Skip to main content

((बैल))

लेखक आंबोळी यांनी शुक्रवार, 18/07/2008 13:02 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा : विजुभौंचा बैल आपण सगळेच बैल असतो कोणीतरी संस्थळ काढत असतो आणि आपण जॉईन करत असतो. जिंदादीली आणि प्रशासक नसण्यावर खुष असतो. रसिकाच्या एखाद्या इशार्‍यासरशी ऊर फ़ुटेतो लिहीत असतो आपण सगळे बैल असतो. रसिकाने यावे आपल्या लिखाणाला प्रतिसाद द्यावा त्याने आपली कविता वाचावी कधी काळी वाह वा , जबरा म्हणाव म्हणून वाट पहात असतो. आपण सगळेच बैल असतो. आपल्याला आपण विडंबवले गेलो आहोत याची काही लाज नसते. ती जाणिवच थिजलेली आसते. उत्क्रुष्ठ लेख वगैरे जाणीव कधीच निजलेली असते. आपले लेख काढून टाकले तरी आपण तसेच असतो. फ़ार तर नव्या संस्थळाच्य शोधात असतो. आणि नव्या स्थळी गेलो की जुने कसे चांगले होते याची गाणी गात बसतो. आपण सगळेच बैल असतो. ======================== आंबोळी-----------१८-०७-२००८
लेखनविषय:

वाचने 7982
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

अंबोळीशेठ, पुन्हा !! :O आज काही खर नाही.. :SS पुन्हा एकदा जबरा विडंबन.. नक्कि काल कंदिल लावला होता.. (जूना) केशवसुमार स्वगतः मी अंबोळी नाही X( .. उगाच गैरसमज नको.. #o

वा क्या बात है ! मस्तच ( विडंबनातला बैल ) अमोल -------------------------------------------------- गुरुने दिला ज्ञानरुपी वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा !! भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

कन्दील्या तुझे काहे खरे नाही रे आता पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by विजुभाऊ

विजाभौ आगे बढो... हम तुम्हारे साथ है ! आपल्याला ओरिजीनल बैलच जाम आवडला. त्यातले जिवनविषयक सूत्र गटणे सकट सर्वांना लागू पडते. माजलेला सांड) कुबड्या खवीस (आमच्या येथे अस्थी व दंत विमा आणि सायकल पंक्चर काढून मिळेल तसेच सर्व प्रकारचे मोबाईल-संगणक रिपेर* करून मिळेल. ) नोट : लग्न पार्ट्यांच्या ऑर्डरी स्विकारतो.
तू भारी ...तर जा घरी...

सॉलीड !! येउ देत अजुन !!!! -- ऍनयू उर्फ बैल ~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

हा बैल सगळ्यात जास्त आवडला :) -('मिसळ'लेला) ऋषिकेश

आज मिपावर बैलांना इतका भाव आलेला पाहून बैलोबा असल्याचा अभिमान वाटतो आहे. :) :D (गाई गाई करणारा बैल...) बिपिन.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

म्हणजे गाईगाई करणारा की "गाई,(ए) गाई" करणारा कार्यकर्ते साहेब? ;) (ह.घ्या.) (जागरुक)बेसनलाडू

छान जमले आहे विडबन. वीजुभाऊ देख रहो हो क्या :)

आपल्याला आपण विडंबवले गेलो आहोत याची काही लाज नसते. हा हा हा! 'विडंबवले गेलो आहोत' हे वाक्य लै भारी.. :)

अरे काय चाललेय हे? एकतरी कविता सोडा की विडंबनाशिवाय.... विडंबन छानच झालेय. जबरी. अभिज्ञ. (अवांतर-कविचे स्वगत : ह्या विडंबनकाराच्या बैलाला..... असेच असावे काय?)

खांदेकरी, मयत, अशी कोणतीच आपल्या लौकिकाला साजेशी कल्पना नसल्यामुळे विडंबन छान झालेले असूनही हार्टली घंटी वाजत नाही. :)

स्वानुभवामुळे विडंबनाला अधिकच (पहिली) धार आली आहे. आपले लेख काढून टाकले तरी आपण तसेच असतो. फ़ार तर नव्या संस्थळाच्य शोधात असतो. आणि नव्या स्थळी गेलो की जुने कसे चांगले होते याची गाणी गात बसतो. आपण सगळेच बैल असतो. लाजवाब ! कंदिल सुमार !!!! - (निर्लज्ज बैल) सर्किट

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी)कंदीलसुमार ही आभाराची ढापूगीरी आम्ही आमचे मानस गुरु केशवसुमार यांच्याकडून केली आहे हे चाणाक्ष वाचकांच्या लक्षात आलेच असेल!

काय तुझं कवतिक सांगू? एकदम फर्मास रे! एकदम समद्यांना शिंगानं ढुसन्या देउन पाल्डस कीजोरदार हुंदडलायस! चतुरंग

आंबोळ्या जबरदस्त रे.... (रसिक बैल..) मदनबाण..... "Life is a joke. The only way to survive it is to find the right punchline" -- Becky Alunan

अरे डुचक्या, कवितेच्या जंगलात सोडलेल्या वळू तू... वेसणलेल्या नाकातून निघालेला, विडंबवलेला सूर तू... गोठाळलेल्या बंधनातून सुटून गेलेला बैल तू... गाईकीत बुडालेला हंबरडलेला आवाज तू... शेणावलेल्या पायांनी काढलेली रांगोळी तू... चारावून टाकलेली भावना चोथावताना आवाजही न करणारा तू... आज मात्र खरवलेली कविता केलीस तू... जोहार..