Skip to main content

मी कागदावर सांडत गेलो

Published on रवीवार, 20/11/2011
कवित्व नाही माझा बाणा मी नच असे थोर कवी तो लिहिले ज्यांनी काव्यग्रंथ अन् समाज ज्यांना थोर मानतो कधी न केली कसली ईर्षा कुणी लिहिलेल्या काव्यत्वाची तुम्ही नभीचे सुर्य तळपते ना मज क्षमता काजव्याची आवडले जे जेंव्हा जेंव्हा शब्द सुमने उधळीत गेलो काळोखाच्या साम्राज्यावर मी शब्दाचा प्रकाश झालो मनात ऊठले वादळ तेंव्हा विचार माझे लिहिते झाले ना मात्रांशी सोयर माझे वृतांनी मज दूर लोटले अनुभवले जगण्यातून जे जे मनात सगळे मांडून घेतो कधी मनाला भरती येते अन् मी कागदावर सांडत जातो.
लेखनविषय:

याद्या 1558
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया

कविता वाचण्या आधीच शिर्षकावरून काहितरी कोटी करण्याचा विचार होता. ;) पण कविता वाचून मत बदललं. उत्तम प्रयत्न. :)

अप्रतिम ! :) आवडले जे जेंव्हा जेंव्हा शब्द सुमने उधळीत गेलो काळोखाच्या साम्राज्यावर मी शब्दाचा प्रकाश झालो सुंदर ! अनुभवले जगण्यातून जे जे मनात सगळे मांडून घेतो कधी मनाला भरती येते अन् मी कागदावर सांडत जातो. झकास्स्स्स...