




(इथे हा वरचा दिवा काही मला चुकवता आला नाही. :( )


माझे प्रेरणा स्थान.
माझे मनोगतः ---अनेक वेळा मी पाहिले आहे की...रस्त्यावर कोळशाने /खडुने एखादा चित्रकार साईबाबा,शंकर इं चित्र काढतो,त्यात रांगोळी किंवा रंगाने ते चित्र जिंवंत करतो ! काय जादु आहे अश्या कलाकारांच्या हातात नाही का ? कसे जमते यांना इतकी सुंदर रेखीव चित्रे काढायला ? अत्यंत चिकाटीने साध्य होणारी ही कला विविध विषयांचा सहज वेध घेते,बघणार्याला भारावुन टाकण्याची एक अनोखी शक्ती या कलेत आणि कलाकाराच्या हातात असते...
अजुनही ही रांगोळीची कला या मेहनती कलाकारांच्या अथक परिश्रमामुळे जिंवत आहे याचा मला आनंद आहे,आणि असे अनेक कलाकार निर्माण व्हावे अशी माझ्या मनाची इच्छा आहे... दिवाळीत या कला प्रदर्शनाचा जो आनंद मला उपभोगता आला,तोच आनंद मिपाकर वाचकांना घेता यावा यासाठीच मी हे फोटो काढले.
माझा हा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल अशी आशा व्यक्त करतो...
प्रदर्शन स्थळ :--- भारतीय विद्या भवन,डॉ.क.म. मुन्शी मार्ग,चौपाटी,मुंबई ४०० ००७
गिरगांव रंगावली ग्रुप.
(हौशी फोटुग्राफर) :)
मदनबाण.....
मिसळपाव
प्रतिक्रिया
तिन्ही भाग आवडले.आम्हाला
तिन्ही भाग आवडले.
आम्हाला गिरगावात राहुनही खबर नाही लागली.
पुढच्या वेळेस असा काही कार्यक्रम इकडे असेल आनी तुम्हाला शक्य झाले तर मलाही कळवा.
आमच्या़कडचे चहापाणी घ्यायलाही या.
धन्यवाद... नक्की.
In reply to तिन्ही भाग आवडले.आम्हाला by विलासराव
धन्यवाद... :)
नक्की. :)
काही रांगोळ्या तर इतक्या
काही रांगोळ्या तर इतक्या जिवंत वाटताय की आता आपल्याशी हितगुज साधतील की काय असा भास होत आहे.
ग्रेट.
यस्स्स!!!
In reply to काही रांगोळ्या तर इतक्या by गणपा
अगदी अगदी!
जय द्वारकेशवाल्या रांगोळीत
जय द्वारकेशवाल्या रांगोळीत काळा आणि राखाडी रंग भरण्याची कमाल केली आहे असे वाटले.
हा पण भाग मस्त रे, धन्यवाद.
हा पण भाग मस्त रे, धन्यवाद.
सुंदर रे बाणा ... !!
सुंदर रे बाणा ... !!
झकास. कलाकारांची कदर करावी
झकास. कलाकारांची कदर करावी तेवढी थोडीच आहे.
वॉव!
तिनही भागात अनेक उत्तमोत्तम रांगोळ्या आहेत. त्या कलाकारांना अभिवादन!
त्या आमच्यापर्यंत अत्यंत सुंदर छायाचित्रांतून पोहोचवल्याबद्दल मदनबाणाचे आभार! :)
मस्त रे बाणा
गौतम राजाध्यक्षांची रांगोळी विशेष आवडली. क्यामेरा अगदी थ्रीडीगत बाहेर आल्यासारखा वाटतोय.
रांगोळी काढणार्या कलाकाराना
रांगोळी काढणार्या कलाकाराना आपला सलाम. :)
बाणा आमच्याशी सुंदर रांगोळ्या शेअर केल्याबद्दल धन्यवाद रे मित्रा. :)
बाणा अतिशय छान धागा काढला
बाणा अतिशय छान धागा काढला आहेस..
- पिंगू
अ प्र ति म !!
द्वारकेश अन राजाध्यक्षांची रांगोळी लैच आवडली.....
द्वारकेशवाली थोडी लांबट की काय तशी वाटते आहे.... म्हणजे चेहर्यावर फोकस नाही आला....
अवांतर :: स्पावड्या सारख्या एखाद्या हडकुळ्या माणसाला कडेवर उचलुन मग रांगोळीचा फोटो काढल्यास चांगली दिसेल असे वाटते........
काल अशीच एक अप्रतिम रांगोळी
काल अशीच एक अप्रतिम रांगोळी फेसबुकच्या कृपेने पहायला मिळाली.
इच्छुकांनी इथे भेट द्यावी.
छान ! सुरेख !!
अप्रतिम ! speechless यार
हा भाग---मंजे रांगोळ्या-
हा भाग---मंजे रांगोळ्या- ठिकठाक आहेत :-)
मस्त!
तिन्ही भागांतील रांगोळ्या अप्रतिम आहेत.
कलाकारांचे अभिनंदन!
आणि त्या इथे दाखवल्याबद्दल बाणाचेही अभिनंदन!!