Skip to main content

झाड

Published on बुधवार, 14/12/2011
झाड
आजकाल कुणी सावलीत येत नाही सावली देण्याइतकीही राहीली नाही ||धृ|| गेली कित्येक उन्हाळे सावली देत आहे उभा; कोरडे ठेवीले वाटसरूंस पावसाळ्यात सुध्दा; हिवाळ्यात केवळ निष्पर्ण होउन जाई सावली देण्याइतकीही राहीली नाही ||१|| खोड जुन वाढले फांद्या जुन्या झाल्या; त्या मुळी न मातीत नव्याने रूजल्या; नवी पाने फुलूनी धुमारे येणार नाही सावली देण्याइतकीही राहीली नाही ||२|| कधी गळते दुजे पान पहिल्यासारखे; मातीत मिळूनी होते ते मातीसारखे; त्या पानांसारखे माझेही पान होई सावली देण्याइतकीही राहीली नाही ||३|| - पाषाणभेद
लेखनविषय:

वाचन संख्या 1118
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

कधी गळते दुजे पान पहिल्यासारखे; मातीत मिळूनी होते ते मातीसारखे; त्या पानांसारखे माझेही पान होई सावली देण्याइतकीही राहीली नाही
काहिसे गुढ पण सुरेख!!

काव्यरचना छान आहे पाभे