अंबेजोगाई जिल्हा देशी दारु विक्रेता संमेलन - घोषवाक्य व प्रतिकचिन्हांची स्पर्धा
२०१३च्या अंबेजोगाई येथे होनार्या अंजोजिदेदाविसं (अंबेजोगाई जिल्हा देशी दारु विक्रेता संघ) अधिवेशनाच्या संयोजक समितीने घोषवाक्य आणि प्रतीकचिन्हाची स्पर्धा आयोजित केलेली आहे. विजेत्या स्पर्धकाला २०१३ -२०१४ या शैषणिक, स्वारी, शिक्शनिक, दिल्या मायघाल्या ह्ये ली रे येवडं... शैक्शणिक, हां.. वर्षात अंबेजोगाई जिल्ह्यातील कोणत्याही देशी दारुच्या दुकानात आपल्या आवडीच्या ब्रॅन्डची दररोज एक क्वाट्टर (याला काही लोक चुकीने 'क्वार्टर' असेही म्हणतात) विनामूल्य दिली जाईल. तसेच नंतरने सदर विजेत्या स्पर्धकाचे अंबेजोगाई जिल्ह्यातील प्रचंड खपाच्या लोकप्रिय तरुननेते (अंबेजोगाई जिल्ह्याचा गरजता छावा, 'डरकाळी' पुस्कराचा विजेता) दीपकाण्णा वंजाळे पाटील भोसले संपादित 'आसूड' या वर्तमानपत्रातील 'पुन्यस्मरण' या सदरात छायाचित्र प्रकाशित केले जाईल. ही स्पर्धा २१ वर्षांवरील सर्व मराठी/ अमराठी व्यभि.. ये येड्या, कायबी ल्हितो का? आं? काडू का तुजं आडिट? परमिटधारी व्यक्तींसाठी खुली आहे. ह्या स्पर्धेत भाग घेण्यास उत्सुक आणि इच्छुक असलेल्यांनी आपापला ह्यांगओव्हर उतरल्यावर आपले घोषवाक्य आणि/ अथवा प्रतीकचिन्ह, ३१ डिसेंबर २०११ पर्यंत मा. बुद्धभूषण वंजारी कडूपाटील , मा. सचिव, धम्मक्रांती युवा ग्रूप ( डिजिटल फ्लेक्स, डीजे व डॉल्बी स्पेशालिस्ट, संस्थापक 'ढिकच्यांग' संघटना, अंबेजोगाई) यांना rada@radamail.com या इमेलवर पाठवावे. रात्री धाच्या आत पाटवा. आपुन थर्टीफस्टला टुंग आस्तो. फेब्रुवारी २९, २०१२ ला विजेत्या स्पर्धकाचे नाव जाहीर केले जाईल.
या दोन पुर्नपने वेगवेगळ्या स्पर्धा आहेत. एका व्यक्तीला दोन्हीतही भाग घेता येईल.
या स्पर्धेचे नियम असे आहेत:
१. सुचविलेले घोषवाक्य/ प्रतीकचिन्ह 'खळ्ळ-खटाक उर्फ बघतोस काय, मुजरा कर!' या विषयाशी संबंधित असावे. नस्ल्यास स्प्र्दकाकडे बगून घेन्यात येईल.
२. विजेत्या घोषवाक्यास व प्रतीकचिन्हास प्रत्येकी एक 'नाद खुळा केसर उंड्रीकर उल्लाला फेम नाईट' च्या कार्यक्रमाचे तिकीट विनामूल्य दिले जाईल. दादांचं सामान हाये, नुस्तं बगायचं, सांगून ठ्येवतो. हां!
३. एकाच प्रकारच्या, एक सारख्या २ अथवा अधिक आलेल्या सुचनांचा "lottery" स्वरूपाने निर्णय होईल. या लॉटरीचे सर्व अधिकार मा. संग्रामसिंहदादा नेवरेपाटील ('डॉन'), 'भगवी ज्योत' क्रांतिकारी ग्रूप, नवी वसाहत, अंबेजोगाई यांच्या स्वाधीन राहातील.
४. अंतिम निर्णय कार्यकारी अंजोजिदेदाविसं घेईल. या निर्णयावर कोणतीही चर्चा होणार नाही. या निर्णयावर आबजेक्षण असणार्यांचा भगवीज्योत पद्धतीने समाचार घेन्यात येईल.
५. सादर केलेली प्रवेशिका ही पुर्नपने स्वतःची असावी व कुठल्याही व्यक्तिगत अथवा उद्योगाच्या प्रताधिकाराचे उल्लंघन केलेले नसावे. तसे केलेले असल्यास आनि त्यातून कोन्तेही कोर्ट म्याटर झाल्यास पार्टीला ज्याने त्याने नडावे. आसल्या शिंपल म्याटरसाठी दादांना हेडेक देऊ नये.
६. एका स्पर्धकाला, एका स्पर्धेसाठी जास्तीत जास्त ३ प्रवेशिका पाठवता येतील. तीन म्हनजे एक आनि एक आनि एक. हे न कळल्यास संघाच्या कार्यालयाशी संद्याकाळी साहाच्या आत समप्र्क, समपरक...मायला ह्याज्या, संपर्क, आश्शी!.. साधावा.
७. एकदा प्रवेशिका पाठवल्यावर, निकाल जाहीर होईपर्यंत स्पर्धकाने आपली प्रवेशिका कुठल्याही माध्यमात प्रसिद्ध करू नये. तसे केल्यास त्याचा भगवीज्योत पद्धतीने समाचार घेन्यात येईल.
८. विजेत्या घोषवाक्याचे आणि प्रतीकचिन्हाचे सर्व मालकीहक्क अंजोजिदेदाविसं राहतील. ह्याबात कोनताही वाद घालू नये. वाद घातल्यास त्याचा भगवीज्योत पद्धतीने समाचार घेन्यात येईल.
काही कारणास्तव या तारखेत बदल झाल्यास आमचे आमी बगून घ्यु .
--------------------------------------------------------------------------------------------
अधिक माहितीसाठी येथे पाहावे - जय महाराष्ट्र, जय भीम, जय अंबेजोगाई, जय अंजोजिदेदाविसं , दीपकाण्णा वंजाळे पाटील भोसले झिंदाबाद!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
हा हा... हि घ्या माझी
खतरा! ही स्पर्धा सगळ्यांसाठी
कडक!
__/\__
जबरदस्त. हसुन हसुन पोटदुखले.
हाहाहा = =)) रावसाहेब एकदम
जबरा, ऑममवेस. नमस्कार
खळ्ळ खट्याक एकदम!
:)
लईच
_/\_
+१
:)
तुमची प्रतिभा व निरिक्षण अफाट
वेगळे
तत्वतः सहमत, पण
+१ २ श्रामो.
-१
खत्री
खतरनाक!
या लेखनात वापरलेल्या भाषेला
एक दुर्लक्षित गाव म्हणून
=)) =))
हा हा हा मस्त
हाण तिच्या....
*** लई भारी साहेब
क ड क
हाहाहा ... आम्चीबी येंट्री !
या निर्णयावर आबजेक्षण
विडंबन बरे होते.
ही तुमची संघी प्रतिक्रिया काय
मग काय अभिव्यक्ती
........
..आणि उगं कारण नसताना खोडी
तुमच्याशी कोणी बोलतय
दादांनी लाव्लि वाट्त !!!
मागासलेले ग्रामिण असे काही
विडंबन म्हणून देखील ..
च्यायला,
पण जिल्हा झालाच कुठे आजुन :(