प्राचीन भारतः पाताळेश्वर लेणी
पाताळेश्वर-पुण्यात भर गर्दीतल्या जंगली महाराज रोडवर असलेला हा कातळकोरीव ठेवा फारश्या कुणाच्या खिजगणीत नसलेला. हा वसलेला आहे जंगली महाराज मंदिराच्या अगदी शेजारीच.
पाताळेश्वराला याधीही भरपूर वेळा चकरा झालेल्या होत्या पण यावेळी काही मिपाकरांना बरोबर घेऊन जायचे ठरले, खरडाखरडी, फोनाफोनी झाल्यावर धनाजीराव वाकडे, अत्रुप्त आत्मा, ५० फक्त आणि त्यांचे एक स्नेही श्री. सुहास फडके हे ठरलेल्या वेळेवर बरोबर ४.३० वाजता जंगली महाराज रोडवर पोचते झाले. प्रवेशद्वारापाशीच व्यालप्रतिमा आणि कळसाचे काही अवशेष ठेवलेले आहेत. पुरातत्व खात्याने एक छोटीशी बागच त्याठिकाणी निर्माण केली आहे.
बागेतून थोड्याफार पायर्या उतरून आपला प्रवेश होतो ते थेट लेण्यांच्या प्रांगणात. आजूबाजूचा सर्व एकसंध कातळ छिनून हा लेणीमंदीराचा विशाल देखावा इथे निर्माण केला गेला आहे. पायर्या उतरताच डावीकडे एक नंदीची जीर्णावस्थेतील एक प्रतिमा ठेवलेली आहे. त्यानंतर लागतो तो गोलाकार खोदलेला नंदीमंडप. १२ स्तंभांनी फेर धरलेल्या या नंदीमंडपात आतमध्ये अजून चार स्तंभ आहेत व त्यामध्ये विराजमान आहे महादेवाचे वाहन नंदी. गळ्यातल्या माळा. माळांमध्ये गुंफलेल्या घंटा हे सर्वच अगदी खुबीने कोरलेले आहे.
१. अखंड कातळात कोरलेली लेणी व नंदीमंडप
२. नंदीमंडप
२. नंदी
४. नंदीचे जवळून दर्शन
५. नंदीमंडप
नंदीमंडप पाहून पुढे जाताच डावीकडे खडकात एक ओसरी खोदलेली दिसते. मध्ये दोन स्तंभ, आतमध्ये खोली आणि शेजारीच पाण्याचे टाके अशी याची रचना. हे पाहून येतो आपण ते मुख्य प्रवेशद्वारापाशी. तिथेच उजव्या बाजूला देवनागरीतील एक अस्पष्टचा शिलालेख दिसतो. श्री मारूती प्रसन्न, यादव असे काही शब्द ओळखू येतात त्यावरून हा शिलालेख यादवकालीन असावा हे स्पष्टच होते. पण ही लेणी खोदली गेली आहेत ती राष्ट्रकूट कालखंडात. इ.स. सातव्या ते आठव्या शतकात. यादवकाळात ही लेण्यांची कला लुप्तच झाली होती. ही लेणी आहेत ब्राह्मणी शैलीची. बौद्ध आणि ब्राह्मणी शैलीतील सर्वात मोठा फरक म्हणजे त्यांची रचना. बौद्धलेण्यांत विहार व चैत्य दिसतात तर ब्राह्मणी शैलीतील लेण्यांत सभामंडप व गर्भगृह. येथे विहार अजिबात दिसत नाहीत कारण विहार हे भिक्खू संघाच्या निवासासाठी असत व ही शैवलेणी म्हणजे निव्वळ प्रार्थनामंदिरे.
५. डावीकडच्या कोपर्यात असलेली ओसरी.
६. देवनागरी लिपीतला शिलालेख
लेण्यांमध्ये प्रवेश करायच्या आधी ५० फक्त यांनी त्यांची पोतडी उघडली व तिथून बाहेर काढले ते नागपूरचे प्रसिद्ध संत्रारसगुल्ले. संत्रा स्वादाच्या रसगुल्ल्यामध्ये आत अस्सल संत्रे असा हा जबरदस्त स्वादिष्ट प्रकार. सोबतीला केक, त्यामुळे आधी पोटोबा मग विठोबा हा कार्यक्रम लगेच उरकून घेतला गेला.
