मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पंचमेल दाल

सानिकास्वप्निल · · पाककृती
. साहित्यः १ छोटी वाटी तुरीची डाळ, १/२ छोटी वाटी मुगाची डाळ, १/२ छोटी वाटी मसुराची डाळ, १/४ छोटी वाटी चणा-डाळ, २-३ टेस्पून उडदाची डाळ २-३ वेळा स्वच्छ धुवून पाण्यात ३०-४५ मिनिटे भिजवणे. १ छोटा कांदा बारीक चिरून १ छोटा टोमॅटो बारीक चिरून १ टीस्पून बारीक चिरलेले आले १ टीस्पून बारीक चिरलेले लसूण १ हिरवी मिरची चिरून २-३ बोर-मिरच्या / लाल सुक्या मिरच्या १/२ टीस्पून जीरे १/४ टीस्पून हिंग १ टीस्पून हळद २ टीस्पून लाल-तिखट (आवडीप्रमाणे) १-१/२ टीस्पून धणेपूड १-१/२ टीस्पून जीरेपूड १ टीस्पून बडीशेप पावडर १/२ टीस्पून गरम-मसाला मीठ चवीनुसार १/२ टीस्पून लिंबाचा रस बारीक चिरलेली कोथिंबीर ४-५ टेस्पून साजूक तुप . पा़कृ: भिजवलेल्या डाळीत चिरलेली हिरवी मिरची, आले व थोडीशी हळद घालून कुकरमध्ये चांगली शिजवणे. शिजलेली डाळ जराशी घोटून घेणे. एका भांड्यात २ टेस्पून तुप गरम करून चिरलेला कांदा परतावा. कांदा गुलाबी रंगावर परतला गेला की त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालावा. टोमॅटो मऊ होईपर्यंत परतावा. . त्यात चवीप्रमाणे मीठ, लाल-तिखट, थोडीशी हळद, धणेपूड, जीरेपूड व बडीशेप पावडर घालून चांगले तेल सुटेपर्यंत परतणे. . त्यात शिजवलेली पंचडाळ घालणे. डाळ किती दाट व पातळ हवे त्याप्रमाणे पाणी घालून उकळी आणणे. उकळी आली की त्यात लिंबाचा रस घालून एकत्र करणे. . त्यावर थोडी कोथिंबीर व गरम-मसाला घालून एकत्र करणे व गॅस बंद करणे. . एका बुट्टीत २ टेस्पून तुप गरम करून जीरे, हिंग, लसुण व बोर-मिरच्या घालून फोडणी करणे व तयार फोडणी डाळीवर ओतणे. गरमा-गरम पंचमेल डाळ / दाल जीरा राईस बरोबर सर्व्ह करा :) .

वाचने 10237 वाचनखूण प्रतिक्रिया 29

गणपा गुरुवार, 12/01/2011 - 19:56
भालेकरांच्या मतातली घालमेल आणि त्या वरच हा सानिकाताईंचा पंचमेल धागा पाहुन उगा मनी संशय आला? पण वाचलो. ;) अशी ही तडके वाली डाळ आणि सोबतीला वाफाळता जीरा राईस..... बास बाकी दुसरं काही नको. बाकी बादलीतली डाळ पाहुन लग्नातली पंगत आठवली. :) आवांतर : फटू खत्तरनाक आलेत.

रेवती गुरुवार, 12/01/2011 - 22:17
ए बाई, असे खतर्नाक फोटू देऊ नकोस. दाल भारी दिसतिये. आजकाल कोणत्याही पदार्थाची तयारी करताना तुझ्या पाकृ आठवतात. यावेळी ३ नवीन स्टीलच्या चमच्यांची भर पडलिये. एकदा तुझ्याकडच्या भांड्यांचे फोटू दे. आम्हीही तशीच आणायचा प्रयत्न करू.

In reply to by रेवती

अगं ते ३ नवीन स्टीलचे चमचे नसून स्टीलसारखे दिसणारे काचेचे चमचे आहेत :) भारतभेटीचा पूर्ण फायदा करुन घेतला आहे ;)

Mrunalini गुरुवार, 12/01/2011 - 22:49
झकास.... दाल फ्राय मला खुप आवडतो. पुण्यात Horn ok please नावाचे हॉटेल आहे. तिथे पण असच बादलीत डाल फ्राय देतात. सही असतो तो पण... त्याची आठवण करुन दिलीस. :)

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 12/01/2011 - 23:34
झक्कास हो ताइ.... तुमच्या पा.कृ. सुबकपणा मुळे टप्प्या/टप्प्यानी केलेल्या सादरीकरणामुळे वाचायलाही नेहमीच उत्तम वाटतात... आणी आधी डोळ्यांनीच चाखल्या जातात... वा व्वा...मस्त मस्त एकदम. :-) अवांतर-या डाळीच्या मुळे अशीच एक खमकी डाळ अठवली... पण तीला नाव मात्र वेगळच आहे.विदर्भातला हा पारंपारिक प्रकार आहे...पण त्याला म्हणतात मात्र मिरच्यांची भाजी :puzzled: >>. कुणाला माहित असेल तर टाका बरं पा.कृ. मागोमाग अति अवांतर-हो...पण ही दाल पचायला खरच खमकी असते... विदर्भात असं म्हणतात की आधी इथली 'हवा' दोन दिवस खा..अणी मग (मिरच्यांची भाजी) मंजे डाळ... नायतर माणुस बसलाच जाउन २बाय ४ च्या खोलीत,,,पुढचे २ दिवस ;-)

सुहास झेले Fri, 12/02/2011 - 04:13
ठार झालो... पाककृती जबरा आहेचं, फोटो कातील आहेत. गणपा म्हणतोय तसचं गरमागरम जीरा राईस आणि पंचमेल दाल काय मज्जा येईल.... हा प्रकार करणे शक्य आहे... लवकरच करून करून बघतो. :) :)

प्राजु Fri, 12/02/2011 - 05:34
आई शपथ्थ!! तुझ्या पायांचा फोटो काढून इथून पुढच्या सगळ्या पाकृंच्या खाली देत जा.. तेवढच दर्शन होत राहिल. :) काय ती मांडणी.. काय ती तयारी!! काय ती डाळ!! आहाहा!!

प्यारे१ Fri, 12/02/2011 - 09:58
ए भाताचा 'टोप' आणा रे कुणीतरी...! वदनी कवळ घेता नाम घ्या मातृभूचे, सहजस्मरण होते आपल्या बांधवांचे, कृषिवल कृषीकर्मी राबती दिनरात...... ह्या (हे जोरात) , करा सुर्वात. ;)

इरसाल Fri, 12/02/2011 - 10:06
दरवेळेस नवे चमचे आणि आता पळीसुद्धा बादलीसकट. बाकी पाकृ एकदम भन्नाट !!!!!!!!! अशीच एक डाळ इकडे उत्तरेत बनवतात. एकूण मिळून ५/६ तास लागतात म्हणे एकदम मंद आचेवर. नाव आहे मा-उडद-चने कि दाल. भरपूर क्रीम आणि वाढताना बटर टाकतात.

सविता००१ Fri, 12/02/2011 - 13:12
केवळ जबरदस्त झकास, अप्रतिम, सुरेख, इ.इ.इ..................... संपले शब्द.:)

पैसा Sat, 12/03/2011 - 18:34
तुमच्याकडचं भांड्याचं कलेक्शन बघून मला कॉम्प्लेक्स येतो.