Skip to main content

खुणा

लेखक अज्ञातकुल यांनी बुधवार, 07/12/2011 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
विझल्यात खुणाही सरल्या गाथा उरले गीत व्रणांचे आकाशी तुटल्या तार्‍यांचे खेद कुणाला आता स्वेद ओघळे भाळावरती पाउल पुढचे पडता आग निवळण्याआधी भडके परतुन जाता जाता भंगुरतेचे स्वप्न अनोखे रेखिव घडले लेणे अभंग त्याचे गुणगुणतांना शिरी वाहिले मेणे गोत विखुरले शब्दस्वरांतुन गोत्र एक ते विरघळले पात्र किनारे विस्तारुन अवघ्यांचे सागर झाले .......................अज्ञात ७/१२/२०११
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 1200
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

गाथा अज्ञातकुलाची फारच छान जमवले आहे. व्वा व्वा अप्रतिम सुंदर.. पात्र किनारे विस्तारुन अवघ्यांचे सागर झाले, ह्या सागरातून विहार करता गीत व्रणांचे स्फुरले !

नेहमीप्रमाणे आम्ही परत एकदा नि:शब्द!!! __/\__