✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

खाली-वर, खाली-वर

स — स्वाती फडणीस, गुरुवार, 07/17/2008 - 11:46

प्रतिक्रिया द्या
7563 वाचन

💬 प्रतिसाद (21)
ब
बेसनलाडू गुरुवार, 07/17/2008 - 12:07 नवीन

नक्की कळली नाही

पण अस्पष्टसे काहीतरी रूपक बोटाला लागले.त्यावर विचार करतो आहे फिंगर चिप्स खात खात :) (विचारमग्न)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
स
स्वाती फडणीस गुरुवार, 07/17/2008 - 12:14 नवीन

अरे वा!

म्हणजे विडंबन येणार तर वाट बघते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
ब
बेसनलाडू गुरुवार, 07/17/2008 - 12:21 नवीन

सुचले तर आहे

पण सॉल्लिड 'विद्रोही' वगैरे ठरेल. 'बोट' आणि 'खाली-वर,खाली-वर' यासाठी सुचलेले व योजलेले पर्यायी शब्द,रूपके वादळी असून ती चपखल बसतात की नाही यावर चर्चा झडेल.सगळे तुटून पडतील.ढसाळ ढसाढसा हसतील.त्यापेक्षा ही विडंबनाची अपेक्षा (कोणाकडेतरी) पास् केलेली बरी :) (विद्रोही)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती फडणीस
च
चतुरंग गुरुवार, 07/17/2008 - 16:20 नवीन

हा हा हा! मस्त प्रतिसाद

तुमच्या मनात हळूच 'दादा कोंडके' डोकावून गेले काहो? आम्हाला दिसल्यासारखे वाटले. ;) चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बेसनलाडू
स
स्वाती फडणीस गुरुवार, 07/17/2008 - 12:37 नवीन

धन्यवाद

कविता वाचून प्रतिसाद दिलात :)
  • Log in or register to post comments
स
सुचेल तसं गुरुवार, 07/17/2008 - 12:54 नवीन

मला खरोखर

मला खरोखर कळली नाही कविता. कृपया रसग्रहण कराल का ह्या कवितेचं? http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
स
स्वाती फडणीस गुरुवार, 07/17/2008 - 13:57 नवीन

थोडक्यात अर्थ

उसळणार्‍या लाटांत सोडून दिली एक बोट एक (कोणतिही) कृती केली आहे जस की लहान मुलाला पहील्यांदाच शाळेत सोडण अलगद हळूवार पणे/ सांभाळुन सोडवून घेतले बोट वर-खाली, वर-खाली हेंदकाळतंय पाणी त्याच वेळेला मनात खूप चल बिचल होत आहे. भिती ,काळजी, ताटातूट .. अश्या संमिश्र भावनांनी मन हळव झालय. बोट............... आता दिसतही नाही तो क्षण ,ती कृती आता घडून गेली आहे. आता हातात काहीच उरलेले नाही मी तिथेच............. बोटाकडे बघत हळव्या झालेल्या मनात वेगवेगळे विचार येत आहेत. आपण केलेली कृती चूक की बरोबर या संभ्रमात पडून ती कृती करणार्‍या बोटा कडे बघत मी तिथेच थांबून आहे. खाली-वर, खाली-वर अगदी बोटीत असल्या प्रमाणे लाटांसोबत्/बोटीसोबत हेंदकाळत ==================== स्वाती फडणीस............२९-०१-२००८
  • Log in or register to post comments
अ
अमोल केळकर गुरुवार, 07/17/2008 - 14:06 नवीन

व्वा !!

मस्त अर्थ समजावुन दिला आहे. सुंदर ------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती फडणीस
क
केशवसुमार गुरुवार, 07/17/2008 - 14:24 नवीन

वा!