आता आम्ही लेण्यांमधे शिरलो. सभामंडप, तीन गर्भगृहे व बाजूने प्रदक्षिणामार्ग अशी याची रचना. सभामंडप तर अतिशय प्रेक्षणीय. भव्य अशा १०/१० स्तंभांच्या तीन ओळींवर याचे छत तोललेले आहे. लेण्यांच्या दोन्ही बाजूंना काही अर्धवट देखावे कोरलेले दिसतात तर काही भग्न देखावे दिसतात. डावीकडच्या एका कोपर्यात राक्षसवधासारखा कुठलातरी देखावा कोरलेला दिसतो. आता आम्ही गर्भगृहांमध्ये शिरलो. इथेही गर्भगृहाच्या बाहेर नंदीची मूर्ती कोरलेली आहेच. आत गर्भगृहामध्ये महादेवाची सुबक अशी पिंड कोरलेली आहे, तोच हा पाताळेश्वर. जमिनीच्या खालच्या पातळीत-पाताळात कोरलेला. पाताळेश्वर नाव अगदी यथार्थ योजिले आहे. डावीकडच्या गर्भगृहात गणपती व उजवीकडच्या गर्भगृहात पार्वतीची मूर्ती कोरलेली आहे. दरवाजांरील नक्षीकाम सुरेखच आहे. प्रदक्षिणामार्गात राम, सीता आणि लक्ष्मणाच्या हल्लीच कोरलेल्या संगमरवरी मूर्ती स्थापन केलेल्या आहेत. प्रदक्षिणामार्गात पाठीमागच्या उजव्या कोपर्यात अर्धवट खोदलेला खडक दिसतो. हे लेणे का अर्धवट राहिले हे काही कळत नाही कदाचित धनाची कमतरता हेच कारण असावे.
७. सभामंडपातील स्तंभांची अतिशय सुरेख रचना
८. सभामंडपातील स्तंभांची अतिशय सुरेख रचना व भिंतीतील अर्धवट देखावा
९. राक्षसवधासारखे कसलेसे कोरीव काम
१०. पाताळेश्वर महादेव
११. पाताळेश्वर महादेव
१२. गणपती व पार्वतीच्या मूर्ती

१३. अर्धवट खोदलेला दगड
पाताळेश्वराचे दर्शन घेउन बाहेर आलो व मिपाकरांच्या गप्पांना एकदम बहार आला. विविध विषयांवर मनसोक्त गप्पा मारण्यात आल्या. गप्पा मारता मारता अंधार कधी होत गेला ते कळलेच नाही, अचानक वरच्या कड्यावर दोन जळते डोळे दिसले आणि स्पाच्या ग्रहणातल्या मांजराची आठवण झाली. पण इथे मात्र मांजर नव्हते.
१४. जळते डोळे
मिपाकरांचा कुठलाही कट्टा खादाडीशिवाय संपन्न होतच नाही. यावेळची खादाडी झाली ती बालगंधर्व रंगमंदिराशेजारील गंधर्व हॉटेलात. खादाडीच्या कट्ट्याला मनोबा यांच्या रूपाने अजून एका मिपाकराची भर पडली व गप्पा अधिकाधिक रंगतच गेल्या. मध्येच सोकाजीरांवाचा कट्ट्याला शुभेच्छा देण्यासाठी व येऊ न शकल्याबद्दल खंत व्यक्त करण्यासाठी फोन येऊन गेला. मनसोक्त जेवण झाल्यावर तिथे जवळच नॅचरल्सचे स्ट्रॉबेरी, मलई, चिकू, फणस अशा विविध स्वादांची आईस्क्रीम्स चापल्या गेली व एका मिपाकट्ट्याची सुरेख सांगता झाली.
घरी पोहोचलो ते ९.३० वाजेपर्यंत. चंद्रग्रहण सुटतच आले होते. गच्चीवर जाउन हा खगोलाविष्कार डोळे भरून पाहिला मग रात्री 'द प्रीस्ट' हा टुकार चित्रपट बघून निद्राधीन झालो.
१५. चंद्रग्रहण

वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
लेखनप्रकार (Writing Type)
प्रतिक्रिया
मस्त आहेत लेणी.... एकदम भर
धनाजीरावांच्या ख.व.त उचकपाचक
पुण्यात असताना निरुद्देश्य
झ्याक लिवलाय हो वृत्तांत....
मस्त!
पुण्यातल्या अतिशय वर्दळीच्या
वल्ली'जी ....सुन्दर माहिती
अल्पसा असहमत
बकासुर वधाच्या ठिकाणाबाबत
या वरुन बकासुर किमान तीन
अरे तीन तीन बकासुर म्हणजे
वल्ली'जी... पाताळेश्वर लेणी
पण
रामायण आणि महाभारत हे खरेच
बाकी
काय रे, आता तु पण सुरूवात
वल्ली - मस्त रे
मस्त
???
पाता़
पहिला फोटो कुठल्यातरी
मस्त रे वल्ली... अतिशय सुरेख
प्यारे१
विचार तर एकदम 'नेक' आहे....
ऐला.. पुण्याच्या मधोमध अशी
खरचं पाताळेश्वर एक अदभुत जागा
वल्ल्ली लेख व
झकास...
अरे!!
नेहमी प्रमाणेच सुंदर फोटु आणि
चार फोटो माझ्याकडुन, मला तर
पन्नासराव, फोटो नि त्यावरील
अप्रतिम लेणी
-
मस्त
हा ड्यांबिसपणा आहे. हल्कटपणा आहे.
येस धिस इज हलकटपणा, तुम्ही
मस्त फोटो आहेत. इकडे बसून
गेल्या आठवड्यात जाऊन आले
फाशांचा खेळाचा पट बर्याच
ओह !
प्राचीन पुण्याची सफर आणि
पहिला फोटो बहुधा शंकराचा