Skip to main content

रेखाचित्रे

रेखाचित्रे

Published on मंगळवार, 29/11/2011 प्रकाशित मुखपृष्ठ
ही मी काढलेली काही रेखाचित्रे आहेत..विशेषतः मी ही सर्व चित्रे रांगोळी या स्वरुपात काढतो...परंतु पहिल्यांदा या रेखा चित्रे कलाप्रकारात तरबेज व्हावे लागते,कारण तोच पुढचा पाया आहे...म्हणुन आधी पाया दाखवत आहेत...कळस पुढे लवकर करु... ;-)
लेखनविषय:

याद्या 10205
प्रतिक्रिया 48

अतिशय सुरेख!! २र्‍या फोटोतले ते महाराज कोण आहेत?

बाळकृष्णावर फारच जीव दिसतोय हो तुमचा. चित्रे मस्त आहेत. अजुन जरा डार्क हवी होती हे वैयक्तिक मत (कि कॅमेरा फ्लॅशमुळे तसे दिसतेय?) ११ नंबरचे चित्र गोंदवल्याच्या मंदिराचे आहे काय?

In reply to by अन्या दातार

ते मंदिर बहुदा बेळगावचं असावं, कारण कलावती मातेच्या बालोपासनेच्या पुस्तकावर या मंदिराचे चित्र आहे.

In reply to by कान्होबा

श्री हरीमंदीराची उभारणी जेथे जेथे झालेली आहे तेथे तेथे मंदिराचा हाच आराखडा असतो. जय कलावती माता की!

सर्व रेखाटने अप्रतिम आहेत. कला आहे शेठ तुमच्या हातात. साला आमचा टार्‍या देखील झकास चित्रकार आहे. आजकाल चित्रे काढतो का नाही माहित नाही.

In reply to by परिकथेतील राजकुमार

होय टार्‍याची चित्रकला झक्कास आहे. पण त्याच्या हातात जरा जास्तच जोर असल्याने त्याच्या काही काही चित्रातले चेहरे त्याच्याच हातचा मार खाल्ल्यासारखे दिसतात.

In reply to by शिल्पा ब

कित्ती कित्ती दुत्त एश तू शिप्पातै?????? नव्या नव्या चित्लकालांना पोस्साहन द्यायला शांगिटलंय ना शं-पादक (हीहीही हीहीही ;) ) काकांनी? मं तू अशं का कल्तेश गं, दुट्ट? ;) ;) आनि सोक्या बोक्या, जा मी तुज्याशी गट्टाफू. बोल्नालच नै जा. आनि तुला कोम्पुटल ला पन हात नै लावू देनाल आमच्या. ;)

सगळीच उत्तम, उजवं-डावं करणं कठीण.

संवत्सर प्र-वर्तक चित्रकार कौस्तुभ यांचे स्वागत असो.... आज आली तुमची कलाबाई आमच्या मिपांगणात.. :-) अता कसं माणसात आल्यासारखं वाटतं का नाय? :-) १) तो शेवटुन दुसरा-शर्ट घातलेला बाळक्रुष्ण आहे...?की बाळक्रुष्णाला शर्ट घातलाय..? ;-) २) ती शेवटची छोटूश्शी राधा मात्र गो-गोड आहे...

In reply to by अत्रुप्त आत्मा

तो शेवटुन दुसरा-शर्ट घातलेला बाळक्रुष्ण आहे...?की बाळक्रुष्णाला शर्ट घातलाय..?
आम्हाला तर तो आगोदर शरदरावांचा लहानपणीचा फटू वाटला.

In reply to by परिकथेतील राजकुमार

आम्हाला तर तो आगोदर शरदरावांचा लहानपणीचा फटू वाटला.... ह्ही ह्ही ह्हा ह्हा :-D मग अजीत पवारांना 'बल-राम' पुत्र म्हणावे काय? ;-)

जबरा स्केचिंग आहे तुमचं, एलिमेंटरी आणि इंटर्मिजिएट दोन्ही परिक्षा आनंदानं नापास जाहलेला मी यापेक्षा जास्त काय लिहिणार.

कौस्तुभ, मिपावर स्वागत. सर्वच रेखाचित्रे फारच अप्रतिम आहेत. रेखाचित्रांमधलीसूक्ष्म कलाकुसरही अप्रतिम केली आहे.

सर्व रेखाचित्रे सुरेख आहेत!!

आपले विषय पाहता आपण सात्विक प्रवृत्तिचे असला पाहिजेत. उत्तम रेखाटने.

कलादालनात चित्रप्रदर्शन भरलयं आणि एक मस्त फेरफटका मारून आलोय असं वाटलं.

खूप छान बारकावे, तपशील भरून रेखाचित्रं काढली आहेत. मस्त. यांच्या आधारे काढलेल्या रांगोळ्या पहायची उत्सुकता आहे. लवकर येऊ द्या!

In reply to by सूड

ही "रेखा चित्रे" कोण रे?? ;) रेवतीआज्जी, जरा नातवाकडे (म्हणजे सुधांशुकडे) लक्ष द्या. बहुतेक तुमची गरज लवकरच पडणार असे दिसतेय. का तुम्ही भारतात येणार म्हणल्याबरोब्बर याने बाँब टाकलाय बघा?

सगळी रेखाटने अप्रतिम आहेत

वरून ७ नंबर चित्राची मूर्ती आमचा घरी आहे. आणि तुम्ही जशीच तशी चित्रात उतरवालीय ....अप्रतिम !!!! :)

सुंदर आहेत सर्व रेखा चित्रे. अभिनंदन.

वर्तक साहेब प्रयत्न चांगला आहे. सिद्धारूढ स्वामी, ज्ञानेश्वर महाराज यांची चित्रे चांगली जमली आहेत.

खूप सुंदर. अतिशय आवडली. असं एक कृष्णाचं टेबल कॅलेंडर होत आमच्याकडे. तेच आठवलं. सुंदर कला आहे हो तुमच्या हातात

मी काढलेल्या चित्रांना दिलेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे.

अतिशय उत्तम कला आहे तुमच्या हातात.. थोडी वेगवेगळ्या काळात काढल्यासारखी वाटतात. एकच चित्र वेगवेगळ्या दर्जाचं आलं आहे म्हणून... संत तुकारामांचं चित्र, त्यातलं शेडिंग सर्वोत्तम आलं आहे या सगळ्या चित्रांमध्ये.. आता कळस येऊ द्या !

खूप छान चित्रे!!!