साहित्य - एका मुळ्याची पाने, हरबरा डाळ अर्धी वाटी, फोडणीचे साहित्य, दोन चमचे तेल, लाल तिखट एक छोटा चमचा, चवीनुसार मिठ.
आज सकाळी मंडईत गेले होते, तेथे पांढरेशुभ्र मुळे दिसले, घ्यायचा मोह झालाच, कोशिंबीर होइल एक वेळची,
एक मुळा घेतला, तो घेताना भाजीवाला म्हणाला- मागील पाला काढून टाकू का - म्हटले अरे नको (मनात- भाजी करुयात आज मस्त- आणी नवर्याला ओळखायला लावुयात,), घेउन आले मुळा घरी, त्याचा पाला काढून स्वच्छ धुतला, बारीक चिरुन ठेवला, तोपर्यंत हरबरा डाळ भिजत घातली,
अर्ध्या तासाने डाळ चांगली भिजल्यावर कढइ मध्ये जिरे-मोहरी, हिंग, हळद घालून खमंग फोडणी केली,
त्यात भिजलेली डाळ घातली चांगली परतुन घेतली, मग चिरुन ठेवलेली मुळ्याची पाने त्यात घातली, तिखट व चवीनुसार मिठ घातले पुन्हा परतले व वाफ येण्यासाठी त्यावर झाकण ठेवले, पाच-सात मिनिटे चांगली वाफ येउ दिली, त्यातील डाळ शिजल्यावर भा़जी झाली समजावे. पाणी अज्जिबात घालू नये.
ही भाजी केली , ह्यांच्या ताटात वाढ्ली, म्हटले ओळखा पाहू- कशाची भाजी आहे, नाही ओळखली तर
मला आईसक्रिम द्यावे लागेल, बरीच नावे घेतली, पण नाहीच ओळखली.....
आणी त्याबद्दल मला आत्ताच आईसक्रिम आणून दिले आहे, ते खात खात हा पदार्थ दिला आहे
आपणा सर्वांसाठी---
तयार भाजी ही पहा------
![]() |
![]() |
![]() |
![]() |
![]() |
वाचने
10519
प्रतिक्रिया
29
मिसळपाव





प्रतिक्रिया
मस्तच गं.... करुन बघायला
वन ऑफ माय फेव्हरेट. माझे
अच्छा, तो ये राज है!
In reply to वन ऑफ माय फेव्हरेट. माझे by गणपा
ओह, नो वन्डर्स देन
In reply to वन ऑफ माय फेव्हरेट. माझे by गणपा
माझे बाबा मस्त बनवतात. हम्म.
In reply to वन ऑफ माय फेव्हरेट. माझे by गणपा
आता माझी आवडती भाजी. पूर्वी
मस्त... आई खूप छान बनवते ही
बाय डिफॉल्ट ताई, भाजी आवडली !
छान!
मस्त
मला ही भाजी खुप आवडते....
आमच्या घरी पण
मस्तच!!!
मस्तच दिसतेय भाजी
मला आवडते ही भाजी..
मस्तच
वेगळा प्रकार
मुळ्याची भाजी....
छानच !
In reply to मुळ्याची भाजी.... by प्रभाकर पेठकर
मूली के पराठ्यांची कृती
In reply to मुळ्याची भाजी.... by प्रभाकर पेठकर
>> पालेभाजी
In reply to मुळ्याची भाजी.... by प्रभाकर पेठकर
आपली मर्जी...
In reply to >> पालेभाजी by किचेन
मी पण पालेभाजी करताना पातेल्यावर झाकण ठेवते.
In reply to >> पालेभाजी by किचेन
हम्म्म्म
In reply to मी पण पालेभाजी करताना पातेल्यावर झाकण ठेवते. by वाहीदा
काळवंडणे..
In reply to मी पण पालेभाजी करताना पातेल्यावर झाकण ठेवते. by वाहीदा
+१ टू काका. आमच्याकडेही
In reply to काळवंडणे.. by प्रभाकर पेठकर
__/\__
वापरा....
In reply to __/\__ by परिकथेतील राजकुमार
एक्स्त्रा व्हर्जन ऑलिव्ह ऑईल
In reply to __/\__ by परिकथेतील राजकुमार