स्वातीताई चांगली कविता आवडली अवांतरः कवितेचे असे उघड विशलेषण करू नये असे वाटते . निदान स्वतः कविने तरी.. एखाद्या वाचकाला समजली नसेल कविता तर व्यनिचा मार्ग आहे.. प्रत्येक वाचकाला त्यांना भावला तसा अर्थ लावून आनंद घेऊ द्यावा.. अर्थाचे अनेक पदर सापडतात.. (सपष्ट वाचक)केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती फडणीस
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 07/17/2008 - 14:31 नवीन

सहमत

प्रत्येक वाचकाला त्यांना भावला तसा अर्थ लावून आनंद घेऊ द्यावा.. अर्थाचे अनेक पदर सापडतात..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
स
स्वाती फडणीस गुरुवार, 07/17/2008 - 14:32 नवीन

बरोबर बोललात

हा असा उपदव्याप मी पहील्यांदाच केला :D पुन्हा करणार नाही :) (स्वगतः एव्हडी सोपी कविता कुणाला का समजू नये )
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
स
सुचेल तसं गुरुवार, 07/17/2008 - 15:08 नवीन

धन्यवाद

रसग्रहणाबद्दल धन्यवाद. कविता कळली नाही म्हणून विचारलं. ह्यात काही वावग आहे अस मला तरी वाटत नाही. http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती फडणीस
स
स्वाती फडणीस गुरुवार, 07/17/2008 - 15:34 नवीन

वावग नाही

ह्यात काही वावग नाही पण कविता रसीकांन पर्यंत स्वतः हून पोहचावी असे वाटले . आणि ती तशी पोहचवण्यात मी कमी पडले असे मला म्हणायचे होते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुचेल तसं
स
सुचेल तसं गुरुवार, 07/17/2008 - 15:39 नवीन

गैरसमज

गैरसमज नसावा. कवितेतला मी फारसा जाणकार नाही तरीही आपल्या आधीच्या कविता मला समजल्या होत्या. ही कविता वाचुन काहीच समजलं नाही म्हणुन अर्थ म्हणून अर्थ विचारला. http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वाती फडणीस
स
सुचेल तसं गुरुवार, 07/17/2008 - 15:14 नवीन

आणि

आणि हो.......... मला तरी ती एवढी सोपी वाटली नाही. http://sucheltas.blogspot.com
  • Log in or register to post comments
व
वरदा गुरुवार, 07/17/2008 - 23:34 नवीन

सहमत

मलाही कविता वाचून नव्हती कळली..रसग्रहण वाचूनच समजली... छान कविता... "The future belongs to those who believe in the beauty of their dreams" ~ Eleanor Roosevelt
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सुचेल तसं
ध
धनंजय गुरुवार, 07/17/2008 - 15:37 नवीन

बोट शब्दावरच्या श्लेषाने

चांगला इफेक्ट साधला आहे.
  • Log in or register to post comments
च
चतुरंग गुरुवार, 07/17/2008 - 16:25 नवीन

स्वातीताई,

कविता छान आहे. आपण वर अर्थ दिला आहे त्याही पेक्षा वेगळ्या छटा दिसल्या. चतुरंग
  • Log in or register to post comments
स
स्वाती फडणीस गुरुवार, 07/17/2008 - 19:28 नवीन

मनापासून आभार!

आपणाला आढळलेल्या छटा जाणून घ्यायला आवडतील :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
व
विसोबा खेचर Fri, 07/18/2008 - 00:33 नवीन

हम्म!

कविता समजली नाही! असो, पुलेशु... आपला, (साध्या, सोप्या व गेय कविता अधिकतर आवडणारा) तात्या.
  • Log in or register to post comments
ध
धनंजय Fri, 07/18/2008 - 00:50 नवीन

पुन्हा वाचता

अधिक आवडली. शब्दांच्या आकृतीचे सौष्ठव उत्तम आणि बांधणीत नाजूक गुंतागुंत दिसते. (अर्थ येथे समजावून द्यायला नको होता - व्यनि किंवा खरडीत द्यायला हवा होता हे अन्य रसिकांचे मत पटते.) कविताच्या कागदाची प्रवाहात ठेवलीस बोट अलगद बोट सोडवून घे. तिला हेंदकाळू दे स्वतंत्र. बोटात गुंतून : ती तरणार नाही बुडेल अडकून
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा