ऐल-पैल
ऐल मळा पैल तळे
जायचे कुठे ना कळे
टाकता पाऊल वळे
पुन्हा माघारी
ऐल दिवा पैल वात
भेट नाही आयुष्यात
मिट्ट काळोख घरात
अवस दारी
ऐल गंध पैल जाई
मधे गूढ खोल खाई
आक्रोश घुमत जाई
कडेकपारी
ऐल चंद्र पैल निशा
घेरतात सुन्न दिशा
घुमतात वेड्यापिशा
स्वप्नांच्या घारी
ऐल प्राण पैल सखा
जीव भेटीला पारखा
खुपतो काट्यासारखा
सल जिव्हारी
ऐलपैलाच्याही पार
तुझ्या महालाचे दार
त्याच्या पायरीशी थार
दे रे मुरारी
सुमन कल्याणपूर गात आहेत असं
अतिशय सुंदर!!
सुंदर...
__/\__
क्रान्तितै,
अतिशय सुरेख - नादमधुर कविता
क्रांती काय सुरेख लिहिले आहेस
ऐलपैलाच्याही पार तुझ्या
साधं सहज सुंदर...
वा वा वा!!
छानच काव्य
अप्रतिम!!! शब्दच नाहीयेत
वाचुन मन पूर्ण सुखावलेलं आहे.
उत्तम
अतिशय उत्कृष्ट रचना, फार फार
कल्पना आवडल्या
सुंदर
मस्त रचना.
छान
द्वंद्वांच्या पल्याड जाऊन
धन्यवाद!
क्ला स!! अतिशय सुरेख.
सुंदर!
सुंदर रचना......