(ऐल-पैल)
प्रेषक, चतुरंग, Thu, 15/12/2011 - 21:12
प्रतिथयश कवयित्री क्रांतीतैंचं अप्रतिम काव्य 'ऐल-पैल' वाचलं आणि मी सैरभैर झालो! मग काय आपोआप दाद निघालीच मनातून! ईर्शाद!!
ऐल मळे पैल खळे
भेटू मी कुठे, ना कळे
टाकता पाऊल वळे
बापूस माघारी!
ऐल दिवा पैल वात
भेट नाही पंध्रवड्यात
आहे काळोख घरात
खवीस दारी!
ऐल साद पैल जाई
चिंच फोक चोप देई
ओरडा घुमत जाई
भर बाजारी!
ऐल 'चंद्रा' पैल 'निशा'
अभिलाषा दशदिशा
धुमसतात वेड्यापिशा
पेटल्या सिगारी!
ऐल जान पैल सखी
बाप 'गाजरपारखी'
दमदाटी हो सारखी
'वळ' 'माघारी'!
ऐलपैलाच्याही पार
तुझ्या परसाचे दार
त्याच्या पायरीशी प्यार
दे गं दुपारी!
-चतुरंग
काव्यरस:
लेखनविषय::
प्रतिक्रिया
_/\_ ऐलपैलाच्याही पार तुझ्या
_/\_
मनीच्या बाता : गण्या घरचा अहेर सध्या लांब आहे म्हणे म्हणुन रंगाशेठ मोकाट सुटले असतील का रे.
~*~*~*~*~*~*~*~*~*~*
-माझं लेखन / माझी खादाडी
मिपाच्या स्मायली
+१
अगदी अगदी
गणपाशेठ,
त्या मनीच्या बातांशी +१००
बाकी
या ऐवजी
ऐल 'रंगा' पैल 'सखी'
छबी दृष्टीला पारखी
तगमग हो सारखी
हृद्-व्यथा दुखरी!
हे चपखल बसतंय का?
इत्यलम्
:davie: प्रास :davie:
लेखन मुसाफिरी
सांगीतिक आवड
आहे, (अधून मधून का होईना)
आहे, (अधून मधून का होईना) लक्ष आहे.
शपथ मानल तुम्हाला इतक्या कमी
शपथ मानल तुम्हाला
इतक्या कमी वेळेत भन्नाट विडंबन _/\_
पुरी जाईचिया फुल फाकणे| त्याचि नाम जैसे सुकणे|
तैसे कर्मनिषे न करणे| केले जिद्दी|
रंगा इज ब्यॅक!!
रंगा इज ब्यॅक!!
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/
झॉकॉश!
'वळ माघारी' मस्त आणि शेवटचं कडवं भन्नाट!
ऐल 'चंद्रा' पैल
ऐल 'चंद्रा' पैल 'निशा'
?
अभिलाषा दशदिशा
धुमसतात वेड्यापिशा
पेटल्या सिगारी!...___/\___ या नंतर मनातल्या मनात 'पनवेल'\'पन-वेल' अश्या अरोळ्या का उठल्या कुणासठाऊक...
०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०===०
अत्रुप्ती हा जीवनाचा मूलाधार आहे.
स्पीचलेस __/\__
स्पीचलेस
__/\__
...................................
स्वबळ उणे पाहता जालीय बाळ फार गडबडला ।
स्त्रीडूआयडी घेउनि बालिश बहु खरडींतून बडबडला॥
आजचा सुविचारः मिपावर एकाच सदस्याने रोज लेखांचे रतीब घालणं हे त्याच्याकडे भरपूर वेळ असल्याचं लक्षण आहे!
खी: खी: खी:
फस्क्लास विडंबन!
फारच 'ज्वलंत' समस्या आहे ब्वॉ
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
_/\_
हा हा हा ... जबरा !!!
____________________________________________________
I couldn't wait for success, so I went ahead without it !!!!
माझा ब्लॉग - मन उधाण वार्याचे…
हाहाहा जबर्या आहे...
हाहाहा जबर्या आहे...
http://preetamohar.blogspot.com/
विडंबन म्हणून सरसच... (कविता वेगळी नी हे विडंबन वेगळं)
>>>ऐलपैलाच्याही पार
तुझ्या परसाचे दार
त्याच्या पायरीशी प्यार
दे गं दुपारी!
च्यायला, ही म्हण जे किमान पक्षी 'त्रेधातिरपीट' आहे म्हणा की.
चंद्रा, निशा नी 'तू ' म्हणजे अवघडच परकरन हाय म्हना की...
चतुर-रंगा अशी फोड आहे काय चतुरंगची?
________________________________
सत्यं ब्रूयात हितं ब्रूयात!
धन्य!!!!!!!
प्रचंड आवडलेलं विडंबन!
गाजरपारखी अफाट! 
अशी दाद मिळायला नशीब लागतं!
क्रांति
औट घटकेचे, तरी हे राज्य माझे
अन्यथा असणेच आहे त्याज्य माझे
अग्निसखा
![]()
क ड क!! त्या क्रांतीतै धन्य
क ड क!!
त्या क्रांतीतै धन्य अन् तुम्ही त्याहून धन्य!!
तुम्हा दोघांनाही त्रिवार दंडवत! _/\_ _/\_ _/\_
राघव
खोखोखो
ऐल जान पैल सखी
बाप 'गाजरपारखी'
दमदाटी हो सारखी
'वळ' 'माघारी'!
-चतुरंग, आपल्या शब्दखेळाचा तुरंग चौखूर उधळला आहे. मनापासून हसलो.
लै भारी - 'वळ' 'माघारी'....
भले....
भले....
-----------------स्वाक्षरी सुरु--------------
छिद्रेष्वनर्था: बहुलीभवन्ति..
-----------------स्वाक्षरी समाप्त--------------
उगाच मूळ मजकुरात स्वाक्षरी मिसळून अनर्थ नको..
मस्तच.
विडंबन मस्तच आहे.
ऐलपैलाच्याही पार
तुझ्या परसाचे दार
त्याच्या पायरीशी प्यार
दे गं दुपारी!
या ओळीतर खासच वाटल्या.
बाकी, प्रकाटाआ.
-दिलीप बिरुटे
छान विडंबन. त्यात अत्रुप्त
छान विडंबन. त्यात अत्रुप्त आत्मा यांनी दिलेलं कडवं सुद्धा अगदी चपखल बसतय.
लय भारी!
लय भारी!
मस्तच
ह्या रंगाचा रंगच न्यारा आहे राव
सुंदर!
झक्कास विडंबन. भावना पुण्याला पोचली.
o ज्योति कामत o
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आधीं होती दासी । पट्टराणी केलें तिसी ॥
तिचें हिंडणें राहिना । मूळ स्वभाव जाईना ॥