साहित्यः
१ छोटी वाटी तुरीची डाळ, १/२ छोटी वाटी मुगाची डाळ, १/२ छोटी वाटी मसुराची डाळ, १/४ छोटी वाटी चणा-डाळ, २-३ टेस्पून उडदाची डाळ २-३ वेळा स्वच्छ धुवून पाण्यात ३०-४५ मिनिटे भिजवणे.
१ छोटा कांदा बारीक चिरून
१ छोटा टोमॅटो बारीक चिरून
१ टीस्पून बारीक चिरलेले आले
१ टीस्पून बारीक चिरलेले लसूण
१ हिरवी मिरची चिरून
२-३ बोर-मिरच्या / लाल सुक्या मिरच्या
१/२ टीस्पून जीरे
१/४ टीस्पून हिंग
१ टीस्पून हळद
२ टीस्पून लाल-तिखट (आवडीप्रमाणे)
१-१/२ टीस्पून धणेपूड
१-१/२ टीस्पून जीरेपूड
१ टीस्पून बडीशेप पावडर
१/२ टीस्पून गरम-मसाला
मीठ चवीनुसार
१/२ टीस्पून लिंबाचा रस
बारीक चिरलेली कोथिंबीर
४-५ टेस्पून साजूक तुप
पा़कृ:
भिजवलेल्या डाळीत चिरलेली हिरवी मिरची, आले व थोडीशी हळद घालून कुकरमध्ये चांगली शिजवणे. शिजलेली डाळ जराशी घोटून घेणे.
एका भांड्यात २ टेस्पून तुप गरम करून चिरलेला कांदा परतावा. कांदा गुलाबी रंगावर परतला गेला की त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालावा. टोमॅटो मऊ होईपर्यंत परतावा.

त्यात चवीप्रमाणे मीठ, लाल-तिखट, थोडीशी हळद, धणेपूड, जीरेपूड व बडीशेप पावडर घालून चांगले तेल सुटेपर्यंत परतणे.

त्यात शिजवलेली पंचडाळ घालणे. डाळ किती दाट व पातळ हवे त्याप्रमाणे पाणी घालून उकळी आणणे.
उकळी आली की त्यात लिंबाचा रस घालून एकत्र करणे.

त्यावर थोडी कोथिंबीर व गरम-मसाला घालून एकत्र करणे व गॅस बंद करणे.

एका बुट्टीत २ टेस्पून तुप गरम करून जीरे, हिंग, लसुण व बोर-मिरच्या घालून फोडणी करणे व तयार फोडणी डाळीवर ओतणे.
गरमा-गरम पंचमेल डाळ / दाल जीरा राईस बरोबर सर्व्ह करा :)
मस्त
झ का स!
In reply to झ का स! by मेघवेडा
मस्त मस्त नक्की करुन बघायला
ए बाई, असे खतर्नाक फोटू देऊ
In reply to ए बाई, असे खतर्नाक फोटू देऊ by रेवती
हा हा हा हा
ऑसम!
झकास.... दाल फ्राय मला खुप
झक्कास हो ताइ.... तुमच्या
In reply to झक्कास हो ताइ.... तुमच्या by अत्रुप्त आत्मा
मिरच्यांची भाजी = दाय गंढोरी
खत्तरनाक!!
_/\_
आई शपथ्थ!! तुझ्या पायांचा
खल्लास
नेहमीप्रमाणे भन्नाट
झकास. करुन बघते जमतेय का.
ए भाताचा 'टोप' आणा रे
दरवेळेस नवे चमचे आणि आता
आ हा हा...
झकास
मस्त
१२ व्यांदा मेलो, उरलेला
सही ! दुसरे काही लिहणार नाही
मस्तं ! फोटोदेखील अप्रतिम .
कालच केली होती ही दाल. छानच
_/\__/\__/\__/\__/\__/\__/\__
पा.क्रु. आणि
अतिसुंदर
खुपच छान
In reply to खुपच छान by पप्पु अंकल
धन्यवाद