कट्टा - मुंबई २८ ते पुणे १३.
आंतरजालावर भेटणा-या आयडिंच्या मागचे चेहरे कसे असतात, ती बोटं कशी असतात जी आपल्या डोक्याला शॉट लावणारे प्रतिसाद लिहितात अन नंतर ह.घ्या असं लिहुन खरड टाकतात. आपल्या सगळ्यांना बरंच आकर्षण असेल, कोण असतात ती माणसं जी आपलं सुंदर अप्रतिम असं कौतुक करतात, प्रत्यक्ष भेटल्यावर सुद्धा ती आपल्याला त्याच अन तशाच शिव्या देतील का त्यांच्या चेह-यावर फक्त प्रकाटाआ लिहिलेलं दिसेल. आपले प्रतिसाद ओढत ओढत स्क्रिनच्या पार उजव्या कोप-यात घेउन जाणारे खरंच उजव्या विचारांचे असतात का डाव्या, या आणि अशा प्रश्नांचं उत्तर मिळण्याची जागा म्हणजे कट्टा.'
या महिन्याचा कट्टा आयोजित केलेला होता १९ तारखेला, एकत्र जमायची जागा होती हॉटेल पुणे गेट, निगडी. पुणे-मुंबई दोन्हीकडच्या लोकांच्या सोयीनं हे ठिकाण निवडलेलं होतं. नेहमीचं यशस्वी कट्टाबाज वगळता एक दोन नविन आयडिंचे मालक या कट्ट्याला सामील झाले होते. (आता या मालकांचे किती आयडि आहेत हे आम्हाला माहित नाही.)
मुंबई २८ हुन गवि, किसन, प्रास, गणेशा हे सगळ्यात आधी पोहोचले होते. त्यानंतर वल्ली, चतुर चाणक्य आले, नंतर धनाजीराव, विमे, सुधांशु, वपाडाव, प्यारे अन मी एकत्र पोहोचलो. जवळ्पास त्याचवेळी पुण्याच्या दुस-या टोकावरुन म्हणजे पुणे १३ वरुन सोकाजीराब व पिंगु सुद्धा पोहोचले. आज सकाळी काढलेल्या १९ जणांच्या यादीपैकी १४ जण पोहोचले होते, म्हणजे किमान कोरम पुर्ण झालेला होता, आयोजक खुष कट्टा सुरु.
मग ओळखी अन ज्यांचे फोटो आधी पाहिलेले नाहीत त्यांच्या ओळखी झाल्यावर चेह-यावर येणारे आश्चर्याचे भाव हा कार्यक्रम झाला. खरंच मिपावरचे आयडि, त्यांचे अर्थ अन प्रत्यक्ष त्यांचे मालक यांचा किती कमी संबंध असतो याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला. सगळ्यांनी आपल्याला सोयीच्या खुर्च्या पकडुन बसल्यावर कॅप्टननं एंट्री मारली. हा असला डिजिटल ऑर्डर बुक वाला कॅप्टन मी तरी पहिल्यांदाच पाहात होतो,
मग गणेशानं प्रसिद्ध केलेली 'हातभर तवा फ्राय सुरमई,फ्रुट पंच, चिज मलई टोस्ट, मांचुरिअन,होडन सावर सुप अशा विविध प्रकारच्या ऑर्डर घेताना कॅप्टन अन त्याचं डिऑबु एवढं गोंधळलं होतं की, त्या डिऑबुकाचा प्रोसेसर बंद होउन त्यातुन धुर निघतो का काय अशी शंका यायला लागली. यातच हातभर तवा फ्राय सुरमई विदौट सौथ इंडियन मसाला , हे विदौट सौथ इंडियन मसाला हे प्रकरण कॅप्टनला समजावुन सांगण्यापेक्षा विमानाचा डॅशबोर्ड समजावुन सांगणं सोपं असं गविंना वाटत होतं, शेजारी बसलेल्या विमेंनं दुपारीच पुणेरी हॉटेलातिथ्याचा अनुभव घेतला होता त्यामुळं पुन्हा या लढाईत तो पडला नाही, पण ऑर्डर आली की लगेच आपल्याला फोन येवु नये अशी प्रार्थना तो करत होता.
कट्टे हॉटेल मध्ये असले तरी ऑर्डरी सर्व्ह होईपर्यंत तोंड बंद राहणार नाहीत याची काळजी मिपाकर नेहमीच घेतात, आज पहिला नंबर लागला तो वल्लीनं हैदराबादहुन आणलेली अन प्रचंड संयमानं, न संपवता आमच्यासाठी जपुन ठेवलेली फ्रुट बिस्किटांचा आणि फोटो काढेपर्यंत ती संपली यावरुन ती किती चांगली होती हे लक्षात घ्या. मग नंतर नंबर लागला रमबॉलचा, पण यावेळी एक फोटो काढुन घेण्याचा चान्स मिळाला.
मिपाकरांच्या कट्ट्यावर गप्पांचे मुख्य विषय असतात ते मिपा गाजवत असलेले धागे अन मिपाकर, आणि आता सुद्धा तेच सुरु झालं. आता हे लाईमलाईट मध्ये राहणारे धागे अन मिपाकर कोणते ते वाचकांच्या लक्षात आलेलंच असेलच. साधारण दहा मिनिटांनी पहिली ऑर्डर आली ' हातभर सुरमई तवा फ्राय विदौट सौथ इंडियन मसाला' , यावेळेपर्यंत आजुबाजुला फोटो काढ्ण्यासारखं फार कुणी नसल्यानं आम्ही प्रत्येक डिशचे फोटो घेणार आहोत याची कल्पना कॅप्टनला आलेली होती, त्यामुळं बहुतेक प्रत्येक डिश तो फोटोसाठी पेश करत होता.
