✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

हि तर सुंदर कविता झाली !

अ — अविनाश खेडकर, Tue, 12/06/2011 - 16:45
जन्म घेतला का मी येथे कधी कधी मज उगा वाटते कमावण्याच्या अरूंद वाटेवर बेकारांची गर्दी दाटते किती भिकारी बनले येथे एक टिचेच्या पोटासाठी धान्य दडविती गोदामी ते केवल आपुल्या स्वार्थासाठी समानतेची शिकवण आमुची एकात्मतेची आस वाटते शाळेमधल्या दाखल्यात मग धर्म-जात ती कशी नाचते? घोटाळ्यांची भरवून स्पर्धा इथला सेवक छळतो आहे आर्त हुंदका महागाईचा कुणा कधी का कळतो आहे? शहिदांच्या बलीदानांवरही शब्दच नव्हता स्मरला ज्यांना अफजल गुरूच्या माफीसाठी कोण पुरवितो भाषण त्यांना? खून दरोडे, धोकादाडी बलात्कारही रोज पाहिले अराजक्तेच्या वादळात या सदाचारी का कुणी न राहिले? कुणा मागावी दाद आता ती न्यायच पोषी अन्यायाला त्या जनतेची चाड कुणा ती जिथला राजा फितुर झाला? या तमाची चिडच ज्याला पेटून ऊठला एक दिवा तो पणत्या करिती मदत दिव्याला बदलच होता एक नवा तो त्या रामाला लबाड ठरविती मिळून सगळे इथले रावण तुम्हीच सांगा कैशी व्हावी भारत भूमी पवित्र-पावन? बोथटलेल्या पुरूषत्वाची आज मला जर चिडच आली का मग म्हणता तुम्हीच मजला हि तर सुंदर कविता झाली? -अविनाश (मायबोलीवर पूर्वप्रकाशित)

प्रतिक्रिया द्या
1465 वाचन

💬 प्रतिसाद (4)

चांगली आहे कविता... पुलेशु.

प्राजु
Tue, 12/06/2011 - 22:31 नवीन
चांगली आहे कविता... पुलेशु.
  • Log in or register to post comments

+१

प्रशांत उदय मनोहर
Wed, 12/07/2011 - 00:26 नवीन
असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु

छान ..

फिझा
Wed, 12/07/2011 - 10:11 नवीन
छान .. आहे कविता !!
  • Log in or register to post comments

कुणा मागावी दाद आता ती न्यायच

अत्रुप्त आत्मा
Wed, 12/07/2011 - 16:31 नवीन
कुणा मागावी दाद आता ती न्यायच पोषी अन्यायाला त्या जनतेची चाड कुणा ती जिथला राजा फितुर झाला?.... ---^--- सलाम,लाजवाब,खल्लास
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा