर्वसधारण सदस्यांना नाराज कसे कसे चालेल ? नवा ताजा दर्जेदार कच्चा माल मिळायला वेळ लागेल. तोवर सर्किटशेठने पुरवलेला त्यांच्या अनुदिनीवर पूर्वप्रकाशित कच्चा माल वापराला आहे तोच चालवून घ्यावा ही विनंती .)

परवाची गोष्ट.
हात लागला चुकून तिच्या पार्श्व भागाला
म्हणून हळहळत केला नमस्कार वाकून
तर तिच्या वाहणांचे तळ चाटणारे
जमले तीने ठेवलेले ते खविस.
नव्वद लाथा पडल्या होत्या तिच्या कृपेमुळे,
विसरून कसं चालेल मला?

काल वर्तमानपत्रावर दोन विटा
टाकून बसवलं पिलावळीला
पोलिसांनी छापलेला आमचा
त्यात फोटो होता आलेला,
सुचलं कसं हे तिला.
ती सुखावली असेल.

आता तिला अद्दल घडवतो
जंगी कविता लिहितो,
मिपावरच्या त्या इतिहासकाराला,
व्यक्तिगत निरोप येतो धाडून ,
सव्वा आठ गुणांच्या प्रतिसादासाठी.

खूष?

लेखनविषय:

वाचने 4246
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

खो खो खो!!!!!!

व्यक्तिगत निरोप येतो धाडून ,
सव्वा आठ गुणांच्या प्रतिसादासाठी.

अतिशीघ्र प्रतिभेला सलाम!!

-कोलू


In reply to by कोलबेर

>>व्यक्तिगत निरोप येतो धाडून ,
>>सव्वा आठ गुणांच्या प्रतिसादासाठी.

>>अतिशीघ्र प्रतिभेला सलाम!!

असेच म्हणतो!

अवांतर - विडंबनाला तब्बल '६' मिनिटे घेतली! केसुशेठ, आजकाल बार्शीलाईटची 'डेक्कन क्वीन' झालीये वाटतं

ह. घ्या.


आता आम्हाला आमचा मुक्तछंद फ्याक्टर बासनात गुंडाळून ठेवावा लागणार.

एकूण (यू गेस्ड इट) = सव्वा आठ गुण !!!

- सर्किट


सडेतोड

तर तिच्या वाहणांचे तळ चाटणारे
जमले तीने ठेवलेले ते खविस.

हे भारी आवडलं. :) असे असते आमचे नशीब !:(


केसु !
आमची हपिसातून हकालपट्टी होणार हो तुमच्यामुळे ! वाचत होतो नि खुळाचारासारखा हसत की हो सुटलो ! काय काव्यप्रतिभा आहे का काय मॉन्स्टर आहे !
दे धमाल !


खल्लास!

पोलिसांनी छापलेला आमचा
त्यात फोटो होता आलेला,
सुचलं कसं हे तिला.
ती सुखावली असेल.

हे लै भारी....!

तात्या.


:)) :)) :)) :))
सलाम.. तुमच्यातल्या विडंबनकाराला सलाम!

-('मिसळ'लेला) ऋषिकेश


छापलेला फोटो,व्यक्तिगत निरोप,सव्वा आठ गुण...समदंच लय भारी!
स्वाती


प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार..
(आभारी)केशवसुमार