खाणं समोर आल्यावर गप्पा अजुनच रंगत गेल्या, आता गप्पा कोणत्याही विषयावर असल्या तरी त्या एकाच दिशेनं जात होत्या, ती म्हणजे विनोद, हसणं. एवढ्या लांबुन सगळे एकत्र जैतापुर प्रकल्पाच्या फायद्यातोट्यावर चर्चा करण्यासाठी थोडेच येतात.
मग अतृप्त आत्माचं आगमन झालं, आयोजक अजुन खुष. पंधरा जण एकत्र आल्यानं साहजिकच दोन ग्रुप झाले होते अन दोन्ही ग्रुपचं टारगेट सेंटरला बसलेला गणेशा होता, त्याच्या निमित्तानं सगळ्याच बॅचलर लोकांना लग्न झालेल्या मिपाकरांनी काही सल्ले देउन घेतले. यावेळी सोकाजींनी काय पिल्यानं शरीराच्या कोणत्या भागाला कधी जळजळ होते यावर एक छोटा क्लास घेतला.
यथावकाश एक दोन राउंड स्टार्टर होउन मेन कोर्सची ऑर्डर फायनल होईपर्यंत चेतन गुगळे आले, आणि टेबलच्या दुस-या टोकाला असलेली खुर्ची भरुन गेली, (आयोजक भरुन पावले) आणि अधांतरी होउ लागलेला कट्ट्याला एक जडता प्राप्त झाली.
गप्पा अखंड चालुच होत्या. जेवणं संपत आली होती, शेवट पुन्हा एकदा सुरुवातीच्या गोंधळाप्रमाणे झाला, 'वन बाय टु फ्रुटपंच वुईथ लेयर्स' यावर गणेशानं कॅप्टनचा क्लास घेतला. सुरुवातीचा ' तवा फ्राय सुरमई विदौट सौथ इंडियन मसाला' आणि हे 'फ्रुटपंच वुईथ लेयर्स' खाण्याबाबतचं आणि प्रेझँटेशनचं एवढं ज्ञान वाढवण्यामध्ये मिपावरच्या सुगरणी, बल्लवाचार्यांचा अन खवय्यांचा खुप मोठा हात आहे.
निघताना विमेंनं विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं, ' हे असे कट्ट्रे व्यनि, फोन अन एसेमेस वरुन का करता, धागा का नाही काढत ?' याचं काही खास कारण निश्चीत नाही पण यापुढचे कट्टे जाहीर धागे काढुनच करायचं ठरलं.
मुंबईकरांना परत जायचं असल्यानं लवकर निघायचं ठरलेलंच होतं, त्यानुसार साडेदहाच्या सुमारास हॉटेलच्या बाहेर फोटो काढुन आम्ही परत निघालो.
कट्ट्याला आलेल्या सगळ्या मिपाकरांचे आभार, आणि न आलेल्यांना एवढंच सांगायचंय की तुम्ही एक छान संध्याकाळ मिस केलीत, अर्थात यामागं दुसरी मिस असण्याची शक्यता नाकारता येत नाही, आणि या पुढचे कट्टे करु तेंव्हा धागा काढुच, खरडफळ्यावर सुचना येईल आणि एक विनंती आम्हां नेहमीच्या कट्टेकरांच्या खवमध्ये हे कट शिजताना दिसतीलच, तरी थोडं लक्ष ठेवा अन पुढच्या कट्ट्यांना नक्की या. अजुन मजा करु अजुन दंगा करु.
यापुढचा कट्टा जास्त मोठा अन जास्त व्यवस्थित करायचं ठरलं आहे, तसंच एक ट्रिप काढायचं सुद्धा ठरलं आहे, कोकणात. याबद्दल सुद्धा सुचना तुमच्या सोयीच्या तारखा यावर चर्चा होउद्या इथंच. शक्यतो जानेवारीचा चवथा शनिवार / रविवार ठरवावा असा विचार आहे. बघताय काय जॉईन व्हा.
प्रतिक्रिया
@ नंतर गुगळे साहेबांच्या
खीक्क...
णिषेढ
आत्मांच्या या वाक्याशी सहमत.
चाललेल्या मौलिक चर्चेतून जे
काही दिवस कामाच्या व्यापामुळे
अरेरे
कट्टा तर जोरदार झालाच पण
कट्टा तर जोरदार झालाच पण
शन्वार फुल्ल एंजॉय केला.
सुड तु खरंतर त्या दिवशी फार
नाटक काय, चित्रपटही तयार
क्ट्ट्याचा धागा
वरचे प्रतिसाद सवडीनं
कट्टा म्हणजे कट्टा
कट्टा म्हणजे कट्टा असतो कोण
पन्नासराव, मस्त वृत्तांत. आता
कट्ट्याच्या माध्यमातून एका नव्या मैत्रीच्या धाग्याची गुंफण
गप्पांचे मुख्य विषय असतात ते
अनुपस्थित मिपाकरांचे जास्त
अस है वय. गॉसिप है कय ते, मंग ठीक है...
ठरलेल्या वेळेच्या तासभर आधी
इट वॉझ कंप्लिट फन २ बि विथ मिपाकर्स !!!
सूरेख वृत्तांत
गविंच्या वृत्तांताने अधिक
+१
घोडे.... वरातीमागून. ;)
@--- मा. ना. गुगळे साहेब
छे निव्वळ दारुबाजांनी
Pagination