साहित्यः
१ वाटी सुकट (सुकी-करंदी) डोके काढून, पाण्यात १० मिनिटे भिजवून ठेवावी. (खारटपणा कमी होईल)
भिजवून ठेवलेली सुकट पाणी निथळून, हाताने दाबून किचन /पेपर टॉवेल वर पसरवावी.
२ मोठे कांदे बारीक चिरून.
१ टोमॅटो बारीक चिरून किंवा ३-४ आमसुले किंवा १ टेस्पून चिंचेचा कोळ.
दीड टेस्पून आले+लसुण+ हिरवी मिरची पेस्ट
१ टीस्पून हळद
२-३ टीस्पून लाल-तिखट (आपल्या आवडीप्रमाणे कमी-जास्त)
१-१/२ टीस्पून धणेपूड
१-१/२ टीस्पून गरम-मसाला
मीठ चवीप्रमाणे
सजावटीसाठी बारीक चिरलेली कोथंबीर
तेल
पाकृ:
प्रथम एका कढईत तेल गरम करून त्यात बारीक चिरलेला कांदा घालणे. मीठ घालून कांद्याला गुलाबी रंग येईपर्यंत परतणे.
त्यात आले+लसुण+ हिरवी मिरची पेस्ट घालून त्यांचा कच्चा वास जाईपर्यंत चांगले परतणे.
आता त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालणे व तो मऊसर शिजेपर्यंत परतणे.
त्यात हळद, लाल-तिखट, धणेपूड व गरम-मसाला घालून सर्व एकत्र करावे.
त्यात सुकट घालावी आणी सगळं एकत्र करावे. मध्यम आचेवर झाकून शिजवावी.
तयार झाली की त्यावर कोथंबीर घालून गरमा-गरम तांदळाच्या किंवा कुठल्याही भाकरीबरोबर खायला सुरुवात करावी :)
असेच सुके बोंबील, सुका जवळा घालून बनवता येतं.
वाचने
11904
प्रतिक्रिया
17
मिसळपाव
प्रतिक्रिया
झकास..
स्स्स्स्स्स......!
मस्त
In reply to स्स्स्स्स्स......! by प्रभाकर पेठकर
मस्त!
@ पि.डा पटणीची भाकरी, काय
In reply to मस्त! by पिवळा डांबिस
मला वाटतं...
In reply to @ पि.डा पटणीची भाकरी, काय by पियुशा
कधीतरी माझ्या घरी ये.. पटणीची
In reply to @ पि.डा पटणीची भाकरी, काय by पियुशा
तु काय पटणी सॉफ्टवेअर
In reply to कधीतरी माझ्या घरी ये.. पटणीची by पिंगू
ही पाकृ बघून ५० फक्त यांना
तामिळ मध्ये याल एरा म्हणतात !!
+१ टु वल्ली, बाकी मांसाहार
मस्त
सगळ्यांनी काय मार्गशीर्षात ठेका घेतलाय काय ?
(No subject)
सानिकाजी नेहमी प्रामाणे अप्रतीम सादरीकरण
मस्त फोटो!
ये बात हे,,,