मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

आसुया

अज्ञातकुल · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
पानगळीची किमया; सारे विवस्त्र वक्ष तरूंचे हे नक्षत्रांची नक्षी जणु की निळ्या अंबरी मय भासे डौल लास्य कमनीय विशाखा चित्र रमलतम रेषांचे चित्रकार अवघ्या विश्वाचा थबकल्यापरी आभासे प्राण प्रियेचे विरही झुरले; सुकले तट का पानांचे ?- की कात टाकली नवजन्मास्तव उबवित अंकुर पंखांचे ? मज दिसतो रजशृंगार कळीचा मी भृंगासम अवतरतो समक्ष बघतो तृप्त नहाणे अंतर्यामी उलगडतो गुणगुणतो गाणे स्वप्नांचे नवी आवरणे पांघरतो सृजनकल्प आसुया जगण्याची वाटेवरती अंथरतो ........................अज्ञात

वाचने 922 वाचनखूण प्रतिक्रिया 1

मिसळलेला काव्यप्रेमी 30/11/2011 - 19:54
की कात टाकली नवजन्मास्तव उबवित अंकुर पंखांचे ?
__/\__